कोकणात ज्याप्रमाणे राणे पिता-पुत्रास भाजपने आपल्यात घेतले त्याप्रमाणे मराठवाड्यात अशोकरावांचे झाले, त्यांच्या साथीने आणखी आमदार गेले तरी नवल नाही… 

आजमितीस अभिनंदन अशोक चव्हाण यांचे करावे की भाजपचे हा सर्वात मोठा गहनगंभीर प्रश्न ठरतो. अशा परिस्थितीत ते दोघांचेही करणे इष्ट. हे दोनही घटक अभिनंदनास तितकेच पात्र ठरतात. अशोक चव्हाण यांनी एकदा काय तो निर्णय घेतला, हे बरे झाले. त्यासाठी ते अभिनंदनीय. महाराष्ट्रात कोणीही फुटणार अशी वदंता आली की पहिल्यांदा गेली काही वर्षे अशोकरावांचे नाव घेतले जायचे. म्हणजे फुटणारी व्यक्ती अशोक चव्हाण असेल याची खात्री राजकारणाच्या व्हॉट्सॲपी निरीक्षकांसही होती. हा जसा या निरीक्षकांच्या चाणाक्षतेचा मोठेपणा तशीच ती अशोक चव्हाण यांच्या विश्वासार्हतेचीही ‘पावती’च म्हणायची. इतक्या प्रत्येकास एखादा नेता जेव्हा संभाव्य फुटीर वाटत असतो तेव्हा त्या नेत्यांची पुण्याई किती हेही दिसून येते. हा एक भाग. दुसरीकडे भाजपचे अभिनंदन करण्याचे कारण सोमवारच्या ताज्या घटनेपुरतेच मर्यादित असणार नाही. जेव्हा अशोकराव भाजपत जातील त्या वेळी ही घटनामालिका पूर्ण होईल. तूर्त भाजपचे अभिनंदन अशासाठी की अशोक चव्हाण हे आपले संभाव्य लक्ष्य आहे याची हवा त्या पक्षाने इतक्या प्रदीर्घपणे निर्माण केली की काही दिवसांनी सोनिया वा राहुल गांधी यांनीच अशोकरावांस “तुमच्या भाजप प्रवेशाचे काय”, असे विचारले असते. ही वेळ अशोकरावांनी आणली नाही आणि ती येण्याच्या आधीच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. इतकी वर्षे एका पक्षात काढल्यावर जरा थारेपालट हवा, अशा अर्थाचे विधान अशोकरावांनी केले. सध्या सर्वपक्षीयांस थारेपालटासाठी एकमेव आधार आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार

हेही वाचा >>> अग्रलेख: ‘पाक’ इन्साफ..

तो म्हणजे अर्थातच भाजप. तेव्हा आज ना उद्या अशोकराव भाजपत जातील हे निश्चित. तिकडे बिहारात नितीशकुमार यांची दुसरी वा तिसरी (की चवथी) घरवापसी विधानसभेत यशस्वी ठरत असताना महाराष्ट्रातही अशोकरावांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात काही आश्चर्य नाही. अशोकरावांच्या साथीने आणखीही काही आमदार काँग्रेसमध्ये गेले तरीही आश्चर्य नाही. आजकाल मूळ भाजपवासीयांपेक्षा अन्य पक्षांतील ज्येष्ठांना भाजपत बरे दिवस आलेले आहेत. अशोकराव तर माजी मुख्यमंत्री. परत माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचेही ते सुपुत्र. म्हणजे डबल पॉवरफुल. तेव्हा अशी व्यक्ती आपल्या गळाला लागली तर भाजप कशाला सोडेल? यात प्रश्न इतकाच होता की अशोकरावांचा घास घ्यायला इतका वेळ का लागला? गेली काही वर्षे संभाव्य फुटिरांत अग्रमानांकित असलेले अशोकराव अजूनही भाजपवासी झालेले नाहीत. सोमवारी त्यांनी त्या दिशेने पहिले पाऊल टाकले. म्हणजे काँग्रेसचा राजीनामा दिला. तो देताना आपल्या आमदारकीचाही त्यांनी त्याग केला. आपली यानंतरची भूमिका लवकरच सांगू असे ते म्हणतात. याचा अर्थ इतक्या वर्षांच्या संभाव्य फुटीरतेच्या चर्चेनंतरही अशोकरावांस निर्णय घेण्यास अजून दोन-चार दिवस हवे आहेत. कदाचित पुढील दोन दिवसांत भाजपचे माजी अध्यक्ष आणि आजी गृहमंत्री अमित शहा यांच्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात ते अधिकृतपणे भाजपत प्रवेश करतील. भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारीही त्यांना कदाचित मिळेल. त्या पक्षात सद्य:स्थितीत अन्य पक्षीयांचेच स्वपक्षीयांपेक्षा भले होते. त्यामुळे उद्या भाजपत जाणाऱ्या अशोकरावांना परवा भाजपचे तिकीट मिळेलही.

हेही वाचा >>> अग्रलेख: कडेकडेचे मध्यात..

पण त्यानिमित्त भाजपसही एका आज्ञाधारक नेत्याचा लाभ होईल. काँग्रेसमधील आपल्या वास्तव्यात अशोकराव हे पक्षश्रेष्ठींचा माणूस असेच ओळखले जात. ही सवय त्यांना भाजपत अत्यंत उपयोगी पडेल. ही नेतृत्वनिष्ठा ही अशोकरावांच्या रक्तातच असावी. आणीबाणीच्या काळात अशोकरावांचे पिताश्री शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसचे तत्कालीन पक्षश्रेष्ठी संजय गांधी यांची पादत्राणे वाहिली होती. त्या वेळी त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. पण शंकरराव बधले नाहीत की त्यांनी महाराष्ट्राची माफीही मागितली नाही. पक्षप्रमुखांच्या चरणी निष्ठा वाहणे याचा हा मूर्तिमंत धडा. तो घरातल्या घरातच मिळालेला असल्याने अशोकरावांना तो भाजपतील भावी वास्तव्यात प्रगतिपथावर जोमाने घेऊन जाईल, हे निश्चित. आणि दुसरे असे की यानिमित्ताने तरी त्यांच्या मानेवरील आदर्श घोटाळ्याचे भूत कायमचे उतरवले जाईल. मुंबईतील आदर्श नामक इमारतीच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने अशोकरावांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून ते भूत त्यांच्या मानेवर बसले ते बसलेच. जेव्हा केव्हा अशोकरावांनी जरा काही हालचाल केली, भाजपवर आरोप वगैरे करण्याचा प्रयत्न केला की लगेच आदर्श घोटाळ्याची ‘फाइल’ पुन्हा खुली करण्याची चर्चा सुरू होई. परिणामी कासव कसे संकटाची चाहूल लागली की आपले शरीर आकसून घेते तसे अशोकराव स्वत:स आकसून घेत. ही त्यांची कुचंबणा आता कायमची दूर होईल. बरोबर दहा वर्षांपूर्वी नांदेड येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांत अशोक चव्हाण यांस आदर्श घोटाळ्यासाठी तुरुंगात पाठवू असे आश्वासन मतदारांस दिले होते. काही दिवसांतच अशोकराव भाजपत जातील. सर्व घोटाळे करून, पचवून ताठ मानेने जगू इच्छिणाऱ्यांसाठी सद्य:स्थितीत भाजपखेरीज अन्य पर्याय नाही. तोच अशोकरावांनी निवडला. त्याबद्दल त्यांना दोष देण्यात काय हशील. हे झाले अशोकरावांचे काय भले झाले याबद्दल.

आता भाजपविषयी. अशोकरावांच्या येण्याने भाजपस मराठवाड्यात एक मराठा चेहरा मिळेल. त्या परिसरात भाजपस तितकेसे स्थान नाही. याचे कारण त्यांची २०१९ पर्यंत शिवसेनेबरोबर असलेली युती. शिवसेनेस त्यामुळे मराठवाड्यात चांगले बस्तान बसवता आले. काँग्रेसचे स्थान होतेच. काँग्रेसेतर मतदार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे गेले. त्या शिवसेनेकडील मतदारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना त्यागाच्या माध्यमातून भाजपने करवला. शिंदे यांच्यासमवेत त्यामुळेच मराठवाड्यातील अनेक नेते भाजपशी हातमिळवणी करते झाले. या दोन पक्षांच्या तुलनेत भाजपस त्या परिसरात विस्ताराची तितकी संधी मिळाली नाही. जेथे स्वत:चे नेतृत्व नाही, तेथे अन्य पक्षातील प्रस्थापित नेतृत्व आयात करण्यास भाजप बिलकूल कचरत नाही. उदाहरणार्थ कोकण. तेथे ज्याप्रमाणे राणे पिता-पुत्रास भाजपने आपल्यात घेतले त्याप्रमाणे मराठवाड्यात अशोकरावांचे झाल्यास नवल नाही. आणि अशोकरावांस तसेही भाजपत जुळवून घेणे तितके अवघड जाऊ नये. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राहण्यास जाण्याआधी अशोकरावांनी पुट्टुपार्थी येथील सत्यसाईबाबांची पाद्यपूजा सरकारी इतमामाने सरकारी वास्तूत स्वहस्ते केली होती. त्या वेळी त्यांस टीकेचा सामना करावा लागला. ‘लोकसत्ता’ने त्या वेळी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. आता त्यांच्या अशा पाद्यपूजादी गुणांचे चीजच भाजपत होईल. ही भाजपची गुणग्राहकता कौतुकास्पद अशीच.

या गुणग्राहकतेकडे बघूनच नितीशकुमारादी अनेकांस पुन्हा एकदा भाजपकडे यावे असे वाटू लागले असणार. परत भाजप ‘हा’ आपला ‘तो’ परका असे बाहेरून आलेल्यांस वागवत नाही. उलट या आगंतुकांचे स्वकीयांपेक्षा जास्त लाड करतो. याचा मोह पडून अधिकाधिक नेत्यांस भाजप आता म्हणूनच आवडू लागला आहे. आता त्या पक्षाने एकच करावे. साक्षात सोनिया गांधी वा निदान गेलाबाजार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाच भाजपवासी करून घ्यावे. नाही तरी भारत हा काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा त्या पक्षाच्या श्रेष्ठ नेत्यांनी केलेली आहेच. ती प्रत्यक्षात येण्यास यामुळे गती येईल. अशोकरावांचा ‘आदर्श’ अधिकाधिक काँग्रेसजन त्यामुळे घेतील आणि डोक्यावरील गांधी टोपी उतरवून गळ्यात भाजपचे भगवे उपरणे मिरवू लागतील ही आशा.

Story img Loader