विनयभंग, बलात्कार, खून यांनी आजकाल वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. अचानकच या सगळय़ाची सुरुवात झाली की मंदगतीने या अराजकाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या समाजाला या पावलांची आजपर्यंत चाहूली लागली नव्हती? या घटनांवर समाजातल्या सुजाण लोकांच्या प्रतिक्रिया, पोलिसांची कार्यवाही, राजकारण्यांनी घेतलेली नोंद यांमुळे स्त्रियांची भीड चेपून आता या घटना समाजापुढे आणण्याचे धारिष्टय़ स्त्रियांच्यात निर्माण झाले आहे, की वर्तमानपत्रवाले या बातम्यांचा सतत शोध घेऊन त्यांना अग्रक्रम देऊ लागले? माहीत नाही.
या पाश्र्वभूमीवर मला २५ वर्षांपूर्वीची घटना आठवते आहे. स्थळ पुणे शहर, ‘पीएमटी’ची बस. वेळ दुपारची, त्यामुळे बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. एककॉलेजला जाणारी मुलगी खिडकीजवळ बसली होती. बसायला जाग असतानासुद्धा एक पुरुष ड्रायव्हरजवळ उभा होता. एका स्टॉपवर बसमध्ये येऊन एक मध्यमवयीन पुरुष त्या मुलीजवळच बसला, तोही अशाप्रकारे की कोणत्याही स्त्रीला चीड यावी. पाय फाकवून वळणावर जणू सहज झाले असे भासवत तो त्याचा कार्यभाग साधून घेत असावा. आणि अचानकच ड्रायव्हरजवळ उभा असलेल्याने येऊन त्याची गचांडी धरून त्याच्या थोबाडीत मारल्या. प्रथम त्याने कांगावा करण्याचा प्रयत्न केला पण मारणारा हात पोलिसाचा आहे हे लक्षात आल्यावर तो गयावया करून उतरून गेला.
मी आवड म्हणून तसेच व्यावसायिक कार्यक्षेत्रामुळे निरनिराळय़ा शहरांत, गावांत दिवसा/ रात्री गेली २५ वर्षे फिरते आहे. त्या मुलीवर आलेला प्रसंग त्यानंतरही सतत घडताना पाहिला आहे. कर्तव्यदक्ष पोलिसांबद्दल वाचले आहे, वेळप्रसंगी पाहिलेही आहेत. तक्रारीची वाट न पाहता अॅक्शन घेणारा तो दक्ष पोलिस मात्र मला अशा कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी परत कधीच दिसला नाही.
.. तो पोलिस मात्र कधीच दिसला नाही!
विनयभंग, बलात्कार, खून यांनी आजकाल वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. अचानकच या सगळय़ाची सुरुवात झाली की मंदगतीने या अराजकाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या समाजाला या पावलांची आजपर्यंत चाहूली लागली नव्हती? या घटनांवर समाजातल्या सुजाण लोकांच्या प्रतिक्रिया,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2012 at 12:13 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Email to editor