‘लोकसत्ता’ सातत्याने कारखानदारीचे (मॅन्युफॅक्चरिंग) महत्त्व अधोरेखित करीत आला आहे. सेवा क्षेत्र कितीही वाढले, नवउद्यामींचा कितीही गुणाकार झाला, सेन्सेक्स अगदी गगनास जरी भिडला तरी कारखानदारीचे मोल या कशास नाही. हे सर्व घटक हे अर्थव्यवस्थेस पूरक. न्याहारी ज्याप्रमाणे चौरस भोजनास पर्याय ठरू शकत नाही तद्वत या सर्व क्षेत्रांची वाढ कारखानदारीची जागा घेऊ शकत नाही. तथापि या सत्याकडे अलीकडे दुर्लक्ष करण्याचा नवाच ‘उद्याोग’ अनेक जण करताना दिसतात. त्यात सत्ताधारी मग्न असल्यास ते एक वेळ समजून घेता येईल. कारण त्या बिचाऱ्यांसाठी ‘जे बरे, ते खरे’ असे वास्तव असते. तेव्हा कारखानदारीपेक्षा हा वर्ग नवनव्या उगवत्या क्षेत्रांचे गुणगान करणार यात नवल नाही. परंतु अर्थव्यवस्थेचे अभ्यासकही कारखानदारीपेक्षा सेवादी क्षेत्रांच्या घोडदौडीचे कौतुक करण्यात रममाण दिसतात. ही स्वत:ची फसवणूक. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन’मुळे (आयआयपी) ही फसवणूक चव्हाट्यावर येते. हा निर्देशांक औद्याोगिक उत्पादनाचा माग ठेवतो. कारखानदारीच्या कोणत्या क्षेत्राने कशी कामगिरी केली, कोण मागे आहे, कोण पुढे इत्यादी तपशील या निर्देशांकावरून लक्षात येतो. त्यात देशातील समग्र कारखानदारीचे प्रतिबिंब पडत असल्यामुळे खरे तर सेन्सेक्सपेक्षाही अधिक महत्त्व या ‘आयआयपी’स असायला हवे. पण वास्तव तसे नाही. केवळ भांडवली बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स हा अधिक माध्यमस्नेही असल्याने आणि त्यात अनेकांचे हितसंबंध असल्याने त्यास अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी आयआयपी दुर्लक्षित राहतो. नुकताच प्रसृत झालेला ऑगस्ट २०२४चा ‘आयआयपी’ मात्र अर्थव्यवस्थेस खडबडून जाग आणत असून त्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा