कर्नाटकाची राजधानी बेंगळूरुच्या जवळच्या गंजिगेरे गावामधल्या मतदारांनी मतदानाआधी उमेदवाराकडून मिळालेल्या भेटवस्तू फेकून दिल्या हे कळल्यावर सगळय़ाच पक्षांमधले चाणक्य अतिशय अस्वस्थ झाले होते.  मतदार असे चळले आणि असे ‘अनैतिक’पणे वागू लागले तर निवडणुकीची म्हणून काही नीतिमत्ता उरणार की नाही आणि ती कशी राखायची असा प्रश्न त्यांना पडला होता. आज एका पक्षाच्या भेटवस्तू फेकून दिल्या; उद्या दुसऱ्या पक्षाच्या फेकून देतील. आज कर्नाटकातील मतदारांनी फेकून दिल्या; उद्या इतर राज्यांतील निवडणुका येतील, लोकसभा निवडणुका येतील तेव्हा यांचे बघून बाकीचेही असेच वागायला लागतील.. असे झाले तर काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. 

खरे तर येत्या काही महिन्यांत आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका, अवघ्या वर्षभरावर आलेली लोकसभेची निवडणूक यासाठी रेवडय़ा उडवण्याचे किती किती नियोजन केले होते. साडय़ा, पेयपान, सामिष भोजन हे तर नेहमीचेच, शिवाय वयस्करांना तीर्थयात्रा घडवायची होती, तरुणांना सहलीवर न्यायचे होते. आणखी काय काय मौल्यवान वस्तू भेटीदाखल द्यायच्या होत्या. काही ठिकाणी तशी मागणी होती, तर काही ठिकाणी तसे नियोजन होते. या सगळय़ासाठीची वेगवेगळय़ा पक्षांची, त्यांच्या संभाव्य उमेदवाराची आतल्या आत तयारी सुरू झाली होती. काही सोसायटय़ांनी तर आमच्या इमारतींची रंगरंगोटी करून द्या, सगळी सोसायटी तुम्हालाच मत देईल असे ठणकावून सांगितले होते. त्यावरही विचार सुरू होता. आता कर्नाटकातील या विक्षिप्त मतदारांमुळे हे सगळेच सोडून द्यावे लागते की काय? सगळेच नेते चिंतेत सापडले होते.

Dombivli West, illegal building, land mafias, demolition notice, municipality, Prakash Gothe, Shankar Thakur, encroachment control,
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस, इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
sanjay gaikwad statement on badlapur case
Sanjay Gaikwad : “आता काय मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का?”, बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान!
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी
Woman Naxal Commander, Woman Naxal murder,
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…
Erandwane koyta attack pune marathi news
पुणे: पोलिसांकडे तक्रार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, एरंडवणे भागातील घटना
Varanavati is relaxed due to the capture of the python while the Karnal area is frightened by the rampage of the leopard
अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत

एरवी जनतेसमोर सगळे भांडत असले तरी तसे त्यांचे गूळपीठ असते. त्यामुळे हे सारे चाणक्य पुढील रणनीतीचा सामूहिक विचार करण्यासाठी रिसॉर्टवर जमले. सध्या नेता म्हणून फॉर्मात असलेला त्यांच्यामधलाच एकजण उठला आणि म्हणाला, मी सोडवतो हा प्रश्न. सगळे चला माझ्याबरोबर. सगळे उठले आणि कर्नाटकातील त्या गंजिगेरे  गावात गेले. उमेदवारांकडून आलेल्या भेटवस्तू फेकून देऊन आलेले मतदार आपापल्या घरात स्वस्थ बसले होते, तोवर सगळय़ा पक्षांमधील नेत्यांचा हा जथा त्यांच्या गावात पोहोचला. सध्या नेता म्हणून फॉर्मात असलेला नेता पुढे आला आणि मतदारांना म्हणाला, तुम्हाला आमच्या उमेदवाराने प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू तुम्ही फेकून दिल्यात हे समजले. काय घ्यायचे आणि काय फेकायचे हा खरेतर तुमचाच प्रश्न आहे. पण एक भेटवस्तू फेकली आणि बाकीच्या स्वीकारल्या असे कसे चालेल? एकेकाळचा ‘गरिबी हटाव’चा नारा ही जशी भेटवस्तू होती तशीच ‘अच्छे दिन’ हे आम्ही दाखवले ले स्वप्न ही भेटवस्तूच होती की. त्यामुळे तर तुम्ही सगळे केवढे खूश झाला होतात. निवडणुकीनंतर प्रत्येकाच्या खात्यात दोन-दोन हजार रुपये चालतात, मोफत धान्य चालते आणि मतदानाआधी एखादी साडी, एखादी कोंबडी या भेटवस्तू तुम्हाला चालत नाहीत, हे कसे काय? हे ऐकले आणि फेकून दिलेल्या भेटवस्तू परत आणण्यासाठी लोक उठून चालू लागले.