– चैतन्य प्रेम

ज्या मनाला सतत काही तरी हवं आहे त्या मनाला दानाचं वळण लावणं, हाच मनाच्या एकाग्रतेसाठीचा पहिला टप्पा आहे. त्या दानाचा अहंकार होऊ नये, यासाठी खरा दाता कोण आणि खरं दान कोणतं, हे ओळखायचं आहे. आता खरा दाता कोण? गेल्याच भागात आपण पाहिलं की, आपल्याला माणसाचा जन्म देणारा भगवंत हा खरा दाता आहे आणि जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारा सद्गुरू हा मूळ दाता आहे. कारण माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ असलं तरी विशेष नाही. त्या जगण्याचा हेतू समजणं, ध्येय उमगणं आणि त्या ध्येयानुरूप जगायला शिकणं; हे विशेष आहे! भगवंतानं माणसाच्या जन्माला घातलं, माझ्या अवतीभोवतीची सृष्टीही निर्माण केली, त्या सृष्टीत त्यानंच निर्माण केलेली फुलं मी त्याला वाहतो. त्यानंच उत्पन्न केलेलं जल त्याला अर्पण करतो. त्याच्याच सृष्टीतील पदार्थ रांधून त्याला प्रसाद देतो. यात माझं खरं काय कर्तृत्व? त्याचंच त्याला मी देत आहे. अगदी त्याचप्रमाणे मी दुसऱ्याला दान देत असेन, तर त्यात खरं तर माझं पूर्ण श्रेय नाही. कारण मला दान देता येईल अशी परिस्थितीही भगवंताच्या कृपेनं टिकून आहे. त्याहीपेक्षा, दान घेणारा आहे म्हणून दात्याला दान करता येत आहे! हे भिकेचं उदात्तीकरण मानू नका. पण जन्मापासून या ना त्या रूपात आपणही अनेकदा भीकच मागत असतो किंवा अपेक्षित असतो. असो, एवढंच लक्षात ठेवू की, दान हा परोपकार नव्हे. दानाचा अहंकार नसेल तर दानानं कृतज्ञभावनेचा विकास होतो. सहृदयता आणि करुणेचा विकास होतो. आपल्याकडे जे आहे त्यावर केवळ आपली मालकी नाही, याच समाजातील अनेक ज्ञात-अज्ञात माणसांचा माझ्या वाटचालीत, जडणघडणीत, उत्कर्षांत कळत-नकळत वाटा आहे, त्यामुळे त्या समाजालाही मी काही तरी देणं लागतो, हा भाव दान देताना झाला पाहिजे. जे स्वत:चा विकास प्रामाणिक प्रयत्नांनी करू इच्छितात अशांना अडीअडचणीत मदत करण्याची वृत्ती या दानानं घडली पाहिजे. पण हे दान योग्य व्यक्तीला आणि यथाशक्तीच करावं. आपल्या ऐपतीनुसार करावं. त्याचं दडपण ते घेणाऱ्याच्या मनावर येणार नाही, इतपत करावं. तेव्हा वृत्ती घडविण्याकरिता दान देणाऱ्यालाही दानाचा लाभ होतो. आता दानाचा स्वीकार करणाऱ्याला काय लाभ होतो? तर कर्तेपणाचा अहंकार उरत नाही. पण दान घेणाऱ्यानंही अंतर्मुख होत गेलं पाहिजे. विंदांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,’’ हा दृष्टिकोन याचकानंही बाळगला पाहिजे. आता मूळ विवेचनाकडे वळू. तर, योगी जो असतो तो दान, भिक्षा स्वीकारतो आणि त्याबदल्यात दात्याला जे आध्यात्मिक जाणिवेचं दान देतो ते सूक्ष्म आणि विलक्षण असतं. हा योगी गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्वाशी समत्वानं वागून प्रत्येकाकडून भावप्रेमाची भिक्षा घेतो, तसंच प्रत्येकाकडून शिकण्यासारखं जे काही असेल ते ग्रहण करतो. हाच भ्रमराचाही गुण आहे, असं अवधूतानं सूचित केलं आहे. तो म्हणतो, ‘‘अतिलहान सुमन जें कांहीं। भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं। रिघोनि त्याच्याही ठायीं। आमोद पाहीं सेवितु।।९८।। थोराथोरा ज्या कमळिणी। विकासल्या समर्थपणीं। त्यांच्याही ठायीं रिघोनी। सारांश सेवुनी जातसे।।९९।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). म्हणजे, लहान फूल असो की मोठमोठी कमलपुष्पे असोत, कोणत्याही फुलातील साररूप अशा परिमलाचंच भ्रमर सेवन करतो, तो आकारमानाप्रमाणे फुलाचा आदर वा अनादर करीत नाही.

Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Story img Loader