संयुक्त अरब अमिरातीलमधील (यूएई) सर्वात यशस्वी व्यवसायांपैकी एक असलेल्या लँडमार्क समूहाचे सर्वेसर्वा मुकेश जगतियानी यांची संघर्षांची कहाणी २६ मे रोजी झालेल्या त्यांच्या निधनानंतर पुन्हा चर्चेत आली. संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढत संयुक्त अरब अमिरातींमधील (यूएई) सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक बनलेल्या जगतियानींच्या आयुष्यात चढउतार बरेच आले.  त्यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून सुरुवात केली होती. अनेकदा हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम केले. मात्र व्यवसायाचा कोणताही अनुभव हाताशी नसतानाही ते बहरीनमध्ये उतरले आणि तिथे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काही अब्ज डॉलरचे साम्राज्य उभे केले.

कुवेतमध्ये जन्मलेल्या जगतियानी यांचे शालेय शिक्षण भारतात चेन्नई आणि मुंबईतून झाले. भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी लंडनमधील एका अकाऊंटिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र व्यवसाय करण्याची ओढ शांत बसू देत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून लंडनमध्येच ‘टॅक्सी ड्रायव्हर’ म्हणून काम सुरू केले. आयुष्यात आलेल्या अडथळय़ांना ते प्रगतीचे टप्पे समजून मार्गक्रमण करत गेले. मात्र आई-वडील आणि भावाच्या निधनाने मोठा धक्का बसला आणि तिथून गोष्टी पूर्णपणे बदलल्या. याचमुळे ते बहरीनमध्ये स्थलांतरित झाले. त्यांनी मृत भावाचे दुकान ताब्यात घेतले. दुकानाचे रूपांतर लहान मुलांच्या उत्पादनांच्या दुकानात केले, जे त्यांनी १० वर्षे यशस्वीपणे चालवले. त्यानंतर त्याच्या जोरावर ६ नवीन दुकाने सुरू करून व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र लवकरच आखाती युद्ध सुरू झाले आणि जगतियानी यांना दुबईला जावे लागले. इथेच लँडमार्क समूहाचा जन्म झाला. त्यांनी मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियातील फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि हॉटेल व्यवसायात प्रवेश केला. ‘लँडमार्क’मध्ये सध्या सुमारे ४५ हजारांहून अधिक लोक कार्यरत आहेत आणि पर्शियन आखाती प्रदेश, मध्यपूर्व आणि भारतामध्ये २,२००हून अधिक दालने सुरू करण्यात आली आहेत.

prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
cm devendra fadnavis on beed sarpanch murder case
Beed Sarpanch Murder Case: मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाले, “आता मला एकच…”

 जगतियानी यांनी २००८ मध्ये ब्रिटनमध्ये महागडी उत्पादने विकणाऱ्या ‘डेबेनहॅम्स’मध्ये सहा टक्के हिस्सेदारी विकत घेतली. यामुळे ते ‘फोर्ब्स’च्या अब्जाधीशांच्या यादीत झळकले. लवकरच दोन अब्ज डॉलर संपत्तीसह सोळावे सर्वात श्रीमंत भारतीय बनले. ‘फोर्ब्स’च्या म्हणण्यानुसार, मे २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३ अब्ज अमेरिकी डॉलर होती. तर विद्यमान २०२३ मध्ये त्यांच्या  संपत्तीने ५.२ अब्ज अमेरिकी डॉलरचा उच्चांक गाठला होता. दरवर्षी सरासरी सुमारे ९.५ अब्ज डॉलरची कमाई करणारा आणि चौदा नाममुद्रा (ब्रॅण्ड) समाविष्ट असणारा ‘लँडमार्क समूह’ मागे सोडून जगतियानी गेले आहेत.

Story img Loader