* कोलांटय़ा कशासाठी?
शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर भागातील कोहिनूर मिलच्या जागेत व्हावे, अशी मनोमन इच्छा शिवसनिकांची आहे व ती योग्यच आहे. या मिलसमोर हमरस्ता असल्याने ते कुणालाही सहज पाहाता येईल. शिवाय सेनाभवन नजीकच आहे. परंतु यावर मनोहर जोशी यांची प्रतिक्रिया न समजण्यासारखी आहे. कोहिनूर मिलची जागा माझी नाही आणि ती जागा स्मारकासाठी योग्य नाही असे त्यांनी पुणे येथील मुलाखतीत सांगितले, ते अनाकलनीय आहे.
– नंदकिशोर पेडणेकर, अहमदनगर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
* मान्यवर गप्प का आहेत?
विलक्षण प्रतिभेचा व्यंगचित्रकार आणि लोकोत्तर राजकीय नेता काही दिवसांपूर्वी आपल्यातून निघून गेला. त्यांच्या अंत्यदर्शनाला लाखोंचा जनसमुदाय लोटला. या जनसागरात मराठी साहित्यविश्वापकी कोणी होता काय? आणि किती साहित्यिक अंत्यविधीच्या स्थळी उपस्थित होते? मुंबईत सत्तरेक बुद्धिमंत आहेत, त्यांच्यापकी कोणी यावेळी हजेरी लावली होती? सामाजिक चळवळीतले थोर नेते यावेळी कुठे गायब झाले होते? पंधरा-वीस दिवसांनंतरही कोणा साहित्यिकाला, विद्वानाला या महान नेत्याबद्दल आदरांजलीपर लिहावेसे वाटू नये? नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्याविषयी चार आदराचे शब्द काढावेसे वाटू नयेत? का बरे ही अशी सांस्कृतिक अनास्था? आज या लोकोत्तर नेत्याच्या समाधीवरून आणि स्मारकावरून अकारण वादंग माजवले जात आहे. ही सर्व मंडळी या वादंगात कोणत्या बाजूला आहेत? राजकीय कल्लोळाने गोंधळून गेलेल्या आमच्यासारख्या सामान्यांना या थोरांकडून प्रबोधनाची, मार्गदर्शनाची अपेक्षा असता हे मान्यवर गप्प का आहेत?
– अवधूत परळकर.
* ज्येष्ठांसाठी ठाण्यात रुग्णालय हेच खरे स्मारक ठरेल
शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूनंतर त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्कवर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यास शासनाने शिवसनिकांच्या श्रद्धेचा आदर ठेवून परवानगी दिली. अर्थातच त्यानंतर त्यांचे भव्य स्मारक तेथेच उभारण्याची मागणी जोर धरू लागली. त्यांचे स्मारक असावे ते भव्य असावे, त्यांचा मोठा पुतळा उभारण्यात यावा, तो शिवाजी पार्कवरच असावा अशा अनेक विधायक सूचना वर्तमानपत्रांतून येत होत्या. शिवसेनेच्या स्थापनेनंतर सर्वात प्रथम बाळासाहेबांनी सामान्य माणसासाठी वैद्यकीय सेवेच्या बाबतीत रुग्णवाहिका दिल्या. जवळजवळ प्रत्येक शाखेने आपल्या विभागातील जनतेच्या सोयीसाठी ठेवलेल्या होत्या. सर्वात प्रथम शिवसेनेने ठाणे महापालिका जिंकली. तेव्हापासून बाळासाहेबांचे ठाणेकरांवर विशेष प्रेम होते. फेब्रुवारी २०१२च्या महापौर निवडणुकीत सेनेचा महापौर निवडून यावा यासाठी सेनेचे तीन आमदार कृष्ण कुंजवर श्री. राज ठाकरे यांचा पािठबा मिळावा म्हणून गेले. श्री. राज ठाकरे यांनी आपला पािठबा जाहीर करताना तीन विधायक सूचना ठाणेकर जनतेसाठी केलेल्या होत्या. त्यांतील महत्त्वाची सूचना होती ती, ठाण्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज महापालिकेतर्फे इस्पितळ बांधण्यात यावे. ठाणे पालिकेत मनसेच्या पािठब्यावर सेनेचा महापौर निवडून आला, पण अजूनही यासंदर्भात अंमल केलेला दिसत नाही. आतातरी ठाण्यात सुसज्ज इस्पितळ बांधून त्याला बाळासाहेबांचे नाव दिल्यास ते उत्तम स्मारक होईल.
– प्रवीण हिर्लेकर, डोंगरी,मुंबई.
* भयानकतेच्या पलीकडले
मुंबई व परिसरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भातील बातमी वाचली. (१२ डिसें.) काळजाचा थरकाप उडवणाऱ्या, महिलांवर होणाऱ्या अत्त्याचाराच्या बातम्या ऐकून, वाचून आपण खरेच प्रगल्भ होतोय का असा प्रश्न निर्माण होतो. आजही आपल्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या समाजात महिलांना केवळ निम्न स्थानच नव्हे तर अत्याचारालाही समोरे जावे लागतंय ही खरेच आपल्या प्रगल्भतेची शोकांतिका आहे. स्त्रीभूणहत्ये विरुद्ध रान उठवणाऱ्यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे. गृह खात्याची जबाबदारी असलेल्यांनी आणि पोलिसांनी आपला धाक समाजावरून गमावला आहे याचेच हे लक्षण आहे. सांस्कृतिक अध्पात हे याचे दुसरे कारण. घरातून नष्ट होत चाललेले संस्कार आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण समाजातील भौतिकता वाढवत आहेत व महिलांच्या शोषणाचे प्रकार वृिद्धगत होत आहेत. म्हणूनच कठोर कायद्याबरोबर समाजमनावरील संस्कार पुनप्र्रस्थापित करण्याची वेळ आली आहे.
– महेश भानुदास गोळे, कुर्ला(पश्चिम), मुंबई.
* पालकही तितकेच जबाबदार
‘रोड रोमियोंच्या मुसक्या आवळणार’ या शीर्षकाखालील वृत्त वाचले. (६ डिसें.) महिला-मुलीच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलिसांनी अशा रोड रोमियोंच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. छेडाछेडी करण्याची व कामुक हिंसक क्रुरदृश्ये करण्याची युवा पिढीची मानसिकता ही एक सामाजिक समस्या आहे. अशा घटनेला लैंगिक शिक्षणाचा अभाव व प्रसारमाध्यमाचा वाढता प्रभाव आदींना जबाबदार धरले जाते यात तथ्थ असले तरी, अशा समस्येला पालकही तितकेच जबाबदार आहेत.
माणसाची वैषयिक भूक व तिला अनुलक्षून निर्माण होणाऱ्या विविध भावना म्हणजे न उलगडणारे कोडे आहे. प्रेम असुया, हुशारी आणि त्यातले सगळे ताण-तणाव याचे मूळ या वैषयिकतेत गुंतलेले असते. किशोरावस्थेतील मुले लैंगिकदृष्टय़ा अॅक्टिव बनत आहेत. ज्या वयात मुलामुलींची नैसर्गिक वाढ होणे चालू असते, त्याच वयात अर्धवट विकसित अवस्थेत ते असे भरकटू लागले आहेत. पालक या बाबतीत तटस्थ वृत्ती स्वीकारतात. अभ्यासक्रमात त्याचा समावेश नाही. संपूर्ण शास्त्रीय माहिती देऊ शकेल असे चांगले साहित्य सर्रास उपलब्ध नाही. मुलांना त्यांच्या शरीरातील बदलांचा योग्य अर्थ समजवला पाहिजे. एखादी गोष्ट सातत्याने तुमच्यासमोर येत राहिली, तुम्ही बघत, ऐकत राहिलात तर तिचा परिणाम मनावर होतो. विशेषत: लहान मुलावर आजकाल सिनेमा, दूरचित्रवाणीवरील जाहिरातीमधील अर्धनग्न तरुणीचे दर्शन, अश्लील इंटरनेट, त्याचप्रमाणे अश्लील हावभाव भावनोद्रेक करणारी कामुक हिंसकक्रुरदृश्ये, मालिकेतील विकृत नातेसंबंध यांचा विपरीत परिणाम कोवळ्या बालमनावर होत असतो. हिरोची रोडसाइट रोमियोगिरी चित्रपटांत ठीक आहे. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र त्याचे दुष्परिणाम होतात. वाईट गोष्टी आपल्या फायद्याच्या समजून आपण पटकन उचलतो. लैंगिक व नीतीशिक्षण अभ्यासक्रमात आणणे जरुरीचे आहे.
शिक्षणातील वाढत्या स्पर्धेला यशस्वीरीत्या तोंड देण्यासाठी अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी पालकाचे प्रेशरकुकरसारखे दडपण असते. त्यामधून तात्पुरती सुटका व पळवाट म्हणजे कोवळ्या वयातील मुलींची छेडाछेडी, प्रेमप्रकरण आणि त्यातून घेतलेले शरीरसुख! तसेच कौटुंबिक जीवनातील ताणतणावांमुळे किशोर-किशोरी या भलत्या मार्गाकडे वळतात. फॅशनच्या स्वत:च्या कल्पना आणि एकूण बंधने झुगारून स्वच्छंदपणे (की स्वैराचारी) जगण्याची आवड या सगळ्यातून तरुण पिढीचे भवितव्य घडत आहे.
– स्टीफन कोयलो, होळी, वसई.
* गिरणी कामगारांना ‘सेकंड होम’ नकोय!
मुंबईत सलग १५ वर्षे वास्तव्य करणाऱ्या परप्रातियांना ‘मुंबईकर’ समजून म्हाडाचे मालकीचे घर घेता येते. दर दहा वर्षांनी अनधिकृत झोपडय़ा अधिकृत करण्यात येतात. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गिरणी कामगारांच्या पिढीने योगदान दिले. त्यानंतरच्या पिढीने मुंबईच्या विकासात हातभार लावला. अशा गिरणी कामगारांना शासन मुंबई बाहेरचा रस्ता दाखवते व पुण्यात घर देण्यासाठी महसूल मंत्र्यांची समिती नेमली जाते. ‘याला काय म्हणावे?’ गिरणी कामगारांना हक्काचे राहाण्यासाठी घर हवे आहे. मौजमजेसाठी सेकंड होम नको. एवढे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावे व त्वरित सदर समितीस मुंबईत गिरणी कामगारांना घर कसे देता येईल अशी कारवाई करावी. स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जपताना स्वत:ची कार्यसम्राट प्रतिमा निर्माण करावी.
– राजन म्हात्रे, वरळी.
* लोकशाहीची थट्टा
‘एफडी. आय’ मत विभाजनात यूपीएची सरशी ही बातमी वाचली. एकूण सभासद संख्येच्या अध्र्याहून कमी मतदान होऊनही ठराव संमत होतो ही लोकशाहीची मोठी थट्टाच आहे. याच्या मागचे गणित व हेतू सर्वजण जाणतात. सभागारात किमान मतमोजणी मागितली वा अवश्यक आहे असे ठराव एकूण सभासद संख्येच्या निम्म्याहून अधिक असल्याशिवाय संमत होऊ नये अशा तऱ्हेचा नियम करणे आता आवश्यक बनत चालले आहे.
– द. ज. आंबेडकर, मुंबई.