उपयोजित नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या वृक्षाचीच एक शाखा.  प्रत्येक क्षेत्रागणिक अशी निरनिराळी उपयोजित नीतिशास्त्रे, त्यांच्यापुढील निरनिराळे प्रश्न यांची अनेक पाने आज उलगडू लागली आहेत..
नतिक संघर्ष व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन पातळ्यांवर होतात. सामाजिक पातळीपेक्षा व्यक्तिगत पातळीवरील नतिक संघर्ष निरपेक्षपणे व्यक्तीला थेटपणे धारेवर धरतो. सामाजिक पातळीवरील संघर्ष असेच निरपेक्षपणे धारेवर धरले गेले, तर सामाजिक प्रश्नांचे भान प्रत्येक व्यक्तीला म्हणजे समाजाला योग्य ताíकक विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल.   
देकार्तचे ‘तत्त्वज्ञानाचे झाड’ ही संकल्पना पाहता आज विसाव्या-एकविसाव्या शतकात या झाडाला आलेली फळे म्हणजे ‘उपयोजित नीतिशास्त्र’ आणि ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ या ज्ञानशाखा, असे आपण आज साधारणपणे म्हणू शकतो. देकार्तने भविष्य वर्तविले म्हणून उपयोजित नीतिशास्त्र आणि उपयोजित तत्त्वज्ञान ही ज्ञानफळे आली आहेत, असे नव्हे. ती आज उपलब्ध झाली, म्हणून त्यांना आपण फळे (किंवा ताजी पालवी) म्हणू. देकार्तला अपेक्षित असलेली सामाजिक नीतीची संकल्पना जास्तीत जास्त स्वयंस्पष्ट, नि:संदिग्ध आणि नि:संशय होईल, अशी मांडणी ‘उपयोजित नीतिशास्त्र’ या तत्त्वज्ञानाच्या अभ्यास शाखेत केली जाते.    
प्रत्येक काळात काही विधिनिषेधाचे नियम निर्माण होत असतात, हे लक्षात घेतले, तर नीतिशास्त्राचा इतिहास म्हणजे विधिनिषेधांच्या संकल्पनांचा किंवा नतिक संकल्पनांचा इतिहास असतो. या विधिनिषेधांत नेहमीच बदल होत असतो. तो बदल होण्यामागे सामाजिक, राजकीय, आíथक, तंत्र-वैज्ञानिक इत्यादी प्रकारची कारणे असतात. अनेकदा अनेक पातळय़ांवरील हितसंबंध जपण्यासाठीदेखील, समाजातील विशिष्ट वर्गाच्या अपेक्षांचे स्वरूप लक्षात घेऊन नीती आणि अनीतीबद्दल विचार मांडले जातात. जीवन जसजसे गुंतागुंतीचे, संकीर्ण होत जाते, त्यानुसार नीतीच्या संकल्पना आणि त्यांचे उपयोजन जटिल बनते. ‘उपयोजित नीतिशास्त्र’ या वैचारिक प्रवासाची योग्य दखल घेते, मोठय़ा नतिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू पाहते. या सर्वाचे सखोल ताíकक विश्लेषण करून समकालीन समस्या सोडविण्यात मदत करते.
या नव्या अभ्यास विषयाचा उगम अमेरिका-युरोपात झाला. अमेरिकन समाजात व्यक्तीचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यात काटेकोरपणे फरक केला गेला आणि त्यानुसार नतिक निकष बनविले गेले. आर्थर हॅडली (१८५६-१९३०) या अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याने तो मुख्यत: केला. त्यानुसार ‘व्यवसायाचे नीतिशास्त्र’ ही संकल्पना विचारविश्वात रुजली.
समाजात व्यवसाय अनेक प्रकारचा आणि अनेक रीतींनी केला जातो. या व्यवसायातील नतिक पेचप्रसंग पाहता नतिक समस्यांचे वर्गीकरण जैव-वैद्यकीय नीतिशास्त्र, व्यवसाय व धंद्याचे नीतिशास्त्र आणि पर्यावरणाचे नीतिशास्त्र अशा तीन मुख्य शाखांमध्ये करण्यात आले. क्लोिनग, मानवी अवयवारोपण, मेडिक्लेम, महागडे वाटणारे वैद्यकीय शिक्षण; छोटे-मोठे धंदे ते बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कर्मचारी व कंपनीचे समाजाशी असलेल्या नात्याचे स्वरूप आणि आपली भावी मानवी पिढी, प्राणी-पक्षी जगत, अतिसूक्ष्म जीव, पर्यावरणीय व्यवस्था व एकूण निसर्ग, विश्व यांच्याशी आपले नाते कसे असावे, या नतिक समस्यांच्या चिंतनातून अनुक्रमे या तीन शाखा उदयास आल्या.   
वैद्यकीय संस्थांची रचना आणि व्यवसाय म्हणून वैद्यक विज्ञानाचे काम यांच्याशी जैव-वैद्यकीय किंवा वैद्यकीय नीतिशास्त्र निगडित आहे. वैद्यकीय नीतिशास्त्रापेक्षा व्यवसाय व धंद्याचे नीतिशास्त्र खूप व्यापक व गुंतागुंतीचे आहे. या दोन्हींपेक्षा व्यापक आहे ते पर्यावरणाचे नीतिशास्त्र. आपली सामाजिक अभिवृत्ती आणि वर्तन, विशेषत: नसíगक साधनसंपत्तीचा वापर करण्याच्या व खाण्यापिण्याच्या मूलभूत सवयी आणि प्राणी व नसíगक जग यांच्या बाबतीत असलेल्या आपल्या नतिक अभिवृत्ती यांचा शोध यात घेतला जातो. या विविध अभिवृत्ती व सवयीमुळे एकूण पर्यावरणाचे आणि एकूण मानवी समाजाचे शोषण कसे होते, यावर पर्यावरणाचे नीतिशास्त्र उपाय शोधू पाहते.
व्यवसाय म्हणून वैद्यक व्यवसाय हा व्यवसायाच्या नीतिशास्त्राचा आणि वैद्यकीय नीतिशास्त्राचाही अभ्यासविषय बनतो. या वेळी तो जास्त जटिल होतो. पाश्चात्त्य-युरोपीय राष्ट्रांमध्ये या तिन्हीपकी जैव-वैद्यकीय नीतिशास्त्र महत्त्वाचे ठरले, कारण व्यवसायाचे नीतिशास्त्र तेथे अगोदरच स्पष्ट होते; परंतु या अथवा पर्यावरणाच्या नीतिशास्त्रातील समस्या जागतिक आहेत, तसेच युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, नववसाहतवाद, रासायनिक-आण्विक प्रकल्प, माहिती तंत्रज्ञान, संगणक, राजकारण, समाजकारण हेही जागतिक प्रश्न आहेत.
उपयोजित नीतिशास्त्र जसजसे विकसित झाले तसे युद्धाचे नीतिशास्त्र, सार्वजनिक धोरणांचे नीतिशास्त्र, उद्योगसमूहाचे, व्यवस्थापनाचे, राजकारणाचे, समाजकारणाचे नीतिशास्त्र रचले गेले. यातील प्रत्येक क्षेत्र अतिशय व्यापक असल्याने त्यातील जवळपास प्रत्येक घटकाचे नीतिशास्त्र रचावे लागले. व्यक्तिगत पातळीवर सरकारी/ निमसरकारी/ खासगी- नोकरांचे नीतिशास्त्र (उदाहरणार्थ- माधव गोडबोले यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये मांडलेला गोपनीयतेचा मुद्दा), पोलिसांचे नीतिशास्त्र, शिक्षक-प्राध्यापकांचे नीतिशास्त्र, पत्रकारांचे नीतिशास्त्र, लाचलुचपतीतील नीती, भेटी देण्याघेण्यातील नीतिशास्त्र, लेखकाचे नीतिशास्त्र (उदा. भालचंद्र नेमाडेंचा नवनतिकतावाद व देशीवाद, काही जणांचा न-नेमाडेवाद, आणखी काही जणांचा नेमाडे द्वेषवाद, नेमाडेपंथीयांचा प्रतिद्वेषवाद), विषयानुसार- विज्ञानाचे नीतिशास्त्र, नवतंत्रज्ञानाचे नीतिशास्त्र, अभियांत्रिकी-जैव अभियांत्रिकीचे नीतिशास्त्र, संगणकाचे नीतिशास्त्र, धर्माचे नीतिशास्त्र, भाषेचे नीतिशास्त्र, ज्ञानाचे नीतिशास्त्र, स्त्रीवादाचे नीतिशास्त्र, माहिती अधिकाराचे नीतिशास्त्र, शेतीचे नीतिशास्त्र अशी अनेक नीतिशास्त्रे अस्तित्वात आली. याखेरीज दारिद्रय़, भूकबळी, अश्लील साहित्यनिर्मिती उद्योग, वेश्या व्यवसाय, स्थलांतरितांचे प्रश्न, फाशी, नागरिकांचा खासगीपणा, जागल्या अशा प्रश्नांमागील नतिकता यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे.                   
उपयोजित नीतिशास्त्राच्या संदर्भात भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्याची मुख्य दोन कारणे संभवतात. पहिले, आपण सेवा, व्यवसाय व धंद्याच्या सीमारेखा निश्चित केलेल्या नाहीत. येथे व्यक्तीच्या अत्यंत खासगी धर्मभावना ते राजकारण, समाजकारण (चळवळी, संस्था, एनजीओ इ.), शिक्षण यांचा धंदा होतो.  दुसरे, जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणाचा आपण स्वीकार केला आहे; तथापि या सर्वाचे आपणास यथार्थ आकलन झाले आहे, त्याच वेळी आपणास गुंतागुंतीची भारतीय मानसिकता माहीत आहे, येथील सर्वसामान्य जनतेच्या अस्सल गरजा लक्षात घेतल्या आहेत, मग आपण या धोरणांना भारतीय चेहरा दिला व त्यानंतर ती राबविली जात आहेत, असे म्हणता येत नाही. आपण सेवा, व्यवसाय, धंदा आणि जागतिकीकरण यांचा योग्य मेळ घालू शकलेलो नाही. परिणामी येथील सार्वजनिक नतिक समस्या आणखी उग्र बनल्या आहेत. जसे की, भ्रष्टाचार हा तात्त्विक मुद्दा नसून प्रशासकीय रचनेचा आहे आणि व्यावहारिक पारदर्शकता हा नतिक प्रश्न आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरा तीव्र मुद्दा आहे तो उच्चशिक्षणाचे नीतिशास्त्र. प्रबंधांतील वाङ्मयचौर्यात चोर पकडणे कठीण ठरू लागते, कारण चोरी पकडणारे पोलीस, न्यायाधीश चोरांपकीच असू शकतात. थोडक्या लोकांतच हा चोर-पोलीस खेळ रंगतो, त्यामुळे सामान्यजनांपर्यंत काही पोहोचत नाही.     
भारतीय विद्यापीठांत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात उपयोजित नीतिशास्त्र ही गेल्या दशकात समाविष्ट करण्यात आलेली नवी शाखा आहे. महाविद्यालय पातळीवर ती अनेक ठिकाणी अद्याप रुजायची आहे.  उपयोजित नीतिशास्त्र भारतात नवे असले तरी जागतिक पातळीवर अनेक विद्यापीठांमध्ये त्यावर व्यापक काम होत आहे.
आजच्या समकालीन सामाजिक, राजकीय, आíथक इत्यादी भारतीय समस्यांचे स्वरूप पाहता उपयोजित नीतिशास्त्र या विचारक्षेत्रातील समस्यांचा अधिक परिचय करून घेणे आपणास उपयुक्त ठरेल. भारतीय वातावरणाशी निगडित विषयांचे स्वरूप क्रमश: पाहू.
लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र