अमेरिकेतून २०५ बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन येणारे लष्करी विमान बुधवारी अमृतसरमध्ये उतरले. ते नवी दिल्लीला उतरवले गेले नाही, याचे कारण संबंधितांची चौकशी करून बेकायदा स्थलांतरितांच्या पाठवणीत सक्रिय असलेल्या टोळ्यांचा छडा लावणे, हे असल्याचे समजते. तसा तो लागल्यास संबंधित टोळ्यांवर आणि त्यांच्या हस्तकांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित बेकायदा स्थलांतरितांमध्ये पंजाब आणि गुजरातमधील मंडळी मोठ्या संख्येने असल्याचे सांगितले जाते. म्हणजे या मुद्द्यावरून तरी किमान राजकीय चिखलफेक होणार नाही ही अपेक्षा. तशी ती होऊ नये कारण हा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यास अनेक कंगोरे आहेत. बेकायदा स्थलांतरितांना ज्या प्रकारे भारतात पाठवून दिले गेले, तो काही प्रश्न उपस्थित करतो. काँग्रेसने आरोप केला, की स्थलांतरितांना हातात बेड्या घालून, अवमानास्पद पद्धतीने भारतात पाठवले गेले. अमेरिकेच्या सी-१७ ग्लोबमास्टर या लष्करी विमानातून कशा पद्धतीने भारतीयांना अमृतसरमध्ये आणले गेले याविषयी अधिकृत तपशील उपलब्ध नाही. खरोखरच त्यांना अवमानास्पद पद्धतीने भारतात पाठवले गेले आणि यापुढेही अशाच प्रकारे इतर बेकायदा स्थलांतरितांना पाठवले जाणार असेल, तर भारत सरकारने याविषयी जाब नाही तरी किमान विचारणा तरी करणे अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा