अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, ते कधीच संपत नाहीत. जयपूर घराण्याच्या कलावंत माणिकताई भिडे यांनी आयुष्यभर हे कष्ट घेतले आणि कलावंत म्हणून स्थान निर्माण केले. माणिकताईंसाठी हे अधिकच अवघड होते, याचे कारण त्यांच्या गुरू किशोरीताई आमोणकर या एक अतिशय प्रतिभाशाली कलावंत होत्या. त्यांच्याकडून विद्या मिळवणे आणि त्यामध्ये भर घालून आपली प्रतिभाही टवटवीत ठेवणे अतिशय अवघड. त्या प्रतिभेचे, सर्जनाचे आव्हान पेलता येण्यासाठी शिष्याकडेही तेवढीच बौद्धिक क्षमता असावी लागते. जयपूर घराण्याच्या पेचदार गायकीमध्ये भावदर्शनाची जोड देण्याचे काम किशोरीताईंनी केले. काळाच्या सरकत्या चकत्यांचे भान ठेवून घराण्याची मूळ चौकट तसूभरही न मोडता, त्यात नवनव्या अलंकारांची भर घालून गायकी श्रीमंत करण्याचे हे कार्य वाटते तितके सोपे नव्हतेच. असामान्य बुद्धीच्या आणि सर्जनाच्या जोरावर करण्यासाठीही कमालीचे धैर्य लागते. किशोरीताईंकडे ते होते, म्हणूनच जयपूर घराण्याच्या या शैलीलाही रसिकांनी भरभरून दाद दिली. किशोरीताईंच्या सहवासात दीर्घकाळ राहून माणिकताईंनी आपली म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. हे काम फारच अवघड.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा