युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर आपण भारत, चीन आणि ब्राझील या मित्रदेशांबरोबर सतत संपर्कात आहोत अशा आशयाचे विधान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केल्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे देश युक्रेन पेच सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, असे पुतिन यांनी व्लाडिवोस्टॉक येथील एका परिषदेत म्हटल्याचे वृत्त आहे. वस्तुत: युक्रेन युद्धावर दोन वर्षांपूर्वीपासूनच तुर्कीये येथे रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. पण ती फार पुढे सरकू शकली नाही हे उघड आहे. त्याऐवजी युक्रेन आणि रशिया परस्परांसमोर युद्धभूमीवरच पुढे सरकण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. याची जबर किंमत दोन्ही देशांना मोजावी लागत आहे. युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहेच. पण रशियादेखील रणजर्जर झाला आहे. व्लाडिवोस्टॉकमधील त्या परिषदेत, ‘युक्रेनला वाटाघाटी करायच्या असल्यास आमची तयारी आहे’ असेही पुतिन म्हणाल्याचे वृत्त आहे. वास्तविक, युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात आणि विशेषत: गेल्या वर्षभरात रशियाची अर्थव्यवस्था अनपेक्षितपणे तगली आणि वाढलीही. याउलट युक्रेनला शस्त्रसामग्रीपासून ते इतर स्वरूपाच्या मदतीसाठी सध्या सर्वस्वी अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्या देशाची वित्तहानी किती झाली, याची तर मोजदादही झालेली नाही. या युद्धातून सावरण्यासाठी युक्रेनला कित्येक वर्षे आणि अब्जावधी निधी लागणार आहे. तरीदेखील अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या युक्रेनने वाटाघाटींची शक्यता गृहीत धरलेली नाही. या युद्धजन्य वातावरणाच्या परिप्रेक्ष्यात मोदी यांनी गेल्या दोन महिन्यांत दोन्ही देशांना दिलेल्या भेटी आणि पुतिन यांच्या वक्तव्याची सांगड घालावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा