‘ज्यांच्यासाठी सत्य आणि अिहसा हे जीवनाचे मूलभूत तत्त्व होते, त्या गांधीजींच्या भूमीत आपण राहातो. ‘सत्यं वद। र्धम चर’ हे सांगणाऱ्या वेदांवर आपण दावा सांगतो. आपल्या देशाचे ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे. पण वास्तवात भारतासारखा भ्रष्ट देश कोणताही नसेल,’ भारतीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर इतक्या परखडपणे भाष्य करणारे माजी केंद्रीय दक्षता आयुक्त नागराजन विट्ठल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी, ३ ऑगस्ट रोजी चेन्नईत निधन झाले. केंद्रीय दक्षता आयुक्त हे विट्ठल यांच्या ३५ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीतील शेवटचे पद. मात्र, चार वर्षांच्या त्या कार्यकाळात विट्ठल यांनी या पदाला धार प्राप्त करून दिली. सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचाराची त्यांना कमालीची चीड होती आणि या किडीचा नायनाट करण्यासाठी जालीम उपाय राबवण्याच्या मतांचे ते होते. सीबीआय, ईडी आदी यंत्रणांच्या प्रमुखांची नियुक्ती दक्षता आयुक्तांमार्फत करण्याबाबत ते कायम आग्रही राहिले. प्रशासकीय व्यवस्थेतील दिरंगाई हटवून तीत पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याची गरज त्यांच्या पुस्तकांतूनही व्यक्त होते. हे तत्त्व खुद्द विट्ठल यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत काटेकोरपणे पाळले. १९६०मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या विट्ठल यांची सुरुवातीची कारकीर्द गुजरातमध्ये घडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा