सध्या काँग्रेसची एक फसवी जाहिरात टीव्हीवर दाखविली जाते. एक माणूस स्वप्नात दहा वर्षांमध्ये झालेल्या सुधारणांचा विचार करतो. जसे एटीएम मशीन, मोबाइल सुविधा, मेट्रो, उड्डाण पूल, विमानतळ असे. आता यातील एक एक बाब नीट स्पष्ट समजावून घेऊ.
प्रथम एटीएम मशीन्स- पहिली एटीएम मशीन भारतात एचएसबीसी या विदेशी बँकेने १९८७ मध्ये उभारली. एटीएम मशीन्स तसे तर बँकांच्या सुधारित सेवा प्रणालीमध्ये जास्तीतजास्त ग्राहक व त्याद्वारे फायदा या तत्त्वावर आलेल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाचे काहीही श्रेय नाही.
आता दुसरे मोबाइल सुविधा – काँग्रेस पक्षाच्या काळात इनकिमग कॉल्सवरसुद्धा पैसे पडत होते. भाजपच्या काळात प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नामुळे व अंबानी यांच्यामुळे मोबाइलवरील इनकिमग शुल्क बंद झाले. तसेच ५०० रुपयांत चक्क शेतकरी, रिक्षावाले व फेरीवाले यांच्याही हातात मोबाइल आले. याउलट कॉँग्रेस पक्षाने केलेला २ जी घोटाळा आठवा.
तिसरे मेट्रो रेल्वे घेऊ – भारतात ब्रिटिश राजवटीला १८५८ मध्ये खरी सुरुवात झाली. त्याआधीच १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वे धावली. परंतु भारत स्वतंत्र झाल्यावर ३७ वर्षांनी पहिली मेट्रो कोलकाता येथे आली. परंतु राजधानी दिल्लीत सुरू होण्यास ५५ वष्रे लागली. जगाची दुसरी आíथक राजधानी मुंबईत धावण्यास अजून अवकाश आहे. याला चांगली कामगिरी म्हणावी की खराब.
आता उड्डाण पुलांचे म्हणाल तर – महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना व भाजप यांची सत्ता आल्यावर ५१ उड्डाण पूल व ऐतिहासिक मुंबई पुणे द्रुतगती मार्ग बांधला गेला. परंतु वर्षांनुवष्रे कॉँग्रेसचीच सत्ता असूनसुद्धा उड्डाण पूल व महामार्ग, चांगले रस्ते बांधण्यास विलंब होत आहे. उदा. वांद्रे वरळी सेतू (१३ वष्रे). लालबाग उड्डाण पुलाला उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खड्डे पडले (ही गुणवत्ता?). सुरू असलेले टोलनाके म्हणजे ‘रस्ता नको पण टोल आवर’ अशी अवस्था. आता विमानतळे घेऊ – यात काँग्रेस पक्षाने काय खिशातला पसा दिला? याउलट घोटाळेच केले. ऊअकछ घोटाळा पाहा. जर जनतेने काँग्रेसने केलेल्या घोटाळ्यांचे स्वप्न जरी पाहिले तरी तो स्वप्नात आत्महत्या करेल. आमचे शेतकरी बंधू तर रोजच आत्महत्या करताहेत. आणि काँग्रेसचे नेते खोटय़ा नोंदी करून सरकारचे पॅकेज लुबाडतात. स्वप्नातून जागे होण्याची वेळ आली आहे. सर्वानी मतदानात भाग घेऊन योग्य सरकार निवडण्याचा अधिकार बजावलाच पाहिजे.
शशिकांत यादव
काँग्रेसची फसवी जाहिरात आणि वास्तव
सध्या काँग्रेसची एक फसवी जाहिरात टीव्हीवर दाखविली जाते. एक माणूस स्वप्नात दहा वर्षांमध्ये झालेल्या सुधारणांचा विचार करतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2014 at 12:54 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress deceptive advertising and the fact