प्रा. विजय तापस यांना मराठी कविता आणि नाटक या दोन्ही कलाप्रकारांत रस असला तरी नाटक हा कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च पातळीवरचा आविष्कार आहे, कारण नाटक हे थेट जीवनाला भिडणारे असते, अशी त्यांची कायम धारणा होती… आणि ती शेवटपर्यंत तशीच राहिली. त्यांनी १९४७ पूर्वीच्या विस्मृतीत गेलेल्या नाटकांचे विवेचन, विश्लेषण करणारे ‘कस्तुरीगंध’ हे सदर ‘लोकसत्ता’मध्ये २०२२ साली लिहिले होते. ते ‘पुनर्भेट : विस्मृतीत गेलेल्या नाटकांशी’ या नावाने नुकतेच पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहे. ही त्यांची शेवटची शब्दकृती. साहित्य, संस्कृती, कला याबद्दल त्यांना नेहमीच आस राहिली. त्यातून त्यांचे अनेक संशोधन, अभ्यास प्रकल्प उभे राहिले. रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. या कॉलेजच्या ‘नाट्यवलय’चे बराच काळ ते मार्गदर्शक होते. रुईयाचा महाविद्यालयीन नाट्यक्षेत्रात दबदबा निर्माण करण्यात त्यांचा हा सहयोग महत्त्वाचा ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचवेळी वृत्तपत्रे, नियतकालिके यांत त्यांचे साहित्य आणि नाट्यविषयक लेखनही जोमाने सुरू होते. रुईयाचा इतिहास ‘अमृतगाथा’ नावाने कॉफीटेबल बुक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मुंबई विद्यापीठाच्या ‘शहराचे भूषण’ या ग्रंथात प्रमुख संशोधक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. कवी नारायण सुर्वे यांच्या दुर्मीळ कवितांचे संपादन त्यांनी ‘गवसलेल्या कविता’रूपात केले होते. अलीकडेच ‘सत्यकथा’तील निवडक कवितांच्या दोन खंडांचे संपादनाचे मोठे काम त्यांनी हातावेगळे केले होते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay tapas drama ruiya college marathi poetry amy