रोज १०० नेत्र शस्त्रक्रिया, रोज १५०० नेत्ररुग्णांवर उपचार, जवळपास हजारभर कर्मचाऱ्यांचा ताफा आणि १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न असा पसारा चालवणाऱ्या शंकर नेत्रालयाची स्थापना हे डॉ. एस. एस. बद्रीनाथ यांचे महत्त्वाचे योगदान. डॉ. सेंगामेदु श्रीनिवास बद्रीनाथ हे भारतभरातल्या गरजू नेत्ररुग्णांसाठी गेली पाच दशके आशेचा किरण ठरले ते त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या या कामामुळेच. १९७८ मध्ये चेन्नईमध्ये सुरू झालेले शंकर नेत्रालय हे भारतामधले सगळय़ात मोठे आणि ना नफा आणि ना तोटा तत्त्वावर चालणारे नेत्र रुग्णालय आहे. परवडणाऱ्या किमतीत चांगले नेत्रोपचार, अंधत्व हाताळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नेत्र आजारांवरील संशोधन ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून त्याची स्थापना झाली आहे. लहानपणी असलेल्या विशिष्ट आजारामुळे बद्रीनाथ यांचे शालेय शिक्षण उशिरा म्हणजे वयाच्या सातव्या वर्षांनंतर सुरू झाले.  त्यांचे आई-वडील त्यांच्या लहानपणीच निवर्तले.  बद्रीनाथ यांना आश्रय देणाऱ्या नातेवाईकांचे अंधत्व आणि त्यातल्या अडचणी बघून बद्रीनाथ यांनी डोळय़ांचे डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. आई-वडिलांच्या आयुर्विम्याच्या पैशातून त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन ‘न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल स्कूल’मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही काळ तिथेच वैद्यकीय प्रॅक्टिसही केली. तिथेच त्यांना वासंती अय्यंगार ही बालरोगतज्ज्ञ असलेली त्यांची सहधर्मचारिणीही भेटली. अमेरिकेतल्या नोकरीत असलेली उत्तम करिअरची संधी सोडून त्यांनी आपले ज्ञान लोकांसाठी वापरायचे ठरवले . १९७० च्या सुमारास ते दोघेही भारतात आले आणि दोघांनीही आपापल्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

साताठ वर्षे खासगी रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर एकदा त्यांनी कांची मठाचे स्वामी एच. एच. चंद्रशेखर सरस्वती यांच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्यांच्या आयुष्याला, कामाला वेगळे वळण मिळाले. कांची मठाशी संबंधित असलेल्या इतर डॉक्टरांशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यानंतर काही काळातच कांची मठाचे आणखी एक स्वामी एच. एच. जयेंद्र सरस्वती यांनी या डॉक्टरांना गरिबांची सेवा करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत १९७८ मध्ये डॉ. बद्रीनाथ यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून शंकर नेत्रालयाची स्थापना केली आणि त्यानंतरचा इतिहास सगळय़ांनाच माहीत आहे.

state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
patients , GBS , maharashtra, ventilator,
राज्यात एकाच दिवसात जीबीएसचे ९ रुग्ण! एकूण रुग्णसंख्या ११० वर; व्हेंटिलेटरवर १३ जण
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
process of getting assistance from the Chief Ministers Relief Fund will be paperless
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया होणार पेपरलेस!

डॉ. बद्रीनाथ यांना त्यांच्या कामासाठी १९८३ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तमिळनाडूच्या डॉ. एमजीआर मेडिकल युनिव्हर्सिटीने १९९५ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट दिली. आपल्या कामातून अनेक आयुष्ये उजळवत डॉ. बद्रीनाथ यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Story img Loader