अभिनयासाठी दोनदा ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळवणारा टॉम हँक्स हा वयाच्या विसाव्या वर्षीपासून नाटकांत काम करू लागला. मग चार वर्षांनी त्याला चित्रपटांत संधी मिळाली. त्यानंतरचे त्याचे अनेकानेक चित्रपट आपल्याला माहीत आहेत. पण पुढे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी टॉम हँक्सचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला.. त्यानंतर आठ वर्षांनी त्याच्या कादंबरीच्या प्रकाशनाची घोषणा होते आहे, हे मात्र जरा विचित्र वाटेल. एकसारख्याच नावाचे दोन टॉम हँक्स नाहीत ना? टॉम हँक्सचं नाव मोठ्ठय़ा अक्षरांत लेखक म्हणून छापायचं आणि खाली कुठेतरी ‘सहलेखक’ म्हणून दुसरंच नाव, असं तर नाही ना? अशा नाना शंका नक्की येतील. त्या ठीकच, कारण आपल्याला माहीत असलेला टॉम हँक्स फॉरेस्ट गम्प, सेिव्हग प्रायव्हेट रायान किंवा अलीकडे गाजलेला द दा विन्ची कोड या चित्रपटांतून अभिनय करणाराच असतो. वयाच्या विशीपासून शेक्सपिअरच्या नाटकांत कामं करणारा, चित्रवाणीवरल्या तीन मालिकांसाठी पटकथालेखन करणारा टॉम हँक्स आपल्याला माहीत नसतो. त्याच्या कथासंग्रहाची आवृत्ती भारतात गेली सुमारे चारेक वर्ष उपलब्ध असूनही तो अनेकांनी वाचलेला नसतो. याचं काय कारण असावं?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा