हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
– चैतन्य प्रेम
अवधूताच्या चित्तावर समुद्राच्या गंभीरत्वाचे, निर्मळत्वाचे, सर्वसमावेशक व्यापकत्वाचे संस्कार झाले. या व्यापकत्वाचं मोठं वैशिष्टय़ म्हणजे व्यापक असूनही समुद्राला मर्यादा आहे! ही मर्यादा अंगभूत आहे. ती कोणी लादलेली नाही! सर्वशक्तिमान अशा योग्याच्या ठायीही हाच गुण आहे. तो मर्यादेआड लपून असतो. तो आपल्या शक्तीचं प्रदर्शन करीत नाही. तो स्वत:ला सर्वसामान्य भासवतो. एकदा एक रूपक सुचलं. एखादा हेर असतो पाहा, तो जेव्हा परक्या मुलखात हेरगिरी करीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी मायभूमीची व्यापक यंत्रणा उभी असते. त्या देशातली पूरक यंत्रणाही असते. हेर एरवी साध्या नागरिकासारखा भासला तरी आत्मसंरक्षणाच्या प्रशिक्षणानं तो सज्ज असतो. मात्र कुणाला त्याचा पत्ताही नसतो. खरा भक्त असा परमेश्वरी शक्तीच्या आधारावर जगात लपून राहात असतो. पण एकदा का हेर उघडकीस आला की काही खरं नाही. त्याचा देशही त्याची उघड बाजू घेऊ शकत नाही आणि शत्रूराष्ट्र त्याचं जगणं कठीण करून टाकतं. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या सद्भक्ताची ओळख पटली की समाज त्याला स्वस्थ राहू देत नाही! भौतिकाच्या मागण्यांनी त्याला हैराण करतो. आपल्या अडचणी दूर करण्याची शक्ती त्याच्याकडे आहेच, असं मानून त्या संकटांच्या निराकरणासाठी साकडं घालतो. बरं, या ‘संकटग्रस्तां’ना साधनेत काही गोडी नसते, प्रयत्नवादावर विश्वास नसतो. त्यांना फक्त समोरची अडचण दूर करून घेण्यापुरता देव हवा असतो. मग त्या जाळ्यात जर हा भक्त फसला तर मूळ ध्येयापासून तो दुरावण्याचा मोठा धोका असतो. तेव्हा विराट क्षमता असूनही योगी मर्यादेत राहतो. अवधूत म्हणतो, ‘‘जैशी समुद्राची मर्यादा। कोणासी न करवे कदा। तैशी योगियांची मर्यादा। शास्त्रां वेदां न करवे॥ ५२॥’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). समुद्र विशाल आहे, त्याला कोण मर्यादा आखून देणार? तरीही तो मर्यादेत राहतो. तसं योग्यावर शास्त्र आणि वेद कोणतेही नियम लादू शकत नाहीत, पण योगी स्वत:हून त्यांच्या चौकटीत राहतो. त्याच्या शक्ती/ क्षमतेची कल्पना वेदांनाही करवत नाही. पुढे अवधूत सांगतो, ‘‘प्रवाहेंवीण जळ। समुद्री जेवीं निश्चळ। मृत्युभयेंवीण अचंचळ। असे केवळ योगिया॥ ५३॥’’ म्हणजे नद्यांचे प्रवाह सागराला मिळतात खरे, पण समुद्राला काही त्या प्रवाहाची आस नाही. किंवा ते प्रवाह आले नाहीत म्हणून सागर कोरडा पडत नाही की कासावीस होत नाही. तो निश्चल असतो. तसा योगीही जगात असतो. जगाचा आधार मिळाला नाही, तर तो अस्वस्थ होत नाही. ज्याला मृत्यूचंदेखील भय नाही त्याला जगाच्या आधाराची तरी काय चिंता असणार? अवघ्या चराचरात असा अचंचल केवळ एक योगीच आहे! बरं बाहेरून येणारा प्रवाह आटला, पण आतून काही झरे उत्पन्न होत समुद्र बनतो का? तर नाही! विहीर भरण्यासाठी, नदीसाठी झरे आवश्यक असतात. समुद्रासमोर त्यांचा आवाका तो किती! तेव्हा झरे आहेत म्हणून समुद्राचं अस्तित्व आहे, असं नाही आणि ते झरे नाहीत म्हणून आज ना उद्या समुद्र ओसरेल, असंही नाही! म्हणून अवधूत सांगतो की, ‘‘समुद्रीं प्रवाहो नव्हे काही। सदा पूर्ण ठायींच्या ठायीं। तैसें योगियां जन्ममरण नाहीं। परिपूर्ण पाहीं सर्वदा॥ ५४॥’’ अंत:स्थ प्रवाह नसले तरीही समुद्र ठायीच परिपूर्ण आहे. तसा योगीही ठायीच पूर्ण असून जन्म-मरणाच्या चक्राला कारणीभूत वासनेचा अंत:स्थ प्रवाह त्याच्यात नाही.