जगभरात आज जवळपास सहा कोटींच्या आसपास नागरिक विस्थापित आहेत. त्यांच्या त्यांच्या देशातली राजकीय, आर्थिक परिस्थिती, गरिबी, हिंसाचार वैगरे कारणं आहेत त्यामागे. म्हणजे साधारण पाच ते सहा मुंबई भरतील इतका मानवसमूह बेसहारा आहे आता इथून पुढे तुमचे तुम्ही.. आता वाजलेत बारा.. मी तीन वाजेपर्यंत वाट बघीन.. तोपर्यंत आलात तर ठीकच. पण नाही आलात तर मी निघून जाईन आणि तुम्हाला शोधण्याच्या फंदातसुद्धा पडणार नाही.. आणखी एक. याच्या पुढे तुमचं विमाकवच चालणार नाही.. जर काही झालंच तर तुमचे तुम्ही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भर रस्त्यातली चालती गाडी थांबवत माझा जेरुसलेममधला यजमान असं म्हणाला तेव्हा पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे खिडकीबाहेर बघण्याची. काही अनपेक्षित घडलंय का वगरे पाहिलं. पण काहीच नव्हतं. सगळंच सुरळीत. फक्त उजवीकडे एक गल्ली सुरू होत होती. कोणत्याही शहरात होते तशी. माझ्या यजमानानं तिच्याकडे बोट दाखवलं. तीवर लिहिलं होतं : ..इथून पुढे इस्रायलींना प्रवेश नाही.
पॅलेस्टाइनची हद्द सुरू होत होती तिथून. बेथलेहेमला जायचं तर तिथून जावं लागतं. बेथलेहेम ख्रिस्त जन्माची जागा. तर जेरुसलेमला त्याचा मृत्यू. बेथलेहेम पॅलेस्टाइनवाल्यांच्या ताब्यात तर जेरुसलेम इस्रायलच्या. म्हणजे राजकारणानं ख्रिस्ताच्या आयुष्याची मरणानंतरही अशी वाटणी करून टाकलेली. खरं तर जेरुसलेम आणि बेथलेहेम म्हटलं तर एकाच शहराचे दोन भाग. म्हणजे सरळपणे पाहत गेलं तर जेरुसलेम कुठे संपतं आणि बेथलेहेम कुठे सुरू होतं.. हे कळणारदेखील नाही.
पण तरी ते कळावं.. आवर्जून कळावं अशा दोन व्यवस्था आहेत. दोन्ही मानवनिर्मित.
आपण जेरुसलेममधून जसजसं बेथलेहेमच्या जवळ जाऊ लागतो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांचा बाज बदलायला लागतो. मुंबईत कसं वांद्रे संपून धारावी सुरू होण्याच्या आधी तिचा सुगावा लागतो, तसं. समृद्धतेकडून बकालपणाकडचा प्रवास. मध्येच जॉर्डनच्या सनिकांची उद्ध्वस्त झालेली एक चौकी लागते. अनेक गोष्टींची ती आठवण करून देते. ते सगळं मागे सोडून आपण मग आकाशातल्या बापाचं जन्मस्थळ पाहण्यासाठी निघतो. बेथलेहेमच्या उंबरठय़ावर येऊन थांबतो.
यू फ्रॉम पाकिस्तान?
हा प्रश्न वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देतो. त्याआधी आपल्या कातडीच्या रंगामुळे जेरुसलेममध्ये किंवा तेल अविवमध्येही अशाच प्रश्नाला आपण सामोरे गेलेलो असतो. फरक इतकाच की इस्रायलींनी विचारलेलं असतं, तुम्ही भारतीय आहात का? त्याच इस्रायलमधल्या त्याच कोपऱ्यातल्या दुसऱ्या बाजूचा तरुण मात्र त्याच आपल्याला पाहून विचारतो.. तुम्ही पाकिस्तानी आहात का? गंमतच.
त्याचं नाव अबू रहीम. मला ख्रिस्तजन्मभूमीकडे घेऊन जाणाऱ्या मोटारीचा चालक. अबू या नावाच्या आपल्या आठवणी बातमीत वाचलेल्या उल्लेखांपुरत्याच असतात. हाही तसाच दिसायला. उंच. तगडा. कोरलेली दाढी. गॉगलमुळे डोळ्याचा रंग काही दिसला नाही. तोंडात सिगारेट. ती मात्र अव्याहत. एक संपली की दुसरी. आता टॅक्सीचा चालक असून असून काय असणार असा आपला समज.. त्या समजातूनच गप्पांना सुरुवात होते. पण दोन-पाच वाक्यांनंतर तो समज सोडून द्यावा लागतो.
कारण अबू फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट वैगरे होता. म्हणजे वित्तीय विश्लेषक वगरे. होता म्हणजे आहेही. पण त्यात त्याला काही कामच नाही. सौदीत असताना तो यातलं काही करायचा. पण सौदी त्याला सोडावं लागलं. का? या प्रश्नावर त्याचं उत्तर? आम्ही पॅलेस्टिनी मुसलमान अरबांनाही नकोसे झालोत.
आता काय करतोयस या पुढच्या प्रश्नावर त्याचं उत्तर- काय करणार? विजेचा भरवसा नाही, त्यामुळे उद्योग नाहीत. उद्योग नाहीत म्हणून बँकिंगची वगरे बोंब. काही अर्थव्यवहारच
नाही. आहे तो हा. पर्यटकांना घेऊन जाण्याचा. तोसुद्धा यांच्या मनावर अवलंबून.. असं म्हणून त्यानं बाजूच्या अभेद्य िभतीवरच्या मनोऱ्यातून डोकावणाऱ्या इस्रायली जवानांकडे बोट दाखवलं. यांना वाटलं की हा रस्ताही बंद. मग आमची उपासमार. त्याला विचारलं, इस्रायलींना इकडे येता येत नाही..मग तुम्हाला तिकडे जाता येतं का?
अबू म्हणाला.. अहो त्यांचं बरं आहे, इकडे नाही मिळालं यायला तरी काही अडत नाही. त्यांना बंदर आहे, विमानतळ आहेत.. आम्हाला साधं रेल्वे स्टेशनसुद्धा नाही. मला देशाबाहेर जायचं झालं तर जॉर्डनला जावं लागतं. समोर हा असा विमानतळ असूनसुद्धा तो वापरता येत नाही.
गावात पुढे जाताना वाटेत फक्त भग्नावशेष. दुकानं होती. पण बंदच. बाजूच्या िभतीवरचे रंगीबेरंगी फराटे हाच काय तो विरंगुळा. िभती इतक्या उंच की एखाद्या बोगद्यातून चालल्यासारखंच वाटावं. प्रवास जेमतेम १५ मिनिटांचा. आनंदहीन. उत्साहच नाही. त्या धर्मस्थळाशी शंभर-दीडशे जणांची गर्दी होती तितकीच. नाताळात इथे मोठी मौज असते, अबू म्हणाला.. आमचाही जरा धंदा होतो.
धार्मिकदृष्टय़ा त्यात काहीच रस नसल्यानं तीनच्या आतच परत सीमारेषेवर आलो. माझ्या यजमानाचा जीव जरा भांडय़ात पडला. एवढं काय त्यात वगरे म्हणायचा मी प्रयत्न केला तर त्यावर अमुक तमुक आत गेला तेव्हा कसा गोळीबार झाला होता वगरेचे दाखले द्यायला त्यानं सुरुवात केली. त्याला विचारलं तू आला असतास तिकडे तर नक्की काय झालं असतं? त्यावरचं त्याचं उत्तर अंगावर काटा आणणारं होतं. तो म्हणाला..
मला दगडांनी ठेचून मारायलासुद्धा त्यांनी कमी केलं नसतं. आणि नुसता त्यांनाच दोष का द्यायचा.. आमच्या लोकांनीही त्यांना अशीच वागणूक दिली असती.
बेथलेहेमहून तेल अविवला जायचं होतं. गावात शिरलो तर तणाव. कारण काय? तर इथियोपियन ज्यू जवानाला भूमिपुत्र इस्रायली पोलिसांनी मारहाण केली होती. त्यामुळे नाराज इथियोपियन ज्यूंनी मोर्चा काढला होता. म्हणजे प्रश्न स्थलांतरित विरुद्ध भूमिपुत्र असाही. रस्त्यात चौकाचौकात अफ्रिकी तरुणांचे तांडे दिसत होते. तेल अविवला आधी अनेकदा आलो होतो. हे असे अफ्रिकींचे समूह नवीनच होते. यजमानानं सांगितलं, हे सगळे निर्वासित आहेत. त्यातले बरेचसे बेकायदा आलेले. लिबिया, सुदान वगरे देशांमधून. ही नवीनच समस्या.
संध्याकाळी पॅरिस आणि रोममधले मित्र भेटले. दोघेही सांगत होते, भरमसाट संख्येनं त्यांच्या देशात आलेल्या स्थलांतरितांविषयी. तेही लिबियामधनं आलेले. असहाय असे. त्यांच्या मते त्यांचे रस्ते या स्थलांतरितांनी भरून गेलेत आणि वातावरणातही तणाव वाढलाय. त्यामुळे ते अस्वस्थ. खेरीज एकंदरच युरोपची आíथक गाडी अजून तरी रुळावर आलेली नाही. त्याचं एक वेगळं दडपण आहे त्यांच्यावर. नोकऱ्या राहतायत की जातायत ही काळजी. आणि त्यात हे आता विस्थापितांचं लोढणं. त्यामुळे समस्त युरोपात एक प्रकारची खदखद भरून राहिलीये. त्यातल्या एकाच्या वडिलांचा ग्रीसमध्ये व्यवसाय आहे आणि तो देश तर डब्यात गेलेला. त्यामुळे त्याची चिंता दुहेरी. पुढे दोन दिवसांनी इस्तंबूलमध्ये जायचं होतं. तिथे तर पावलापावलावर भिकारी. हातात त्यांच्या काही तरी खरडलेले फलक. त्यावर लिहिलेलं.. आम्ही सीरियन आहोत, आम्हाला मदत करा. आयोजक म्हणाले, हे नवीनच सुरू झालंय. हे इतक्या संख्येने येतायत की आमच्या व्यवस्थांवर चांगलाच ताण येऊ लागलाय. कसे पोसणार आम्ही यांना?
म्हटलं आपण काय सांगणार? परतल्यावर हे सर्व सहज एका सरकारी अधिकारी असलेल्या मित्राच्या कानावर घातलं तर तो म्हणाला, जगभरात आज जवळपास सहा कोटींच्या आसपास नागरिक विस्थापित आहेत. त्यांच्या त्यांच्या देशातली राजकीय, आर्थिक परिस्थिती, गरिबी, िहसाचार वगरे कारणं आहेत त्यामागे. म्हणजे साधारण पाच ते सहा मुंबई भरतील इतका
मानवसमूह बेसहारा आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा की एक खंड सध्या असा नाही की जो पूर्ण शांतता अनुभवतोय. पूर्वी निदान युरोपात, स्कँडेनेवियन देशांत वगरे तरी शांतात असायची. आता तीही नाही.
गेल्याच शनिवारी हे सगळं सांगणारा तो सरकारी मित्र सुटीसाठी स्वित्र्झलडला गेला. या भूतलावरचं नंदनवन वैगरे.
सोमवारी त्याचा तिथून व्हॉट्सअ‍ॅप संदेश आला.
झुरिकला मी आहे. रस्त्यावरची वाहतूक थांबवली आहे. कारण नेसलेच्या कारखान्यात स्फोट झालेत.
हे अस्वस्थ विश्वाचं वर्तमान काही संपायची लक्षणं नाहीत.