मनाचं जोवर न-मन झालेलं नाही, तोवर ‘नाहीं भवअभवभावना’ ही स्थिती साधणं शक्य नाही. नाथ सांगतात, माझ्या मनाचं न-मन झाल्यानं तुला नमन करीत आहे. या न-मनामुळे ‘भव’ म्हणजे काही असणं आणि ‘अभव’ म्हणजे काही नसणं, यो दोन्हींत काही फरकच वाटेनासा झाला. त्यामुळे जे हवंसं वाटतं ते असण्याचा आनंद नाही किंवा जे नकोसं वाटतं ते असण्याचं दु:खं नाही आणि जे हवंसं वाटतं ते नसण्याचं दु:खंही नाही! ही पूर्ण स्वीकाराची स्थिती आहे. ‘जैशी स्थिती आहे तैशापरी राहे’ची स्थिती आहे. पण ही स्थिती सहजसाध्य आहे का हो? अर्थात नाही! या दोन्ही चरणांमधे वर्णिलेला आंतरिक घडवणुकीचा पल्ला फार मोठा आहे. तो सद्गुरूकृपेशिवाय आणि आधाराशिवाय शक्यच नाही. नाथांची ही आंतरिक जडणघडण कशी झाली आणि त्यानं त्यांची स्थिती काय झाली, हे आता तीन अभंगांच्या आधारे आपण पाहणार आहोत. त्यातले पहिले दोन अभंग जनार्दन स्वामींचे नाथांना बोधपर असे आहेत, तर तिसरा अभंग खुद्द नाथांचा आहे. नाथ जेव्हा जनार्दन स्वामींकडे गेले, तेव्हा स्वामींनी त्यांची अंतर्बाह्य़ घडण केली. यातला बोधपर असा पहिला अभंग अतिशय विख्यात आहे. हा अभंग असा :
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा