अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र यांच्या ज्ञानाचा वापर करून ते नियोजनतज्ज्ञ झाले, पण त्यांचा पिंड भाषाप्रेमाचा, कवीचा राहिला. व्यावसायिक यश सतत मिळत गेल्यावरही ते अस्वस्थच राहात, ते याच कवीमनामुळे. अखेर ते कवितांचे अनुवादक झाले आणि याच छंदाने त्यांची ३० पुस्तके प्रकाशित झाली! यापैकी आठ स्वरचित अरबी कवितासंग्रह आहेत.. अर्थात, आज वयाच्या ८७व्या वर्षी ‘कवी डॉ. शिहाब गनेम’ पेक्षा ‘अनुवादक डॉ. शिहाब गनेम’ अधिक परिचित आहेत. या अनुवादकार्याचा गौरव आता भारतातील एका खासगी शिक्षणसंस्थेतर्फे (आयआयपीएम, कोलकाता) ‘टागोर पीस प्राइस’साठी डॉ. शिहाब यांची निवड जाहीर झाल्याने होतो आहे. भारत सरकार यंदापासून देणार असलेल्या ‘टागोर इंटरनॅशनल अवॉर्ड’ पेक्षा हे ‘पीस प्राइझ’ निराळे असले, तरी भारताकडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद शिहाब यांच्यासाठी खासच मोठा आहे.. भारतात, रुडकी विद्यापीठातून १९७५ साली त्यांनी जल-व्यवस्थापनाचे पदव्युत्तर अभियांत्रिकी शिक्षण घेतले होते.  त्या वास्तव्यात भारतीय भाषांचे, साहित्यपरंपरांचे वैविध्य त्यांच्या लक्षात आले. त्याआधी १९६४ मध्ये त्यांनी ब्रिटनमधील एबर्डीन विद्यापीठात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली होती. रुडकीनंतरही ते अर्थशास्त्रात- ‘औद्योगिकीकरण आणि मनुष्यबळ विकास’ या विषयात पीएच. डी. मिळवण्यासाठी ब्रिटनलाच, कार्डिफ विद्यापीठात गेले. मात्र, मिळवलेल्या ज्ञानाचा फायदा पुढे त्यांनी मायभूमीला, अरब देशांना आणि विशेषत त्यांची जन्मभूमी असलेल्या संयुक्त अरब अमिरातींना करून दिला. दुबईमध्ये विविध अधिकारपदांवर असताना मुक्त व्यापार क्षेत्र तयार करण्याच्या कामी त्यांनी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे आणि याच कारकीर्दीत, दुबईला काय हवे आहे आणि कसे, याबद्दलचे तंत्रशुद्ध मतप्रदर्शन करणारी भाषणे वा प्रेझेंटेशन   विविध देशांतील सेमिनार-कॉन्फरन्समध्ये केली आहेत. पण पाच मल्याळम कवी आपण अरबीत आणले, याचा त्यांना अभिमान आहे. आपण केवळ एक यशस्वी वा उच्चशिक्षित अरब नसून अरब आणि अरबेतर जगांतला दुवा आहोत, ही जाणीव डॉ. शिहाब यांच्या जगण्यातून दिसते.. मग ते तंत्रज्ञान वा नियोजन असो, की काव्याचा अनुवाद.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती