भाजपला गुजरातमध्ये पराभूत केले जाऊ शकते का? आपल्याच राज्यातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजयाची नामुष्की स्वीकारावी लागणार का? देशातील राजकीय वातावरणाला नाटय़मय वळण लागेल का? असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे आडाखे- अंदाज मी दोन महिन्यांपूर्वी फेटाळले असते. पण आता जरा वेगळी परिस्थिती आहे. भाजप हा गुजरातमधील केवळ सत्ताधारी पक्ष उरलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये जशी डाव्यांची मक्तेदारी होती तशी गुजरातमध्ये भाजपची आहे. १९९१च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप या राज्यात एकही निवडणूक हरलेला नाही. त्यानंतरच्या पाच विधानसभा निवडणुकांत भाजपने काँग्रेसवर मात केली. भाजपचे वर्चस्व हे केवळ निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यामुळे गुजरातच्या संपूर्ण समाजावर भाजपने कब्जा केला. उद्योग, व्यापार, सहकार, माध्यमे, शिक्षण संस्था यात सगळीकडे भाजपचे वर्चस्व निर्माण झाले. काँग्रेस हा अत्यंत नगण्य असा विरोधी पक्ष म्हणून तग धरून राहिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा