‘‘कारखानदारीत (मॅन्युफॅक्चरिंग) चीन ही जगातील एकमेव महासत्ता आहे’’, असे प्रमाणपत्र देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनीच खुद्द दिले ते उत्तम झाले. तेदेखील २०२५ चा अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना. हा उल्लेख का आवश्यक त्याचे स्पष्टीकरण पुढे मिळेल; पण नागेश्वरन यांच्या या कबुलीमुळे ‘भारत-चीन जगाचे सामुदायिक नेतृत्व करणार’, ‘चीन-भारत आर्थिक सहकार्य जगास नवी दिशा देईल’ वगैरे भगतगणांच्या समाजमाध्यमी पोपटपंचीस आता विराम मिळेल. आर्थिक पाहणी अहवालाचा उल्लेख येथे आवर्जून केला कारण गेल्या वर्षी असाच आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना नागेश्वरन यांनी भारताच्या ‘चीन प्लस वन’ धोरणाची भली मोठी भलामण केली होती. म्हणजे त्यावेळी चीनमधून बाहेर पडत असणाऱ्या कंपन्या भारतात आपली कारखानदारी सुरू करतील, ही आशा. ती आशेच्या पातळीवरच राहिली कारण त्यासाठी जे काही करणे आवश्यक होते ते सरकारने केले नाही आणि दुसरे म्हणजे चीनमधून अपेक्षेइतक्या संख्येने कंपन्या बाहेर पडल्याच नाहीत. हे स्वत:च्या यशासाठी भाजपच्या अपयशाकडे डोळे लावून बसलेल्या काँग्रेसप्रमाणे झाले. चीन अपेक्षा होती तितका वाईट ठरला नाही आणि परिणामी आपल्यालाही अपेक्षेइतके यश मिळवता आले नाही. सबब यापुढे चीन आणि भारत हे जणू एकमेकांचे प्रतिशब्द असल्यासारखे उल्लेख करायची गरज नाही. ताजा आर्थिक पाहणी अहवाल या प्रश्नावर पडदा टाकतो. आणि तो टाकत असताना आपण काय काय करू शकलो नाही, याचीही जंत्री सादर करतो. इतका प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल नागेश्वरन यांचे आभार मानून या अहवालाची दखल घेणे आवश्यक ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा