मित्रांनो, निवडणुकांचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पुन्हा एकदा निवडणूक पाहणी निकालांची बहारही त्या जोडीला सुरू झाली आहे. काळी जादूवाले, भविष्य वर्तवणारे, अंदाज वर्तवणारे यांना पुन्हा बरकतीचे दिवस आले आहेत. चहा, कॉफी व दारूच्या पेगवर निवडणूक चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. माझाही पूर्वजन्म अशा निवडणूक अंदाज करणाऱ्यांचाच. त्या वेळी मी थापेबाजीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असे, खोटेपणा करून काही तरी वातावरणनिर्मिती करण्याचा खेळ करण्याचा मोह टाळत असे. त्यात मी किती यशस्वी झालो हे मला माहिती नाही; पण आज जेव्हा त्या खेळापासून दूर उभे राहून मी निवडणुकीच्या निकालांबाबत भविष्यवाणी व विश्लेषणे पाहतो तेव्हा मला राहून राहून हसू येते. दूरचित्रवाणी वाहिन्यांतील हे कथित लोक कुठलाही आधार नसताना एखादी छोटीशी गोष्ट असा मालमसाला लावून सांगतात व आभासी गूढ निर्माण करतात, की आपणही त्यांच्या मोहमायेत फसत जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा