‘हे पापच..’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया, ज्याद्वारे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वष्रे झाली. परंतु मतदान प्रक्रियासुद्धा व्यवस्थित पार पाडू शकत नाही. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. ज्या परिसरात गेली ४० वष्रे आम्ही राहतो व नेहमी मतदानाचा हक्क बजावतो, त्याच मतदारसंघातून अचानक आमची नावेच वगळण्यात यावीत याला काय म्हणावे? हे नक्कीच ‘एखाद्या’ राजकीय पक्षाचे कारस्थान असल्याचा दाट संशय येतो! मतदान ओळखपत्र असूनही त्याचा या मतदानाच्या वेळी काहीच उपयोग झाला नाही. या मतदानाच्या निमित्ताने मला अजून एक गोष्ट निदर्शनास आणावीशी वाटते की जुन्या आणि नव्या मतदार ओळखपत्रांवरील क्रमांकांमध्ये साधम्र्य नाही. रटर पाठवून मतदार यादीतील नाव असण्याची खात्री करण्याचा प्रयत्न केला असता, तोही फोल ठरला. जनगणनेतील माहितीचा मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी उपयोग करणे अपेक्षित होते. परंतु आपल्या यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञान अंगीकृत केले जाते, पण त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी अजिबात होत नाही. उलट त्याचा फज्जाच उडतो असा अनुभव विविध प्रक्रियांमध्ये आढळून येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा