‘‘जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी । कि परिमळ माझी कस्तुरी ।। तैसी भाषा माझी साजिरी । मराठी असे ।। – श्री संत ज्ञानेश्वर’’ हा गेल्या वर्षीच्या २७ फेब्रुवारीचा संदेश आज पुन्हा का आला? म्हणून चंचलाताई व्हॉट्सअॅप पाहू लागल्या. तो संदेश होता वसईच्या सॅव्हिया ब्रिटो हिनं पाठवलेला. बोरिवलीच्या पुढले कार्यक्रम लांब पडतात म्हणून हिलाच चंचलाताईंनी कधीकाळी सूत्रसंचालनाचा ‘ब्रेक’ दिला होता. पण मराठी भाषा दिनाच्या दोन दिवस आधीच वसईहून आलेला सॅव्हियाचा संदेश केवळ शुभेच्छांचा ‘फॉरवर्ड’ नव्हता. ‘‘पुष्पा माझी? की तुझं ते माझं? संत ज्ञानेश्वर हे संतश्रेष्ठ आहेत, पण फादर स्टीफन्सचं श्रेय त्यांना का देताहात?’’ – अशी मल्लिनाथी सॅव्हियानं केली होती. शिवाय ‘‘तुम्हीच सांगा मॅडम, हे पटतं का तुम्हाला? मी विनंती करते की, यंदा मराठी दिनाला तुमचा कार्यक्रम जिथे कुठे असेल, तिथे हा क्रिस्तपुराणातल्या मराठीस्तुतीचा मुद्दा जरूर मांडा’’ असा आग्रहसुद्धा सॅव्हियानं धरला होता. चंचलाताईंना आजकाल सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम फारसे मिळत नसत, त्यामुळे मुद्दा मांडण्याचा प्रश्नच नव्हता. पण सॅव्हिया त्यांना लख्ख आठवली. मराठी इतकं बोलायची की, ‘बाई नको म्हणू, मॅडमच बरं वाटतं,’ असं सांगावं लागलं होतं तिला. पण चंचलाताईंना त्या ओळी नक्की कुणाच्या, हे काही आठवेना! नाही म्हटलं तरी त्या मराठीच्या जुन्या बीए. स्टीफन्सचे क्रिस्तपुराण २५ मार्काना होतं त्यांना. आणि २५ मार्काला संत ज्ञानेश्वरसुद्धा! त्याच पावली त्या नातीकडे वळल्या. नात तिच्या रूममध्ये लॅपटॉप उघडूनच काहीतरी पाहात होती. ‘निटी, विल यू डू मी अ फेवर?- जरा प्लीज हे सर्च कर ना.. र्अजट आहे..’’ म्हणत त्यांनी फादर स्टीफन्स, क्रिस्तपुराण, मराठी असे कीवर्ड तिला सांगितले. कुठल्याही पुस्तकाची पीडीएफ हुडकण्यात हुशार असलेल्या नेत्रावती ऊर्फ निटी या नातीनं, ‘ओक्के दादीमां..’ म्हणत तसं केलं आणि काही क्षणांत, ‘‘जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी ।
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा