आधीच वाढवली होती पण आता नव्याने तीच घोषणा करण्यात आली. गरिबांसाठी घराच्या योजनेत केवळ कर्जाची मर्यादा सहा लाखांवरून ९ लाख करण्यात आली, त्याने काहीच होणार नाही कारण ही योजना आधीच अपयशी ठरली आहे. शेतकऱ्यांना त्यात काहीच नव्हते. केवळ मागील दोन पीक कर्जातील ६० दिवसांचे व्याज माफ करण्यात आले. पण सरकारने पन्नास दिवस सहकारी बँका बंदच ठेवल्या होत्या त्यामुळे ते करावेच लागले असते. शेतकऱ्यांना नोटाबंदीमुळे शेतमालात व बियाणे खरेदीत तोटा झाला, त्याची भरपाई कोण देणार. माझे मन विझल्यागत होऊ लागले पण आशा पाठ सोडत नव्हती कारण मॅजिक शोमध्ये म्हणजे जादूच्या खेळात केव्हा काय होईल सांगता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला प्रश्नोत्तराची प्रतीक्षा होती. नोटाबंदी तर झाली पण लूटबंदी केव्हा होणार असा प्रश्न पडला. काळा पसेवाल्या इतरांवर केव्हा आघात होणार. जडजवाहीर हिरे, जमीन जुमला व शेअर्स यांच्या रूपात काळा पसा बाळगणाऱ्यांची शंभरी केव्हा भरणार? परदेशात काळा पसा पांढरा करणाऱ्यांचा धंदा केव्हा बंद होणार? राजकीय पक्षांच्या निधी पुरवठय़ाला केव्हा लक्ष्य केले जाणार असे अनेक प्रश्न होते. राजकीय पक्षांवर काय बंदी घालणार का?

२०१६ मधील तो अखेरचा दिवस होता. आताच्या मायावी युगातील दूरचित्रवाणीचा पडदा माझ्यासमोर होता, पडद्यावर देशातील सर्वात मोठा जादूगार दिसत होता. ४३ मिनिटांचा तो मॅजिक शो म्हणजे जणू जादूचा खेळ होता, सगळ्या देशाबरोबरच मी तो मॅजिक शो बघत होतो.

आज अनेक रहस्ये उलगडणार होती, देश सत्याला सामोरा जाणार होता (सच का सामना).५० दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी नोटाबंदी केली होती, लोकांना त्यांनी काही अडचणी सोसण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्ष काही तरी सांगत राहिले पण लोकांनी आपले दु:ख विसरून नोटाबंदीचे समर्थन केले. पंतप्रधानांनी ५० दिवस मागितले होते व जनतेने खुल्या मनाने ते दिले. त्यांना कुठले प्रलोभन दाखवले नव्हते पण कुणीतरी देशातील काळा पसा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे या आशेपोटी त्यांनी सारे हाल सोसण्याची तयारी दाखवली. आता पन्नास दिवसांनी हिशेब देण्याची वेळ आली होती.

जादूगाराने छडी फिरवली. पडद्यावर गांधीच बोलत होते. प्रत्येक माणसात कमजोरी असते, विकृती असते पण त्यातून मुक्त होण्याची त्याची तयारी नसते. गेल्या पन्नास दिवसांत देशातील एक शुद्धी यज्ञ मात्र यातून बाहेर पडण्याच्या इच्छेची साक्ष देतो. लोकांनी धर्य, शिस्त व संकल्प शक्तीचा आदर्श घालून दिला. जेव्हा खरेपणा व चांगुलपणाला सरकारचा वरदहस्त मिळेल, तेव्हा देश पुढे जाईल, असे जादूगार सांगत होता. मला वाटले मी एका नेत्याचे नव्हे तर राष्ट्रनिर्मात्याचे भाषण एकत आहे. देशाच्या आंतरिक ऊर्जेला जागृत करण्याची इच्छा मनात आली.

तेवढय़ात जादूगाराने पुन्हा छडी फिरवली, तेव्हा माझ्यासमोर सरदार पटेल यांची प्रतिमा होती. बरोबरला बरोबर.. चूकला चूक म्हणणारे ते स्पष्टतावादी नेते होते. त्यात कुणाची भीडभाड ते ठेवत नसत. सत्य हे आहे, की मोठय़ा मूल्याच्या नोटांचा वापर काळ्या पशांसाठी होत होता. देशात २४ लाख लोक दरवर्षी १० लाखांहून अधिक उत्पन्न घोषित करतात. हे खरे असू शकते का? हे सत्य होऊ शकते का? सरकार सज्जनांचे मित्र आहे व दुर्जनांना ठिकाणावर आणण्यास सज्ज आहे. जर कुणी बँक कर्मचाऱ्याने अपराध केला असेल, तर त्याला सोडले जाणार नाही. तो जादूगार सांगत होता. मी त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नव्हतो पण ऐकताना छान वाटत होते.

माझ्यासारख्या अनेक लोकांची उमेद वाढत होती. आता पंतप्रधान सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. पन्नास दिवस देशाने त्याग केला, मग किती काळा पसा पकडला गेला? किती नोटा बँकेत जमा झाल्या? बँकांनी किती नवीन नोटा जारी केल्या? आता किती दिवसांत लोक खात्यातून पसे काढू शकतील? लोकांना अनावश्यक जो त्रास झाला त्याची पंतप्रधान कबुली देतील असे वाटत होते. कुठल्याही मोठय़ा कामात काही चुका होतात त्यामुळे काही चूक झाली असेल, तर पंतप्रधान जनतेसमोर खुल्या दिल्याने मान्य करतील. लोकांनी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून पन्नास दिवस अडचणी सहन केल्या, सरकारच्या छोटय़ा मोठय़ा चुका नजरेआड केल्या.

तेवढयात ब्रेकची वेळ झाली. नंतर इंदिरा गांधींची प्रतिमा दिसू लागली. आता युगपुरुष किंवा राष्ट्रनिर्मात्याच्या जागी एक लोभस राजनेता बोलत होता, असे वाटत होते, की मी अर्थसंकल्पीय भाषण ऐकतो आहे किंवा कर्ज मेळ्यातील घोषणा एकत आहे. सत्य व चांगुलपणा यांच्या गोष्टी करता करता एकएक लॉलीपॉप दाखवणे जादूगाराने सुरू केले पण लॉलीपॉप उघडले तर काय निम्म्या गोष्टी खोटय़ा होत्या, काहीतर जुन्याच योजना नव्याने सांगितल्या होत्या, काही बाबतीत दावे मोठे होते पण प्रत्यक्षात फार काही नव्हते. गर्भवती महिलेला सहा हजार रुपये देण्याची घोषणा तर सरकारने दोन वष्रे आधीच अन्न सुरक्षा कायद्यात केली होती. लहान उद्योजकांची कर्जमर्यादा आधीच वाढवली होती पण आता नव्याने तीच घोषणा करण्यात आली. गरिबांसाठी घराच्या योजनेत केवळ कर्जाची मर्यादा सहा लाखांवरून ९ लाख करण्यात आली, त्याने काहीच होणार नाही कारण ही योजना आधीच अपयशी ठरली आहे. शेतकऱ्यांना त्यात काहीच नव्हते. केवळ मागील दोन पीक कर्जातील ६० दिवसांचे व्याज माफ करण्यात आले. पण सरकारने पन्नास दिवस सहकारी बँका बंदच ठेवल्या होत्या त्यामुळे ते करावेच लागले असते. शेतकऱ्यांना नोटाबंदीमुळे शेतमालात व बियाणे खरेदीत तोटा झाला, त्याची भरपाई कोण देणार. माझे मन विझल्यागत होऊ लागले पण आशा पाठ सोडत नव्हती कारण मॅजिक शोमध्ये म्हणजे जादूच्या खेळात केव्हा काय होईल सांगता येत नाही.

मला प्रश्नोत्तराची प्रतीक्षा होती. नोटाबंदी तर झाली पण लूटबंदी केव्हा होणार असा प्रश्न पडला. काळा पसेवाल्या इतरांवर केव्हा आघात होणार. जडजवाहीर हिरे, जमीन जुमला व शेअर्स यांच्या रूपात काळा पसा बाळगणाऱ्यांची शंभरी केव्हा भरणार? परदेशात काळा पसा पांढरा करणाऱ्यांचा धंदा केव्हा बंद होणार? राजकीय पक्षांच्या निधी पुरवठय़ाला केव्हा लक्ष्य केले जाणार असे अनेक प्रश्न होते. राजकीय पक्षांवर काय बंदी घालणार का?

जादूगाराने पुन्हा छडी फिरवली, पण काहीच झाले नाही. या वेळी पडद्यावर नरेंद्र मोदी दिसत होते. वेगवेगळे आकडे सांगत होते पण देशाला जे आकडे त्यांनी सांगणे अपेक्षित होते ते मोदी सांगत नव्हते. पन्नास दिवसांनंतर उत्तरे देण्याएवजी प्रश्न विचारत होते. काळा पशाच्या प्रश्नावर ते गप्प होते. बाकींच्या वर र्निबध लादताना आपल्यावर काही र्निबध लादून घेणे त्यांना पसंत नव्हते म्हणजे राजकीय पक्षांच्या निधीपुरवठय़ाबाबत ते काही बोलत नव्हते. त्यावर ते एवढेच म्हणाले, की सर्व पक्षांनी त्यावर मतक्य करावे. पण व्यापारी व जनतेला असे स्वातंत्र्य का नाही, की आपल्यावर कुठले र्निबध असावेत हे त्यांनाच ठरवता यावे. राजकीय सुधारणांच्या मुद्दय़ावर वेगळीकडेच लक्ष वळवण्यासाठी पंतप्रधानांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे पिल्लू सोडून दिले, त्याचा काळा पसा व नोटाबंदीशी काही संबंध होता का? काळा पशांचा प्रश्न मंचावर उभा होता पण जादूगार तो गायब करण्यासाठी काळी जादू करीत होता पण ते काही त्याला जमत नव्हते. जादूचे पितळ उघडे पडले होते. हातचलाखी पकडली गेली होती. जादूगार एकटाच मंचावर उभा होता. काहीतरी बडबडत होता, चंपारणचे गांधी नावाचा एकच मंत्र म्हणत होता पण लोक पडद्यासमोरून उठून जात होते. जादूगाराने अचानक खेळ थांबवला.

मी पण उठून उभा राहिलो, जादूगाराला धन्यवाद दिले अशासाठी, की त्याने आमचे डोळे उघडले. काळा पशांचा मुकाबला काळ्या जादूने करता येत नाही. दहा शीर्षांच्या या राक्षसावर ते लोक कधीच बाण मारणार नाहीत, ज्यांच्या तिजोऱ्याच त्या राक्षसाच्या ताब्यात आहेत. हे काम शेवटी तुम्हाला-मलाच करावे लागेल. नवीन वर्षांचा हाच संकल्प असला पाहिजे.

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

लेखक ‘स्वराज  इंडिया’चे अध्यक्ष आहेत.

 

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important decisions taken by narendra modi in