होमिओपॅथी पदवीधारकांना अॅलोपॅथीच्या औषधांचाही वापर करण्यास परवानगी देणे म्हणजे मटका, जुगार अशा अवैध व्यवसायांना कायदेशीर संरक्षण देण्यासारखे आहे. निवडणुकीच्या तोंडावर होमिओपॅथी पदवीधारकांनी आंदोलन तीव्र केल्याचा आभास निर्माण केला होता. खरे तर या आंदोलनात पुढाकार घेणारे या पॅथीत प्रॅक्टिस करणारे कमी आणि होमिओपॅथीचे शिक्षण देणाऱ्या खासगी संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापकच अधिक होते. तसे पहिले तर मागील अनेक वर्षांपासून होमिओपॅथीचे पदवीधर हे अॅलोपॅथीचीच प्रॅक्टिस करीत आलेले आहेत; परंतु ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्टची होणारी कडक अंमलबजावणी आणि वैद्यकीय व्यवसायातील महत्त्वपूर्ण, सकारात्मक बदल यामुळे भविष्यात आपली होमिओपॅथीची दुकानदारीही बंद पडेल अशा भीतीने होमिओपॅथी शिक्षण संस्थाचालकांना ग्रासले होते. म्हणूनच मी ‘आभास’ हा शब्द वापरला.
सरकारी सेवेत कार्यरत असूनही एमबीबीएस डॉक्टर्स ग्रामीण भागात जाण्यास अनुत्सुक असतात. एखादा खासगी एमबीबीएस डॉक्टर जर ग्रामीण भागात आढळला तर ते वाळवंटात पाणी सापडण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत होमिओपॅथीचे पदवीधर ग्रामीण भागात सेवा देतात म्हणून त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्यात यावी असा युक्तिवाद हे होमिओपॅथी डॉक्टर्स करीत होते. त्याला सरकारने परवानगी देण्यातून एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ती म्हणजे एमबीबीएस डॉक्टर्स आणि त्यांच्या ‘मार्ड’सारख्या संघटनांसमोर सरकारने सपशेल लोटांगण घातले आहे.
आज होमिओपॅथीचे किती पदवीधर ग्रामीण भागात कार्यरत आहेत? पाच-दहा हजार लोकसंख्येच्या बहुसंख्य गावांतही बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचाच सुळसुळाट आहे. फार फार तर डीएचएमएस किंवा इलेक्ट्रोपॅथी, युनानी पदवीधर हेच रुग्णांच्या जिवाशी खेळत असतात. यात मोठय़ा प्रमाणावर होमिओपॅथीचे पदवीधर ग्रामीण भागात असतात हा दावा खोटा आहे. होमिओपॅथीचे पदवीधर डॉक्टर्स तालुका, जिल्ह्य़ाच्या ठिकाणी व्यवसाय करतात. रोज संध्याकाळी जोडीने बागेत जाणे, हॉटेलमध्ये जेवण करणे, चित्रपट पाहणे अशी शहरी लाइफस्टाइल त्यांना पाहिजे असल्याने ते ग्रामीण भागात जात नाहीत. अभ्यासक्रमात एकाही अॅलोपॅथीच्या विषयाचा समावेश नसतानाही अॅलोपॅथीच्या औषधांचाही वापर करू द्यावा, अशी मागणी करून या होमिओपॅथीच्या पदवीधरांनी आणि ती मान्य करून सरकारने होमिओपॅथी उपचारपद्धती पूर्णपणे कालबाह्य़ झाली आहे, हेच मान्य केले आहे.
होमिओपॅथी उपचारपद्धती कालबाह्य़ झाली आहे का?
होमिओपॅथी पदवीधारकांना अॅलोपॅथीच्या औषधांचाही वापर करण्यास परवानगी देणे म्हणजे मटका, जुगार अशा अवैध व्यवसायांना कायदेशीर संरक्षण देण्यासारखे आहे. निवडणुकीच्या तोंडावर होमिओपॅथी पदवीधारकांनी आंदोलन तीव्र केल्याचा आभास निर्माण केला होता. खरे तर या आंदोलनात पुढाकार घेणारे या पॅथीत प्रॅक्टिस करणारे कमी …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-01-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does homeopathy out dated