‘माध्यमस्वातंत्र्याचा ‘अर्थ’ ’ या शनिवारच्या संपादकीयात (१५ फेब्रुवारी )भारतातील माध्यमस्वातंत्र्याच्या अवस्थेवर नेमके भाष्य करताना ‘अळीमिळी गुपचिळी स्वरूपाची घातक धनधार्जणि संस्कृती माध्यमांत फोफावत असल्याचे’ म्हटले आहे. परंतु अतिशय समतोल विचार मांडलेल्या सदर अग्रलेखाची शाई वाळते न वाळते तोच ‘लोकसत्ता’ने ‘कुडमुडे कुडतोजी’ या अग्रलेखात (१७ फेब्रुवारी ) केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षावर (भंपक कंपू, नतिकतेचा दंभ, इ. ) आगपाखड करून पक्षपाती लेखनाचा नमुना दिला आहे.
भारताच्या राजकारणात आणि अर्थकारणात बदल होण्यासाठी नवीन विचारसरणीची गरज असून प्रस्थापित नेते आणि पक्षांना शह देणे आवश्यक आहे. साठ वष्रे सत्तेत राहून या मंडळींनी प्रचंड भ्रष्टाचार करून देशाला आíथक हलाखीत आणून सोडले आहे. यातील दोन बलाढय़ पक्षांनी राहू – केतूप्रमाणे देशाला ग्रासले असून या मंडळींना मागे सारणे अवघड असूनही केजरीवालांनी केवळ दोन वर्षांत दिल्लीतील मतदारांना आपलेसे करून सरकार स्थापनेपर्यंत मजल मारली, हे यश लहानसहान नाही.
भले हा प्रयत्न फसला असेल. परंतु त्या सरकारच्या प्रत्येकच कामातील फक्त दोषांवर बोट ठेवून त्यांना कुठलेच श्रेय न देण्याचा पक्षपाती दृष्टिकोन अग्रलेखाच्या प्रत्येक शब्दात जाणवतो. या देशाचे भले होण्यासाठी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि धर्माधता यांच्याशी सामना करणे आवश्यक असून त्यासाठी केजरीवालांसारख्या व्यक्ती किंवा असे पक्ष याशिवाय दुसरा कोणता पर्याय असल्यास तो कोणता हे तरी एकदा जनतेला सांगितले जावे.
राजकारणात सुशिक्षित आणि सभ्य व्यक्तींनी यावे आणि जोवर ते असे करत नाहीत तोवर त्यांना प्रचलित व्यवस्थेवर बोलण्याचाही अधिकार नाही असे म्हटले जाते. मग केजरीवाल आणि त्यांचा पक्ष यांच्यावर एवढी आगपाखड करण्याचे कारण काय? त्यांच्या पक्षाने मेधा पाटकर यांना उमेदवारी देऊन एक चांगले उदाहरण जनतेसमोर ठेवले नाही काय? केजरीवालांचे सरकार ४८ दिवसच चालले असले तरी बेहत्तर; पण प्रस्थापितांना वेगळा विचार करायला लावणारे, त्यांच्या वृत्तीला शह देणारे असे प्रयोग लोकशाहीत व्हायलाच हवेत. त्याने देशाचे फार काही बिघडणार नाही. त्याहून जास्त आधीच बिघडवण्यात आले आहे.
सरतेशेवटी अग्रलेखात केजरीवालांची जी संभावना केली आहे तीदेखील अप्रस्तुत वाटते. असे बलिदान वाया जात नाही, त्या सनिकांचे गौरवाने नामकरण होते, इतिहासात त्याची नोंद होते, साडेतीनशे वष्रे ते कृत्य (लोकसत्तासह) कोणी विसरत नाही.
केजरीवाल आणि त्यांचा पक्ष आज अयशस्वी दिसत असला तरी त्याची कारणे शोधून त्यांवर मात करण्याची गरज आहे. त्यांना केवळ टीकेचे लक्ष्य न करता सकारात्मक दृष्टिकोन मांडून त्यांच्या विचारांना व कृतीला पाठबळ देण्याची गरज आहे. यासाठी माध्यमांना स्वातंत्र्य आहे, याची प्रचीती वाचकांना मिळावयास हवी.
मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)
माध्यमस्वातंत्र्य.. कुडमुडेच?
‘माध्यमस्वातंत्र्याचा ‘अर्थ’ ’ या शनिवारच्या संपादकीयात (१५ फेब्रुवारी )भारतातील माध्यमस्वातंत्र्याच्या अवस्थेवर नेमके भाष्य करताना ‘अळीमिळी गुपचिळी स्वरूपाची घातक धनधार्जणि संस्कृती माध्यमांत फोफावत असल्याचे’ म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2014 at 04:09 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism on aam aadmi party