निवडणूक जवळ आल्याने रोज वृत्तवाहिन्यांवर झळकायला मिळणार या आनंदात दादासाहेब तयार होऊन दिवाणखान्यात आले. त्यांना माध्यमांशी बोलताना घ्यावयाच्या खबरदारीसंदर्भात पक्षाकडून आलेले पत्र आठवले. ‘त्यानुसार माझी तयारी करून दे’ म्हणत ते पत्र रात्रीच साहाय्यकाला दिल्याचे लक्षात येताच त्यांनी सदऱ्याच्या खिशाला लावलेले कमळाचे चिन्ह ठीक करत बेल दाबली. साहाय्यक आत आला. ‘हं, कर सुरुवात’ असे म्हणताच तो बोलू लागला. ‘‘पत्रकार उलटसुलट प्रश्न विचारून तुम्हाला सापळ्यात अडकवू शकतात. त्यामुळे तुम्ही कॅमऱ्यासमोर चर्चेसाठी बसले की उलट प्रश्न आल्याबरोबर आपला एक सहकारी तुम्हाला कॅमऱ्याच्या मागून सापळ्याची प्रतिकृती दाखवेल ती बघितली की ‘नो कामेंट’ किंवा ‘नेक्स्ट क्वेश्चन’ म्हणायचे. एखादा अडचणीचा प्रश्न आला व तुम्हाला नेहमीसारखा संताप आला तर तो दाबण्यासाठी लवंग व वेलचीची डबी जवळ ठेवा. अडचणीच्या प्रश्नामुळे नकारात्मक भाव चेहऱ्यावर येताना दिसले की अत्तर लावलेला रुमाल चेहऱ्यावरून हळूच फिरवायचा. त्याचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करेल. या संपूर्ण काळात माध्यमेच नाही तर इतर कुठेही ‘ऑफ द रेकार्ड’ बोलायचे नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा