‘नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत भावी पीएचडीधारकांचा एक मोठा जथा दक्षिण मुंबईतल्या एका मैदानावर आला व हिरवळीवर स्थानापन्न झाला. मग हळूहळू आणखी काहींचे गट त्यांच्यात येऊन मिसळले, बऱ्यापैकी संख्या जमा झाल्याचे दिसताच त्यातल्या एकाने मोठय़ा आवाजात बोलायला सुरुवात केली. ‘‘आम्हाला संशोधनासाठी महिन्याकाठी ३७ हजारांची अधिछात्रवृत्ती मिळते त्यासाठी तुमच्या पोटात दुखायचे कारण काय? यामुळे आमच्यासारख्या मागास व गरीब मुलांच्या पोटाची, पुढील शिक्षणाची सोय होत असेल तर तुम्ही का वाईट वाटून घेता? मतांच्या बेगमीसाठी तुम्ही नाना प्रकारच्या रेवडय़ा वाटता तेव्हा कुठे जाते तुमची आर्थिक शिस्त? हो, हे मान्य की पीएचडीचा स्तर अलीकडे घसरला, मग राजकारणाचाही घसरला त्याचे काय? हेही मान्यच की अलीकडे पीएचडी करूनही नोकरी मिळत नाही, पण शिकल्याचे समाधान तर मिळते. जसे तुम्हाला पक्ष फोडून सत्तेत सामील झाल्यावर मिळाले तसे! संशोधनानंतर नोकरी मिळाली तरच दिवे लागतात असे तुम्ही समजत असाल तर सत्तेसाठी पक्षांतर करून तुम्ही दिवे लावले असे आम्ही समजायचे का? मध्यंतरी तुम्ही धरणात पाणी भरण्यावरून खास शब्दांत चिंता वाहिली होती. आता आमच्या तोंडचे पाणी तुम्हाला पळवायचे आहे का? आम्हा सर्वांचे दारिद्रय़च इतके मोठे की या ३७ हजाराने आमचे खिसे भरू शकत नाही. तुमच्यासारख्या भरलेल्या खिसेवाल्यांना ही व्यथा कशी कळणार? प्रत्येकच संशोधन काही सार्थकी लागत नाही. त्यातले एखादा टक्केच समाजाच्या उपयोगी पडत असते. हे प्रमाण तुमच्या सिंचनक्षेत्रवाढीच्या वेगापेक्षा कमी आहे असे तुम्हाला वाटते काय? पीएचडी केल्यावर आम्हाला शिपायाची नोकरी मिळाली तरी चालते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा