‘नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत भावी पीएचडीधारकांचा एक मोठा जथा दक्षिण मुंबईतल्या एका मैदानावर आला व हिरवळीवर स्थानापन्न झाला. मग हळूहळू आणखी काहींचे गट त्यांच्यात येऊन मिसळले, बऱ्यापैकी संख्या जमा झाल्याचे दिसताच त्यातल्या एकाने मोठय़ा आवाजात बोलायला सुरुवात केली. ‘‘आम्हाला संशोधनासाठी महिन्याकाठी ३७ हजारांची अधिछात्रवृत्ती मिळते त्यासाठी तुमच्या पोटात दुखायचे कारण काय? यामुळे आमच्यासारख्या मागास व गरीब मुलांच्या पोटाची, पुढील शिक्षणाची सोय होत असेल तर तुम्ही का वाईट वाटून घेता? मतांच्या बेगमीसाठी तुम्ही नाना प्रकारच्या रेवडय़ा वाटता तेव्हा कुठे जाते तुमची आर्थिक शिस्त? हो, हे मान्य की पीएचडीचा स्तर अलीकडे घसरला, मग राजकारणाचाही घसरला त्याचे काय? हेही मान्यच की अलीकडे पीएचडी करूनही नोकरी मिळत नाही, पण शिकल्याचे समाधान तर मिळते. जसे तुम्हाला पक्ष फोडून सत्तेत सामील झाल्यावर मिळाले तसे! संशोधनानंतर नोकरी मिळाली तरच दिवे लागतात असे तुम्ही समजत असाल तर सत्तेसाठी पक्षांतर करून तुम्ही दिवे लावले असे आम्ही समजायचे का? मध्यंतरी तुम्ही धरणात पाणी भरण्यावरून खास शब्दांत चिंता वाहिली होती. आता आमच्या तोंडचे पाणी तुम्हाला पळवायचे आहे का? आम्हा सर्वांचे दारिद्रय़च इतके मोठे की या ३७ हजाराने आमचे खिसे भरू शकत नाही. तुमच्यासारख्या भरलेल्या खिसेवाल्यांना ही व्यथा कशी कळणार? प्रत्येकच संशोधन काही सार्थकी लागत नाही. त्यातले एखादा टक्केच समाजाच्या उपयोगी पडत असते. हे प्रमाण तुमच्या सिंचनक्षेत्रवाढीच्या वेगापेक्षा कमी आहे असे तुम्हाला वाटते काय? पीएचडी केल्यावर आम्हाला शिपायाची नोकरी मिळाली तरी चालते.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : जय शोभराज!

A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
How to invest in mutual fund SIPs the right way
म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा

तुम्हाला आमच्या हातून पाणी पिण्यासाठी काही अडचण आहे का? तुम्ही अडचणीत याल असे ‘सरकारी कामकाज, योजनांची अंमलबजावणी’ यांसारखे विषय आम्ही संशोधनासाठी निवडलेच नाहीत. ते निवडावेत अशी तुमची इच्छा आहे काय? संशोधनावरचा खर्च वाया गेला असे समजूनच करावा लागतो. तुम्ही सिंचनावर केलेला खर्च अनेकदा वाया गेला, त्यावर आम्हीही आता काय दिवे लावले असे म्हणायचे का? नोकरी मिळो अथवा न मिळो, शिक्षणाने माणूस उन्नत होतो, प्रश्न विचारण्याची ताकद त्यात निर्माण होते. असे तरुण राज्यात नकोत असे तुम्हाला सुचवायचे आहे काय?’’ वक्त्याच्या तोंडून लागोपाठ येणाऱ्या या प्रश्नांच्या फैरींनी उपस्थितांचा जोश वाढून ‘शेम शेम’ अशा घोषणा दणाणल्या. इतरांची भाषणे होता होता सायंकाळ झाली. अंधार पडू लागला तसे सर्व जण हातात दिवे घेऊन दादांच्या बंगल्याकडे चाल करून निघाले. ‘हा नवा संप्रदाय-दिवे संप्रदाय’ अशी नारेबाजी करत हा मोर्चा दादांच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्यांचा बंगला अंधारात बुडालेला साऱ्यांना दिसला. तेवढय़ात एक साहाय्यक बाहेर आला व वीजपुरवठा खंडित झाल्याने साहेब भेटू शकणार नाहीत असे सांगितले. जमावातील तिघे समोर आले. आम्ही पीएच.डी. करण्याआधी आयटीआयमधून वीजतंत्रीची पदविका घेतली आहे असे सांगताच साहाय्यक त्यांना आत घेऊन गेला. पाचच मिनिटांत दादांचा बंगला दिव्यांनी झगमगू लागला. मग दादांनी साहाय्यकामार्फतच आभारी आहे असा संदेश बाहेर पाठवला व दुसऱ्या दिवशी ते प्रायश्चित्तासाठी कराडच्या प्रीतीसंगमाकडे रवाना झाले.

Story img Loader