हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
– चैतन्य प्रेम
जे मिळणार असेल ते मिळेलच, जे मिळणार नसेल ते कितीही धडपड केली तरी मिळणार नाही, हे योगी जाणून असतो. त्यामुळे अदृष्टात अर्थात उलगडत जात असलेल्या भविष्यकाळात काय घडेल, अमुकच घडावं, अमुकच घडेल ना आणि भलतंच तर काही घडणार नाही ना; अशा साशंकतेत आपण अडकून असतो.. योग्याला ती चिंता नसते. तो त्याच्या जीवनध्येयाला सुसंगतच वागत असतो. हा भविष्यकाळ कधी सुरू होतो हो? हे वाक्य वाचता वाचता तुम्ही तुमच्या भविष्यकाळात प्रवेश केला आहे! आणि पुढच्या वाक्याकडे तुम्ही वळाल तेव्हा आधीचं वाक्य भूतकाळात जमा झालेलं आहे! म्हणजेच वर्तमानातला क्षण हा क्षणात सरून भूतकाळ ठरतो तर येणारा प्रत्येक क्षण भविष्यकाळ असतो. क्षणांची ही साखळी कोणत्याही क्षणी तुटते आणि त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. जीवन क्षणभंगूर असतं, ते असं. ते कोणत्या क्षणी भंग पावेल, याचा भरवसा नसतो. मग अशा जीवनात योग्याचा आदर्श सामान्य माणसानं डोळ्यापुढे ठेवावा, हा अवधूताचा हेतू आहे. ‘अजगर’ हा निमित्त आहे. अजगरच कशाला पृथ्वी, आकाश, वायू, वृक्ष, सूर्य, समुद्र अशा सगळ्या गोष्टींतून आपण काय काय शिकलो, हे सांगण्यामागे जे शिकलो ते साधकानं चित्तात गोंदवावं, मनात गिरवावं, बुद्धीत रुजवावं, हीच अवधूताची कळकळ आहे. म्हणून पृथ्वी, समुद्र, आकाशाचं वर्णन करताना निसर्गसौंदर्य उलगडून दाखवावं, असं त्याला वाटत नाही. कारण या सगळ्या गोष्टी कायम राहतीलही, पण त्यांचा अनुभव घेणारा माणूस मात्र त्या क्षणापुरता जगत असला तरी कोणत्याही क्षणी तो या सृष्टीतून वजा होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे त्याची कळकळ त्याला या ना त्या प्रकारे सावध करण्याची आहे. भौतिकासाठी नाहक धडपडू नका, जे तुमच्या प्रारब्धात आहे ते मिळणार आहेच, हे सांगताना माणसाला निष्क्रिय करण्याचा हेतू नाही. कारण नुसतं ‘भौतिक सोडा’, हे ऐकून कुणी भौतिक सोडत नाही आणि ‘साधना करा’, हे ऐकून कोणी लगेच साधनारत होत नाही. त्यामुळे भौतिकाचा मनावर जो पगडा आहे तो काढून टाकल्याशिवाय मन मोकळं होत नाही. बरं ही गोष्ट आपणही जाणतोच. आहे त्या कपडय़ात मूल शाळेत जाऊ शकत नाही का? तरी त्याला गणवेश बंधनकारक असतो. अभ्यास करताना त्यानं अन्य काही कृती तर करू नयेच, पण मनात इतर विचारही आणू नयेत, अशी आपण अपेक्षा करतो. मग आत्मस्थ होण्याच्या साधनेसाठी काहीच पूर्वतयारी नको? मनाची घडण सुधारायला नको? त्यासाठी हा थोडा टोकाचा भासणारा बोध अवधूत करतो. तो नीट ऐकून साधक निदान एखादं पाऊल तरी टाकेल, ही अपेक्षा असते. माणसाला भौतिकाची अतिरेकी चिंता करण्याचा रोग जडला आहे. साधं देवळात गेल्यावरही र्अध मन बाहेर ठेवलेल्या चपलांपाशीच घुटमळत असतं. कुठे सत्संगाला गेलोच, तर परतीची वेळ आणि त्यानंतर करायची कामं यांच्या स्मरणाचं ओझं डोक्यावरून उतरतच नाही. अशा माणसासमोर खाण्यापिण्याची शुद्ध नसलेल्या आणि भौतिकातलं काही मिळवण्याच्या विचारानं सतत अशांत, अतृप्त राहण्याचा रोग न जडलेल्या योग्याचं उदाहरण अवधूताला ठेवावंसं वाटतं. स्वत:च्या भौतिक प्रगतीची पर्वा नसलेला आणि ध्येयसमर्पित जीवन जगण्यात गढून गेलेला असा योगी लौकिक जगातही असू शकतो बरं! या ‘योग्या’ची आणि अध्यात्माच्या क्षितिजावर तळपत असलेल्या योग्याची बादशा बरीचशी मिळती-जुळती असते. कसं, ते आता पाहू.