‘क्लोरोपिक्रीन’च्या युद्धजन्य वापरावर पहिल्या महायुद्धापासून बंदी असूनही रशियाच्या किरिलॉव यांनी युक्रेनविरोधात त्याचा वापर केला…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याआधी दार्या दुगिना हिच्या मोटारीखाली स्फोट होऊन ती मारली गेली. तिचे वडील क्रेमलिनचे, म्हणजे अर्थातच रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक. पुतिन यांचा आणखी एक समाजमाध्यम समर्थक व्लादे तातार्स्की याला सत्कारात दिल्या गेलेल्या लहानशा मूर्तीचा स्फोट झाला आणि त्यात तो गेला. इलिया कीवा हा पुतिन समर्थक युक्रेनी नेता. तो त्याच्या घराजवळ मारला गेला. सर्जेई येव्सिकॉव हे एका रशियन तुरुंगाचे प्रमुख. तेही असेच ठार झाले. त्यांच्याही मोटारीखाली स्फोट झाला. मिखाइल शात्स्काय हा रशियाचा क्षेपणास्त्रतज्ज्ञ. रशियाच्या क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणाचे श्रेय त्याचे. तोही अलीकडेच स्वत:च्या घराजवळ मारला गेला. या मालिकेतील ताजे मरण इगॉर किरिलॉव यांचे. ही बडी असामी रशियाच्या आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्र व्यवस्थेची प्रमुख. पुतिन यांचा चेहरा असे त्यांचे वर्णन केले जात असे. ते मॉस्को येथील आपल्या घरातून कार्यालयात जाण्यास मोटारीत बसणार तर शेजारच्या दुचाकीत स्फोट झाला आणि किरिलॉव मारले गेले. त्यांचा सहकारीही त्यांच्या समवेत ठार झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेने घेतली असून युक्रेनकडून अशा पद्धतीने मारली गेलेली किरिलॉव ही आतापर्यंतची रशियाची सर्वात बडी असामी. यातील महत्त्वाचा भाग असा की युक्रेनच्या हेरांनी किरिलॉव यांस अगदी ‘घरमे घुसके’ मारले. यातून युक्रेनच्या गुप्तहेर यंत्रणेच्या क्षमतेचा अंदाज येतोच. पण त्याचबरोबर रशियन यंत्रणा केवळ आकाराने भव्य असल्या तरी आतून त्या पोखरल्या गेल्या असल्याचाही संदेश जातो. या किरिलॉव यांच्या हत्येबाबत दु:ख वा सहानुभूती व्यक्त करावी असे काहीही नाही. पुतिन ज्याप्रमाणे आपल्या एकेक विरोधकांचा काटा काढतात त्याच थंडपणे त्यांच्या सहकाऱ्यांसही मरण येत असून यातील किरिलॉव यांच्यावर तर जागतिक निर्बंध होते. याचे कारण किरिलॉव करत असलेले उद्याोग.
ते रशियाच्या अत्यंत घातक अशा रासायनिक आणि जैविक संहार अस्त्रांचे नियंत्रक होते. ताज्या युक्रेन युद्धात त्यांनी जागतिक पातळीवर बंदी घालण्यात आलेल्या ‘क्लोरोपिक्रीन’ या जीवघेण्या रसायनास्त्राचा वापर प्रतिपक्षाविरोधात केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात अमेरिकेसकट अनेकांनी पुरावे दिले. ‘क्लोरोपिक्रीन’ हा एक तेलकट चिकट द्रव असून त्याचा वापर पहिल्यांदा पहिल्या जागतिक युद्धात केला गेल्याची नोंद आढळते. तेव्हापासून त्याच्या युद्धजन्य वापरावर बंदी आहे. पण तरीही रशियाने युक्रेनविरोधात हे रसायनास्त्र वापरले. या द्रवाशी संपर्क आल्यास त्वचा जळत असल्यासारखी आग होते, डोळ्याशी संपर्क आल्यास डोळ्यात जणू निखारे असल्यासारखी वेदना होते आणि तो घटक हुंगला गेल्यास छातीत जळजळ होऊन उलट्या आदी त्रास सुरू होतो. या रसायनास्त्रावर त्वरित उतारा दिला गेला नाही तर दगावणे निश्चित. युक्रेनी सैनिक जी रशियन ठाणी सोडण्यास तयार नव्हते तेथे किरिलॉव यांनी क्लोरोपिक्रीन या रसायनास्त्राचा वापर केला. यातून युक्रेनच्या किमान साडेचार हजार सैनिकांना त्याची बाधा झाली आणि त्यातील बरेचसे गतप्राण झाले. तेव्हापासून युक्रेन या किरिलॉव यांच्या मागावर होता. अखेर त्यांची हत्या करून युक्रेनने आपल्या जवानांच्या हत्येचा सूड घेतला.
हेही वाचा : अग्रलेख: कर्ज कर्तनकाळ!
पण ते समाधान तात्पुरते असेल. याचे कारण रशियाच्या रसायनास्त्र निर्मिती व्यवस्थेचा आकार. वास्तविक रशियाने, अगदी अलीकडे म्हणजे १९९७ साली, आपल्याकडील जवळपास ४० हजार टन रसायनास्त्रांच्या साठ्याची कबुली दिली होती आणि तो टप्प्याटप्याने नष्ट करण्याची हमी दिली होती. पण तेव्हा अध्यक्षपदी पुतिन नव्हते. या करारानंतर तीन वर्षांनी पुतिन यांचा उदय झाला आणि त्यांनी सर्व नियम, संकेत खुंटीवर टांगले. खरे तर रशिया हा देश या संदर्भातील जागतिक कराराचा सदस्य आहे. ‘केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन’ हा रसायनास्त्रांस पायबंद करणारा करार गेली सुमारे चार दशके अस्तित्वात असून अन्य १९३ देशांप्रमाणे रशियाही या अस्त्रांचा वापर न करण्यास बांधील आहे. पण फक्त कागदावर. प्रत्यक्षात रशिया अद्यापही मोठ्या प्रमाणावर रसायनास्त्र, जैविकास्त्र यांची निर्मिती करत असून त्या देशाचे अध्यक्ष पुतिन यांना या कसल्याचेही सोयर-सुतक नाही. ‘द ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ (ओपीसीडब्ल्यू) ही अशा अस्त्रांच्या वापरावर देखरेख ठेवणारी जागतिक यंत्रणा. तिचा हवाला देत अनेक देशांनी रशियाच्या या अमानुष युद्ध पद्धतीवर टीका केली आहे आणि इंग्लंडसारख्या देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधही लादलेले आहेत. तथापि पुतिन यातील कशालाच मोजत नाहीत. त्यांनी आपल्या देशाचा हा रसायन अस्त्र निर्मितीचा कार्यक्रम आपल्यातील बेमुर्वतखोरीचे दर्शन घडवत तसाच सुरू ठेवल्याचे दिसते. रशियाचा या संदर्भातील इतिहास फार जुना आणि दुर्दैवीही.
‘बायोप्रेपरात’ ही रशियाची कुख्यात जैवास्त्र निर्मिती करणारी यंत्रणा. सोव्हिएत युनियनच्या काळात त्या प्रदेशातील निर्जन बेटांवर सुरुवातीस या यंत्रणेने आपली जैवास्त्रे निर्मितीची प्रयोगशाळा सुरू केली. त्यांनी केलेल्या प्रयोगांचे वर्णनही वाचवत नाही, इतके ते भयानक आहे. एका बेटावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर माकडे बांधून ठेवली आणि त्या भूभागावर जैवास्त्रे टाकून ती कशी हाल हाल होऊन मरतात याच्या नोंदी केल्या. या ‘बायोप्रेपरात’ यंत्रणेचा दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी केन अलिबेक हाच अमेरिकेस फितूर झाल्याने या प्रकाराचा बभ्रा झाला. त्यानंतर जगास रशिया किती संहारक अस्त्रे निर्माण करीत आहे हे कळून आले. त्यानंतर आपण ‘बायोप्रेपरात’ बंद करत असल्याचा दावा रशियाने केला. पण तो तेवढ्यापुरताच. कारण पुढच्याच वर्षी १९९३ साली येकातेरिनबर्ग— पूर्वीचे स्वेर्दलोवास्क— येथील लष्करी तळात काळपुळी आजाराचे (अँथ्रॅक्स) जिवाणू ‘चुकून’ सुटल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि पुन्हा एकदा रशियाचे हे उद्याोग चव्हाट्यावर आले. या अपघातात रशियाने स्वत:चेच शंभरभर सैनिक गमावले. तरीही त्या देशाने या अस्त्र निर्मितीवर निर्बंध आणले नाहीत. रसायनास्त्रांबाबतही हेच. त्याबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या करूनही रशिया अद्यापही एकापेक्षा एक घातक रसायनास्त्रे निर्माण करत असल्याचे आरोप होतात आणि त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक घटनाही घडताना दिसतात.
हेही वाचा : अग्रलेख: आला नाही तोवर तुम्ही…
याचे ताजे उदाहरण म्हणजे पुतिन यांचे प्रमुख विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा आकस्मिक मृत्यू. याआधीही नवाल्नी यांना मारण्याचा प्रयत्न झाला. पण जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी धडाडी दाखवून नवाल्नी यांना स्वत:च्या देशात आणले आणि योग्य उपचारांनी त्यांना वाचवले. तरी नंतर नवाल्नी यांचा संशयास्पद मृत्यू झालाच. अलेक्झांडर लिटविनेंको यांना लंडनमध्ये भर रस्त्यात छत्रीचे टोक टोचले आणि काही दिवसांतच ते रुग्णालयात खंगून खंगून गेले. ते पुतिन टीकाकार. त्यांना पोलोनियम टोचवले गेले. सर्जी मॅग्नेत्स्की, युरी शेकोशिंखीन, व्हिक्टर युशेंको आदी किती नावे सांगावीत? हे सारे गूढ, अनाकलनीय आजाराने मरण पावले. खेरीज पत्रकार अॅना पोलित्कोवस्काया, रशियन ‘फोर्ब्स’चे संपादक पॉल क्लेबनिकॉव्ह, मानवाधिकार वकील निकोलाय गिरेन्को, बँकर आंद्रेई कोझलॉव असे अनेक गोळ्या घालून, विविध अपघातांत मारले गेलेले वेगळेच. ही संख्या शेकड्यांनी असेल. आता पुतिनविरोधात युक्रेननेही हेच धडे गिरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. किरिलॉव यांचे मरण हे त्याचे निदर्शक.
यातील कोणाच्याच मरणाविषयी सहानुभूती बाळगावी असे काहीही नाही हे खरे. पण एकविसाव्या शतकातही पुतिन आणि तत्सम अनेकांनी चालवलेली रसायनांची सूडयात्रा रोखण्याची ताकद कोणामध्येही नाही, हे सत्य अधिक खेदजनक.