आधार कार्डाच्या आधारे थेट गरिबांच्या बँकखात्यांत अनुदानाची रक्कम जमा करण्याच्या नव्या योजनेत प्रचलित व्यवस्थेतील अंगभूत दोषांवर पर्याय ठरण्याची ताकद आहे. बहुतेकजण प्रचलित व्यवस्थाच सोडण्यास तयार नसतात, म्हणून नव्या योजनेत खुसपटे काढली जातात. त्या आक्षेपांचा हा प्रतिवाद..
देर आये दुरुस्त आये! पी. चिदम्बरम हे पुन्हा नव्याने अर्थमंत्री होताच, यूपीए सरकारच्या धोरण-लकवा या विकाराला उतार पडू लागलेला दिसतो. विवेकपूर्ण आणि दूरगामी निर्णय, अप्रिय पण जनहिताचे निर्णय घेण्याची हिम्मत हे सरकार दाखवू लागलेले आहे.
रेशन-पद्धतीत गरिबाला १० रुपयाचा ऐवज पोहोचवताना पोहोचवणूक खर्चापायी ४० रुपयांचा बोजा पडतो आणि प्रत्यक्षात मूळ ऐवजसुद्धा खऱ्या गरिबाला मिळतच नाही. तोही भलतेच कोणीतरी लाटते. भरमसाट साठय़ामुळे धान्य गोदामात सडते. सुप्रीम कोर्टाने ते फुकट वाटा अशी सूचना दिली तरी फुकट वाटणेसुद्धा परवडले नाही याचे मुख्य कारण पोहोचवणूक खर्च हेच होते. इतकेच नव्हे, तर रेशनपद्धती प्रत्यक्षात फार कमी चालत असल्याने आतापर्यंतची सर्वच सरकारे, सबसिडीची तरतूद ही दिलेल्या हक्कांपेक्षा कमीच करत होती. कारण पद्धतीतल्या अडथळ्यांमुळे हक्कांइतकी उचल होणारच नाही व त्यामुळे तोटकी तरतूद ही कधीच उघडकीला येणार नाही, याची सर्व सरकारांना पूर्ण खात्री होती.
तरतूद इतकी तोटकी असे की वाटलेली रेशनकार्डे आणि दर कार्डामागील सबसिडी याच्या गुणाकाराइतकीही ती नसे. मग पोहोचवणूक खर्च भागवणार कुठून? गरिबांची उपासमार आणि करदात्याकडून मिळवलेल्या निधीचा अपव्यय /अपहार हे नष्टचर्य गेली सर्व वष्रे अव्याहतपणे चालू आहे. कोणत्या तरी राज्यातले धान्य हमी दिल्याने उचलायचे. ते मध्यवर्ती गोदामात किंवा गोदामाअभावी उघडय़ावर (सडत!) ठेवायचे. मग ते भलत्याच (महाराष्ट्रात हरियाणाचा गहू ‘स्वस्त’ आणि जोंधळा आवडत असून महाग) राज्याकडे सोपवायचे. मग त्या राज्याच्या वेगाने दुकानांपर्यंत पोहोचवायचे आणि दुकानदाराने त्याच्या लहरीनुसार कधी कधी दुकान उघडे ठेवायचे. अशी ही केंद्रीकरणवादी कार्यपद्धती आहे. ती प्रत्यक्षात कुचकामी असल्याचे वर्षांनुवष्रे निरपवादपणे सिद्ध झाले आहे. ती एकदा तरी बदलून बघायला नको काय? नवी पद्धत पूर्ण निर्दोष नसेलही, पण जुनी पद्धत पूर्ण अपेशी आहे त्याचे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा