‘शिंडलर्स लिस्ट’चे काय, सर्वच जेम्स बॉण्डपट, ‘मेरे अपने’, ‘गांधी’.. अशा कित्येक चित्रपटांत प्रचार होता; पण या सर्वात कलामूल्यही होतेच होते.

‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटाची संभावना ‘एक बटबटीत प्रचारपट’ अशी केली गेल्यानंतर सुरू झालेला कलकलाट अपेक्षितच म्हणायचा. याचे कारण या सरकारमान्य महान चित्रपटावरील टीका गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख परीक्षक इस्रायलचे नदाव लापिड यांनी केली आणि तीही आपले माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर तसेच अक्षयकुमार आदी महान कलाकार यांच्या साक्षीने. लापिड यांचे भाग्य की पंडिता कंगना राणावत या प्रसंगी नव्हत्या. अन्यथा त्यांची काही खैर नव्हती. केंद्रीय माहितीमंत्र्यांच्या साक्षीने सरकारमान्य कलाकृतीवर असे काही कोणी दीडदमडीचे कलावंत बोलू शकतात, हे ऐकण्या-पाहण्याची आपली सवय गेली असल्यामुळे या प्रसंगामुळे वादळ निर्माण झाले असणे शक्य आहे. त्याची दखल घेत लगेच इस्रायली सरकारनेही या घटनेची निंदा केली आणि लापिड यांना त्या सरकारने चार शब्द सुनावले. तेही तसे अपेक्षित. इस्रायल या देशाने आपली जनुकीय व्यापारवृत्ती कधीही लपविलेली नाही. इराण-इराक युद्धात दोन्ही बाजूंस मदत करण्यापासून इस्रायलचे सर्व काही मोबदल्याच्या बदल्यात उपलब्ध असते. तेव्हा भारतासारखे मोठे गिऱ्हाईक दुखवणे त्या देशास परवडणारे नाही. त्यामुळे आपल्याच देशातील चित्रपट कलाकाराची निर्भर्त्सना त्या देशाने केली. शेवटी ग्राहक हा राजाच असतो आणि प्रसंगी त्या ‘राजाचे’ पाय धुवावे लागतात. तेव्हा यात तसे नवीन आणि दखलपात्र काही नाही. तसे आहे ते अनुपम खेरादी अन्यांचे वागणे-बोलणे. हा विषय या मंडळींनी तापवलेलाच आहे तर त्यानिमित्ताने या विषयाचा तुकडा पाडायलाच हवा.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

सर्वप्रथम हा चित्रपट अजिबात आवडला नाही, असे म्हणण्याच्या लापिड यांच्या अधिकाराबाबत. तो त्यांना प्रचारकी आणि बटबटीतही वाटू शकतो. एखादी कलाकृती एका वर्गाच्या नजरेतून अजरामर असली तरी अन्यांस ती तशीच वाटायला हवी असे नाही. अक्षयकुमारादी कलावंत काहींस महानतम वाटू शकतात. पण त्याच वेळी काहींचे मत ते जिम्नॅस्टपेक्षा अधिक काही नाहीत, असे असू शकते. कलाकार आणि कलाकृतीचे मूल्यमापन हे व्यक्तिसापेक्ष असते. तसेच ते असायला हवे. तेव्हा हा चित्रपट भिकार आहे असे लापिड यांनी म्हटले त्यावर इतके रान उठवण्याचे अजिबात कारण नाही. लापिड यांना चित्रपटातील काहीही कळत नाही, हे एकवाक्यी प्रत्युत्तर त्यावर पुरेसे होते. आपल्याला आवडलेली सरकारमान्य कलाकृती सगळय़ांनी डोक्यावर घ्यायला हवी हा आग्रह आणि तो धरणारे स्वत:च्या लोकशाही निष्ठांविषयी प्रश्न निर्माण करतात. हा झाला एक मुद्दा. लापिड यांनी या चित्रपटाचे वर्णन प्रचारकी असे केले. अनुपम खेरादी मंडळींस ते अधिक झोंबलेले दिसते. साक्षात सरकारप्रमुखाने गौरवलेली ही कलाकृती. तिची संभावना अशी का झाली याचे आकलन खेरादी वर्गास न होणे समजण्यासारखे आहे. त्यावर खेर यांनी या चित्रपटाची तुलना थेट ‘शिंडलर्स लिस्ट’ या चित्रपटाशी केली आणि यहुदींच्या छळछावण्या जर खऱ्या होत्या तर काश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टाही खऱ्या आहेत अशा अर्थाचे विधान केले. मुद्दा असा की चर्चा चित्रपटाबाबत आहे की काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेबाबत? काश्मिरी पंडितांबाबत जे काही झाले ते अत्यंत खरे आणि दुर्दैवीच. पण म्हणून त्यावर आधारित हा चित्रपट महान असायलाच हवा असे नाही. या चित्रपटावरील चर्चेत ‘शिंडलर्स लिस्ट’ला आणल्यामुळे आता एक मुद्दा धसास लावायला हवा. 

कलाकृती आणि प्रचारपट यांतील फरक हा तो मुद्दा. उत्तम कलाकृती ही तितकीच उत्तम प्रचारपट असू शकते; पण कितीही उत्तम प्रचारपट असला तरी कलाकृती म्हणून तो टुकार असू शकतो. या दोन्हींत सूक्ष्म भेद आहे. तो लक्षात येण्यासाठी प्रत्येक कलाकृतीकडे विचारसरणीमुक्त नजरेतून पाहावे लागते. एखाद्या विचारसरणीस बांधले गेलेल्यांस तो कळत नाही. त्यामुळे खेर यांच्या तो लक्षात न येणे शक्य आहे. म्हणून ते ‘शिंडलर्स लिस्ट’ची तुलना ते ‘काश्मिर फाइल्स’शी करू शकले. मुळात ‘शिंडलर्स लिस्ट’ हा कलाकृती म्हणून उत्कृष्ट आहे. त्यातील लियाम निसन याचा ऑस्कर शिंडलर, त्याची ‘लिस्ट’ राखणारा यहुदी लेखनिक इझाक स्टेर्न (बेन किंग्ज्ले) आदींस घेऊन स्टीव्हन स्पिलबर्ग एक अजरामर कलाकृती उभी करतो. दुसऱ्या महायुद्धकाळातील शिंडलरची गोष्ट पुन्हा सांगण्यामागील संदेश हा जरी प्रचाराचा भाग असला तरी तो कलाकृतीच्या मखमली आवरणाखालून येतो. हे असे आवरण असणे आणि नसणे हे कलाकृती आणि प्रचारपट यांतील फरक निश्चित करते. तेव्हा ‘काश्मिर फाइल्स’ची तुलना स्पिलबर्गच्या त्या चित्रपटाशी करणे म्हणजे स्थानिक गणेशोत्सवात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या ग्राम-लतेस थेट लता मंगेशकरांच्या रांगेत बसवणे. वैचारिक अंधतेतून असे घडते. तशी ती नसलेल्यांनी लक्षात घ्यायला हवे की सर्व जेम्स बाँडपट हेदेखील साम्यवादाविरोधातील प्रचारपटच आहेत. पण मुळात ते चांगले चित्रपट आहेत. सर रिचर्ड अँटेनबरो यांचा ‘गांधी’ हा त्या विचारधारेचा प्रचारपटच. पण किती महान कलाकृती! हे कलासत्य लक्षात न घेता गांधींस प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्याची उंची किती हे सर्व जाणतात. गुलझार यांचा ‘मेरे अपने’ हा ७० च्या दशकातील लोकप्रिय चित्रपट नक्षल- अर्बन नक्षल यांवरच भाष्य करतो. पण मुळात तो चित्रपट म्हणून उभा राहतो. कोणा उच्चपदस्थाच्या प्रमाणपत्राची त्यास गरज लागत नाही. व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, ‘पिंजरा’, गेल्या जमान्यातील  ‘शेजारी’, ‘माणूस’, देशप्रेमाने वगैरे ओतप्रोत भरलेला आमिर खान याचा ‘लगान’, अलीकडचा ‘आर्टिकल १५’, ‘जय भीम’ असे किती दाखले द्यावेत? हे सारे प्रचारपटच. पण ते सर्व आधी उत्तम कलाकृती आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा प्रचार रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने सर्वोत्कृष्टपणे केला. पण तरीही ती मालिका प्रचारकी वाटत नाही. ‘एकच प्याला’ हे नाटक दारूबंदीचा प्रचारच करते आणि ‘संगीत शारदा’ जरठ- कुमारी विवाहाविरोधात भूमिका घेते. पण कलेशी दूरान्वयाने संपर्क आलेला अथवा ठार वेडाही या सर्वास ‘प्रचारपट’ वा ‘प्रचारनाटय़’ म्हणणार नाही.

याचा अर्थ असा की एखादी कलाकृती आधी कलेच्या निकषावर घासून-पुसून मापली जाणे आवश्यक असते. कोणत्याही चांगल्या दर्जाच्या कलाकृतीत राजकीय विचार असतोच असतो. पण त्या राजकीय विचारांस कलाविचाराचे सुदृढ कोंदण असणे आवश्यक. तसे ते नसेल तर त्या कलाकृतीतील राजकीय भूमिका, विचार बटबटीतपणे उघडय़ावर पडतो. सत्यजित रे यांचे जवळपास सर्व चित्रपट काही एका राजकीय भूमिकेतून समोर येतात. पण ते पाहिल्यावर परिणाम होतो त्या कलाकृतीतील कलात्मक मूल्यांचा. त्याच्या आडून राजकीय विचार अलगद ती पाहणाऱ्याच्या मनांत अलगद पोहोचतो. ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणतात ती ही. अमेरिकी भांडवलशाहीचा प्रच्छन्न प्रचार जितका ब्रिटिश जेम्स बाँड याने केला त्याच्या एकदशांश यश अमेरिकी राजकारण्यांना कधी मिळाले नाही. अमेरिकेची ‘अमेरिका’ म्हणून प्रतिमा निर्माण होण्यात हॉलीवूडच्या सॉफ्ट पॉवरचा महत्त्वाचा वाटा आहे तो असा. तेव्हा नेत्याच्या आदेशावरून ‘द काश्मिर फाइल्स’ पाहायला जाणाऱ्यांनी, गुणगान करणाऱ्यांनी आधी कलाकृती म्हणून त्या चित्रपटाचा विचार करावा. कलासंवर्धनास त्याची मदत होईल. ते न करता आपल्या मताविरोधात काही गेले म्हणून कावकाव करणे सोपे. कलाकृतीचे मोठेपण या अशा कांगाव्यांवर ठरत नाही.

Story img Loader