असद ही ब्याद होती, सीरियाच्या भल्यासाठी त्यांना हाकलणे आवश्यकच होते; पण पुढे काय, याचे उत्तर ना सीरियनांकडे आहे ना पाश्चात्त्यांस त्यात स्वारस्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पृथ्वीतलावर सीरियासारखा दुर्दैवी देश नसेल आणि सीरियन्ससारखे दुसरे अभागी नागरिक नसतील. या देशाचा प्रमुख स्वत:च्याच नागरिकांविरोधात रासायनिक अस्त्रे वापरतो, स्वत: अय्याशीत जगत असताना नागरिकांच्या अक्षरश: उद्ध्वस्त आयुष्याकडे काणाडोळा करतो आणि ज्याला आपल्या प्रजेविषयी कसलीही सहानुभूती नसते असा या देशाचा पदच्युत अध्यक्ष बशर अल असद याचा लौकिक. बंडखोरांच्या रेट्यामुळे या असदवर परागंदा होण्याची वेळ आली. सीरियन्ससाठी हा मुक्तीचा क्षण होता आणि एखाद्या निवडणुकीनंतर आपल्याकडे फटाके वाजावेत तशा हवेत बंदुकांच्या फैरी झाडत नागरिकांनी स्वातंत्र्य साजरे केले. या बशर यास देशाचे प्रमुखपद वारशातून मिळाले. याचे तीर्थरूप हफीज अल असद हे जवळपास ३० वर्षे सीरियाचे अध्यक्ष होते. ती त्यांची कमाई होती. गरीब घरातून आलेले हफीज राजकीय चळवळीकडे आकृष्ट झाले आणि बाथ पक्षातून चढत ते अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. ते २००० साली गेले. त्यानंतर ते पद बशर यांस मिळाले. वास्तविक त्या वेळी ते पद त्यांच्या ज्येष्ठ बंधूकडे जाते. पण त्यांचेही अपघाती निधन झाल्यामुळे बशर यांस संधी मिळाली. वास्तविक त्या वेळी हे बशर अध्यक्षपदासाठी पात्र नव्हते. कारण वय. सीरियन घटनेप्रमाणे या पदासाठी किमान वय ४० हवे. पण बशर हे तेव्हा ३४ वर्षांचे होते. त्यामुळे या बशरभाईंसाठी घटनेत बदल केला गेला आणि अध्यक्षपदी त्यांची ‘नियुक्ती’ झाली. म्हणजे सुमारे पाच दशके या देशावर असद घराण्याचा अंमल आहे. तो आता संपला. अर्धशतकाहून अधिक काळच्या असद राजवटीत लक्षावधींचे प्राण घेणाऱ्या, तितक्याच जणांस तुरुंगात डांबणाऱ्या बशर यांच्या विरोधात उठाव झाला आणि त्यांना पत्नीसह दमास्कसमधून पळून जावे लागले. बांगलादेश, श्रीलंका आदी देशांत जे झाले त्याचीच ही अरब पुनरावृत्ती.

हेही वाचा : अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

ती ज्याच्यामुळे झाली ते बशर अल असद हे नेते म्हणून इतके नतद्रष्ट आहेत की मानवी संस्कृती विकासाच्या केंद्रस्थानी असलेल्या अत्यंत ऐतिहासिक अशा वारशाचे आपण रक्षणकर्ते आहोत ही जाणीव त्यांस कधीही नव्हती. वास्तविक ते पाश्चात्त्य विद्याविभूषित. नेत्रशल्यचिकित्सक. त्यामुळे ते आपल्या वडिलांप्रमाणे असणार नाहीत, सुधारणावादी असतील अशी अपेक्षा होती. ती पहिल्याच वर्षी धुळीस मिळाली. राजकीय विरोधकांचे २००१ सालचे आंदोलन त्यांनी थोरल्या असदांच्या शैलीत चिरडले. त्या वेळी इतका रक्तपात झाला की दमास्कसमध्ये रक्ताचे शब्दश: पाट वाहिले आणि त्यातील रक्तधारा आठवडाभर ‘ओल्या’ होत्या. खरे तर दमास्कस हे इसवी सनाच्याही आधीपासूनचे एक महानगर. तुर्की-चलित ऑटोमन साम्राज्याच्या काळातही दमास्कसची भूमिका महत्त्वाची होती आणि नंतर ब्रिटिशांच्या हाती हा सारा परिसर गेल्यानंतरही हे शहर त्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणून ओळखले जातात ते टी. ई. लॉरेन्स यांचाही संबंध या शहराच्या जडणघडणीत होता. इराक, जॉर्डन, इस्रायल आदींस प्रागऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्याइतकाच सीरियाही समृद्ध. यहुदी, अरब, कुर्द, अलवाईट्स, ख्रिाश्चनांतील विविध अल्पसंख्य समुदाय इत्यादी अठरापगड नाही तरी डझनभर विविध धार्मिक/ वांशिक नागरिक या देशात राहतात. खुद्द असद हे अलवाईट्स पंथाचे. ही इस्लामच्या शिया शाखेतील एक फांदी. सुन्नींच्या तुलनेत शिया तसेही कट्टर नसतात. त्यात अलवाईट्स अधिकच सहिष्णू. त्यामुळेही असेल सीरिया हा अन्य अरब शेजाऱ्यांच्या तुलनेत नेहमीच प्रगतशील राहिला. हे एका अर्थी इराकच्या सद्दाम हुसेन याच्या राजवटीसारखे म्हणायचे. जगासाठी क्रूरकर्मा इत्यादी असलेला सद्दाम हा प्रागतिक होता आणि त्याच्या राजवटीत महिलांस बुरखा/ हिजाब आदींची सक्ती नव्हती. महिलांस त्या काळी शिक्षण सहज घेता येत असे. असद यांची राजवटही अशीच होती. सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष.

त्या देशाचा बाज आता तसा राहील किंवा काय हा प्रश्न. या असद यांनी स्वत:च्या राजवटीस विरोध करणाऱ्यांविरोधात इतकी दडपशाही केली की त्यांच्यासाठी देशातील शत्रूंची संख्या सातत्याने वाढत गेली. पंथीय जवळिकीमुळे त्यांना शियांचे प्राबल्य असलेल्या इराणचा कायम पाठिंबा राहिला आणि इराण अमेरिकाविरोधी भूमिका घेत असल्याने रशियाही असद यांचा तारणहार राहिला. या दोघांच्या लष्करी/संरक्षण साह्याच्या जोरावर असद यांनी आपल्या देशात अनन्वित अत्याचार केले. परिणामी त्यांच्या विरोधात देशाच्या सर्व बाजूंनी बंडखोर सेना आकारास येत गेल्या. त्यांनाही अर्थातच परदेशी फूस होती. यातील सर्वात लक्षणीय ‘एचटीएस’ नावाने ओळखली जाणारी ‘हयात तहरीर अल-शाम’ ही संघटना. ही सुन्नी. त्यामुळे परिसरातील सुन्नी देश, संघटना यांच्याकडून तीस आर्थिक आणि अन्यही साहाय्य दिले जात असून असद यांच्याविरोधी संघर्षात ती आघाडीवर होती. अबू मोहम्मद अल जोलानी हा या संघटनेचा प्रमुख. गेल्या दशकभरापासून अधिक काळ जोलानी आणि त्याची संघटना असद यांच्या विरोधात उठावाच्या प्रयत्नात होते. त्याने प्रयत्नही बराच केला आणि सीरियाच्या सीमेवरील काही प्रांतांत त्याचे प्राबल्यही तयार झाले. तथापि त्याची आगेकूच असद हे इराण आणि रशियाच्या मदतीने रोखू शकले. हे या वेळी त्यांना शक्य झाले नाही कारण मुळातच पश्चिम आशियाचा प्रदेश कमालीच्या अस्थिरतेतून जात असून इराण, त्या देशाच्या मदतीने उभी असलेली हेझबोल्ला ही दहशतवादी संघटना यांचे साहाय्य असद यांस मिळेनासे झाले आणि युक्रेन युद्धात अडकलेले असल्याने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांसही सीरियाच्या आणि त्यातही असद यांच्या दुखण्यात लक्ष घालणे अशक्य झाले. तेव्हा जोलानी याच्या धडकेपुढे असद यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत फौजांनी पांढरे निशाण फडकावले. असद यांच्यासमोर देशत्यागाखेरीज पर्याय राहिला नाही.

हेही वाचा : अग्रलेख : भाषेची तहान…

तथापि सीरियाची खरी अडचण पुढेच आहे. असद ही ब्याद होती आणि सीरियाच्या भल्यासाठी त्यांना हाकलून लावणे आवश्यकच होते; हे खरे. पण पुढे काय, हा त्यापेक्षाही गंभीर प्रश्न. कारण देश चालवण्याइतके कौशल्य ना जोलानी याच्याकडे आहे ना तितका पाठिंबा त्याला आहे. त्यास तूर्त तुर्कीचे साह्य आहे. पण ज्या क्षणी कुर्दिश बंडखोरांसही तुर्कीच्या कारभारात काही स्थान मिळेल त्या क्षणी तुर्कीचा पाठिंबा राहील का, हा प्रश्न. शिवाय जोलानी एकेकाळी ‘अल कईदा’शी संलग्न होता. सीरियातील ही परिस्थिती सद्दाम हुसेन यास हाकलल्यानंतरच्या इराकची वा कर्नल मुअम्मर गडाफी यांस पदच्युत केल्यानंतरच्या लिबियाची. पाश्चात्त्य देशांनी या हुकूमशाही राजवटी दूर केल्या खरे. पण त्या देशांचा गाडा त्यातून जो घसरला तो अजूनही परत सावरता आलेला नाही. आताही सीरियात जे सुरू आहे ते पाहिले की अंगावर शहारा यावा. उन्मादी जनतेचे थवेच्या थवे वाटेल ती लूटमार करत शहराशहरांतून हिंडताना दिसतात. हा विजयाचा आनंद वगैरे ठीक. पण पुढे काय, हा प्रश्न आहेच आहे. त्याचे उत्तर ना सीरियनांकडे आहे ना पाश्चात्त्यांस त्यात स्वारस्य आहे. एरवी पश्चिम आशियाच्या वाळवंटात जरा खुट्ट झाले की नाक खुपसणारी अमेरिका आताच्या परिस्थितीत बघ्याची भूमिका घेऊन आहे. ‘‘हे आपले युद्ध नाही’’, अशी भूमिका भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. तेव्हा आपणास कोणीही वाली नाही, हे सीरियनांस लवकरच कळेल. वाळवंटातील वालीहिनांत आणखी एका देशातील जनसमुदायाची भर!