‘‘देशातील २०० अब्ज टन कोळशाचे साठे पुढील शतकापूर्वी संपतील. जलविद्युतचा स्रोत असलेले पाणी जरी उपलब्ध राहिले, तरी एकूण गरजेपेक्षा खूपच कमी पातळीवर. त्या वेळचा विचार करून, आतापासूनच अणुऊर्जेकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. ‘अप्सरा’ या १९५६ मधील पहिल्या अणुभट्टीपासून आजतागायत भारतीय अणुभट्टय़ांची सुरक्षितता वादातीत राहिलेली आहे. या सुरक्षिततेची भारतीय मानके उच्च दर्जाचीच आहेत, त्यामुळे अणुऊर्जा असुरक्षित असल्याची आवई उठवू नये.’’ इतक्या स्पष्ट शब्दांत अणुऊर्जेचा कैवार घेणारे बिकाश सिन्हा हे स्वत: मात्र वीजनिर्मितीखेरीज अणुविघटनाचे अन्य शांततामय उपयोग शोधून काढण्यासाठी, आणि हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही वापरायोग्य असावे यासाठी प्रयत्नशील होते.

‘देवकण’ (गॉड पार्टिकल) शोधून काढणाऱ्या आणि त्याहीपुढला वेध घेऊ पाहणाऱ्या ‘सर्न’ या युरोपीय प्रयोगशाळेसाठी सन २०१२ मध्ये तब्बल एक लाख दहा हजार ‘मानस’ (मल्टिप्लेक्स्ड अ‍ॅनालॉग सिंगल प्रोसेसर) चिप बनवण्याचे काम कोलकात्याच्या ‘साहा इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ने केले, ते सिन्हा यांच्याच मार्गदर्शनाखाली. साहा इन्स्टिटय़ूटसह, कोलकात्याच्याच ‘व्हीईसीसी’ (व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर) या संस्थेचेही सिन्हा हे संचालक होते. या ‘व्हीईसीसी’ने सन २००१ मध्ये भारतातील पहिला ‘वैद्यकीय सायक्लोट्रॉन’ उभारला. यातून ३० एमईव्ही (दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट) प्रोटॉन विघटित होऊन त्यांच्यापासून पुढे विविध किरणोत्सारी समस्थानिके (आयसोटोप) मिळू शकतात, जी वैद्यकीय उपचार अथवा निदानामध्ये उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, पॅलेडियमचे समस्थानिक हे पुरस्थ ग्रंथींच्या कर्करोगाचे निदान तसेच उपचारांत उपयोगी पडू शकते, तर थॅलियमचे ‘थॅलियस क्लोराइड’ या समस्थानिकाचा वापर हृद्रोगावरील उपचारांत होऊ शकतो.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

‘वल्र्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो (२००२), जर्मनीच्या अलग्झांडर हम्बोल्ट विज्ञानसंस्थेतर्फे प्रतिष्ठेचा संशोधन-पुरस्कार (२००५), ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’चे अध्यक्षपद (२००७), लंडनच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स’चे फेलो (२००९) हे सन्मान त्यांच्या अभ्यासक्षेत्रातील मोठे. भारत सरकारनेही ‘पद्मश्री’ (२००१) व ‘पद्मभूषण’ (२०१०) किताबांनी त्यांना गौरविले होते. अनेक विज्ञान-शिक्षण संस्थांचे पदाधिकारी अथवा मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेच, पण २००९ पर्यंत पंतप्रधानांच्या विज्ञान-सल्लागार मंडळातही ते होते.

प. बंगालमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सत्ताकाळ आणि सिन्हा यांचा विविध संस्थांतील कार्यकाळ एकाच वेळी सुरू असला तरी, वैज्ञानिक महत्त्व सत्ताधाऱ्यांना पटवून देऊन जमिनीपासून निधी-पुरवठय़ापर्यंतची अनेक कामे मार्गी लावण्याचे कसबही मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या लहानशा गावात बालपण घालवून मग कोलकात्यास आलेल्या सिन्हांकडे होते. अणुविघटनाचा एक उपयोग ऊर्जानिर्मिती, हे सर्वज्ञात आहेच. पण त्यापलीकडचा विचार करून प्रयोग करणारा शास्त्रज्ञ व मार्गदर्शक सिन्हा यांच्या निधनामुळे हरपला आहे.

Story img Loader