तुरुंगात जाणे या वाक्प्रचाराला अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत असलेला धाक किती कमी झाला आहे, हे इंद्राणी मुकर्जी हिला रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे स्पष्ट झाले आहे. शीना बोरा हत्या प्रकरणी आरोप असलेली इंद्राणी तुरुंगात बेशुद्धावस्थेत आढळल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तिला आर्थर रोड तुरुंगात दाखल करण्यात आले होते. तेथेच औषधांच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे ती बेशुद्ध पडली असावी, असा डॉक्टरांचा संशय आहे. तुरुंगात केव्हाही आणि काहीही मिळते, मात्र ते सरकसट सर्वानाच मिळत नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले आहे. गेले काही दिवस सतत चर्चेत असलेल्या या प्रकरणाबाबतही तुरुंगातील अधिकारी किती बेपर्वाई दाखवतात, हे यामुळे उघड झाले. आत्महत्येचा हा प्रयत्न तुरुंगाच्या मदतीशिवाय कसा करता येऊ शकतो, असा प्रश्न त्याच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अनेक सामान्य कैद्यांना पडू शकेल.
इंद्राणीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार तुरुंगात जाण्यापूर्वी तिला कोणत्याही औषधांची गरज नव्हती. मग तिच्याकडेअधिक प्रमाणात गोळ्या कशा असू शकल्या, याचे उत्तर तुरुंगातील कर्मचारीच देऊ शकतात. तिच्या आईचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला आणि त्यासाठी तिला काही औषधे देण्यात आली, हे म्हणणे खरे असले, तरीही ती औषधे तिच्यापाशी पोहोचली कशी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. पहिल्यापासूनच सतत चर्चेत राहिलेले हे प्रकरण आता आणखी एका कारणासाठी चघळले जाईल. मात्र त्यातून तुरुंगातील अकार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर मात्र टांगली गेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा