युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेले भाषण काही बाबतींत लक्षणीय ठरले. रशियाने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतरचे झेलेन्स्की यांचे संयुक्त राष्ट्रांमधील हे पहिलेच सदेह भाषण. युक्रेन युद्धाचा वापर रशियाकडून जागतिक मूल्याधारित व्यवस्थेविरुद्ध केला जात आहे. ज्या देशांचा या व्यवस्थेवर विश्वास आहे त्यांनी हा धोका ओळखावा असा इशारा झेलेन्स्की देतात. त्यांचा रोख अमेरिकादी पाश्चिमात्य देशांकडे नसून रशियाशी काडीमोड न घेतलेल्या व प्राधान्याने भारतासारख्या ‘ग्लोबल साऊथ’ विश्वातील देशांकडे अधिक दिसतो. रशियाव्याप्त भागांमधून युक्रेनी मुलांचे अपहरण करून त्यांची रवानगी रशियात करण्याविषयीच्या गंभीर आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. युक्रेनियन मुलांच्या संशयित अपहरणावरूनच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय युद्धगुन्हेविरोधी पकड वॉरंट जारी झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा