– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विषय वाईट नाहीत, पण त्या विषयांची आसक्ती वाईट आहे. उद्धवही भगवान कृष्णाकडे मान्य करतो की, ‘‘जो झाला विषयाधीन। तो सर्वी सर्वत्र सदा दीन। ऐसें जाणतजाणतां जन। आसक्ती गहन विषयांची।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय १३, ओवी २०३). जो विषयाधीन झाला, विषयांचा गुलाम झाला तो नेहमीच दीन असतो, हे सगळेच जाणतात. तरीही विषयांची आसक्ती गहन आहे. त्या आसक्तीतून सुटका करून घेणं अवघड आहे. त्या आसक्तीपायी माणसाचं स्वातंत्र्य तर हरपलंच आहे, पण त्यात राक्षसी उन्माद आला तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरही तो घाला घालायला मागेपुढे पाहत नाही. एकनाथ महाराज पाचव्या अध्यायात सांगतात की, ‘‘आगी लागलिया कापुसा। विझवितां न विझे जैसा। तेवि विषयवंता मानसा। विवेकु सहसा उपजेना।।२११।।’’ कापसाच्या गंजींना आग लागली की ती विझवता येत नाही. कापसाला नष्ट करूनच ती शांत होते. तसंच मन विषयानं पेटलं की विवेक पूर्णत: नष्ट करून आणि पूर्ण आत्मघात साधूनच ते शांत होतात. एकनाथ महाराज सातव्या अध्यायात सांगतात की, ‘‘आसक्ति आणि स्नेहसूत्र। या दोन्हींपासाव दु:ख विचित्र। पदोपदीं भोगिती नर। अस्वतंत्र होउनी।।५४९।।’’ आसक्ती आणि मोहग्रस्त स्नेहाचा पाश पडला असेल, तर माणसाचं आत्मिक स्वातंत्र्य लोपतं आणि तो पदोपदी दु:खच भोगतो. ही विषयासक्ती मनात असूनही तो साधना करू लागला तरी मनात उत्पन्न होणाऱ्या ओढींचं काय करावं? त्या ओढी स्वस्थ होऊ देणार नाहीत. त्या एकांतातही विषय भावनेचाच कलकलाट सुरू असेल. २६ व्या अध्यायात म्हटलं आहे की, ‘‘इंद्रियांचे संगतीं। अवश्य क्षोभे चित्तवृत्ती। तेथ सज्ञानहि बाधिजती। मा कोण गति अज्ञाना।।२५७।।’’ विषयांचा आणि इंद्रियांचा मेळ घडतो तेव्हा कामभावानं सज्ञानी माणसाची चित्तवृत्तीही क्षोभते, तिथं अडाण्याची काय कथा? आता डोळे हे इंद्रिय आहे. एखादं कामुक चित्र त्या डोळ्यांच्या दृष्टीस पडलं तर हा क्षोभ निर्माण होणार आहे का? तर नाही. त्या डोळ्यांचा विषयाशी संग झाला, त्या डोळ्यांनी पाहताना विषय जागे झाले तर क्षोभ आहे. एखाद्या तीन-चार वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांना ते चित्र पाहूनही काहीच वाटणार नाही आणि म्हणूनच क्षोभही होणार नाही. तर अशी इंद्रिय आणि विषयासक्तीची सांगड असलेल्या साधकाचा आंतरिक संघर्षही तीव्रच असतो. कारण, ‘‘एवं पूर्वापार विषयासक्ती। पुरुषासी बाधक निश्चितीं। तो बैसल्याहि एकांतीं। वासनासंस्कारें वृत्ति सकामें क्षोभे।।२६१।।’’ तो एकांतात बसला तरी अंतर्मुख होण्याऐवजी विषयभावानं व्याप्त होईल. मग यातून सुटका कोण करील? कोणता ‘देव’ धावून येईल हो? २६ व्या अध्यायातच एकनाथ महाराज बजावतात की, ‘‘इंद्रादि देव कामासक्तीं। विटंबले नेणों किती। त्यांचेनि भजनें कामनिवृत्ती। जे म्हणती ते अतिमूर्ख।।१८६।।’’ कामासक्तीनं इंद्रादि देवांचीही विटंबना झाली. त्यांचं भजन केल्यानं कामनिवृत्ती साधेल, असं ज्यांना वाटतं ते मूर्ख आहेत, असं एकनाथ महाराज सांगतात. ‘इंद्र’ म्हणजे इंद्रियं. ती उर्वशीच्या मोहात अडकतात. उर्वशी म्हणजे उरात, हृदयात जी वसते, वस्ती करून असते ती मोहभावना! त्या मोहभ्रमात रमणं ज्या ओढीमुळे भावतं ती ‘रम+भा’ अर्थात रंभा! तेव्हा इंद्रादि देव या कामासक्तीतून सोडवू शकणार नाहीत याचा अर्थ विषयज्वरानं पीडित इंद्रियांच्या आधीन राहूनही सुटका होणार नाही. ती सुटका होईल केवळ एका ‘नारायणा’मुळे! कसं? थोडा विचार करू.