‘यूपीए-२’च्या घरघर लागलेल्या इंजिनला पंतप्रधानांनी नव्या दमाचे डबे लावायला हवे होते; पण त्यांनी फेरबदलातही वय वर्षे ५६ ते ८५ असे लोक मंत्रिमंडळात आणले. वास्तविक त्याच दिवशी (१७ जून) जागतिक अहवाल आला आहे की, आणखी अवघ्या १५ वर्षांनी भारताची लोकसंख्या १४५ कोटींवर जाईल. सकारात्मक बाब ही आहे की, तरुणांची संख्या जास्त असल्यावर ‘वर्क फोर्स’ जास्त असेल. आजही तरुणांची संख्या अधिक आहे.
अशा देशाचे राज्यकत्रेही तरुण असणे आवश्यक आहे, पण रिटायर होणाऱ्या लोकांना डोक्यावर आणून बसवणे योग्य आहे का? अनुभवी लोक हवेत म्हणून आणले म्हणावे तर, मंत्रिमंडळात फेरबदल केले, कारण अगोदरचे बहुतेक तुरुंगात गेले किंवा खटले चालू असल्यामुळे पायउतार व्हावे लागलेले सर्व अनुभवीच होते. तरुण म्हटले की मिलिंद देवरा, सचिन पायलट यांची नावे पुढे केली जातात. तरुण मंत्री असे दिले जातात की, त्यांच्यावर विश्वास का ठेवावा हाच प्रश्न.. नवीन नावाचे नवीन राहिले नाहीत असे जिंदल हे असेच एक उदाहरण.. त्यांच्यावरही खटला चालू होईल. ही मंडळी वडिलांच्या नावावर निवडून येऊन मंत्रिमंडळात बसली. आम आदमीची पार्टी म्हणून कुणी आम आदमी निवडून येऊन मंत्री झाले आहे का?
प्रसाद अ. कुलकर्णी, साकीनाका (मुंबई )
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा