‘भारतमित्र’ ज्यांना म्हटले जाते, अशा कुणाहीबद्दल भारतीयांना कौतुक असतेच. पण टिमथी हायमन हे मूलत: दृश्यकलेतल्या नवेपणाचे मित्र. चित्रकार आपल्या भोवतालाला कसा प्रतिसाद देतात, नवे काही शोधण्याचा प्रयत्न स्वत:तून कसा करतात, हा त्यांच्या कुतूहलाचा विषय. त्यातून त्यांची मैत्री भारतातल्या काही चित्रकारांशी झाली, त्यांपैकी भूपेन खक्कर हे सर्वांत वरचे नाव. भूपेन खक्कर यांच्यावरील टिमथी हायमन यांचे पुस्तक (प्रथमावृत्ती – १९९४) हे एखाद्या चित्रकाराला मुळापासून कसे समजून घ्यायचे असते, त्याची दृश्यभाषा कशी वाचायची असते याचा वस्तुपाठ! त्यामुळे अनेक कलाप्रेमी भारतीयांचे दुरून प्रेमही टिमथी यांना लाभले. रविवारी- ७ सप्टेंबर रोजी झालेल्या त्यांच्या निधनाची बातमी भारतात सोमवारी पोहोचली, तेव्हा त्यांची एक स्मृतिसभा किमान बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला विभागात तरी व्हावी, असेही अनेकांना वाटले असेल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा