आदिती स्वामी आणि ओजस देवताळे हे खेळाडू यंदा तिरंदाजीत जगज्जेते ठरले. त्यांना खेळण्याची ‘दृष्टी’ दिली ती साताऱ्याच्या ‘दृष्टी आर्चरी अ‍ॅकॅडमी’ने. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी स्थापन केलेली ही संस्था ग्रामीण भागातील तिरंदाजांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

प्रवीण सावंत. सातारा जिल्ह्यातील वाढे गावातील तिरंदाजी प्रशिक्षक. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या प्रवीण यांचे आयुष्य पारंपरिक कला असलेल्या तिरंदाजी या क्रीडा प्रकाराभोवतीच गुंफले गेले आहे. आपल्याला जे काही करायचे ते तिरंदाजी क्रीडा प्रकारातच, या ध्येयाने ते प्रेरित झाले आहेत. त्यासाठी जगण्याचा त्यांचा धागा बनली आहे ती ‘दृष्टी’. प्रवीण यांनी जन्माला घालून भव्यतेचे स्वप्न पाहिलेली प्रशिक्षण संस्था. प्रवीण यांनी आपले आयुष्य या संस्थेसाठी आणि संस्थेतून घडणाऱ्या गुणवान तिरंदाजांसाठी वाहिले आहे.

pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे

प्रवीणच्या घरची परिस्थिती बेताची. कुटुंबाचा भार वडिलांच्याच खांद्यावर पडल्याचे प्रवीण यांनी लहानपणापासूनच पाहिले होते. त्यामुळेच वयात आल्यावर काहीतरी वेगळे करण्याचा विचार प्रवीण यांनी केला. सातारा भूमीत धनुष्यबाण त्यांच्या नजरेत पडले. कानावर येणाऱ्या गोष्टी आणि दूरचित्रवाणीवर पाहिलेल्या धनुर्विद्या या खेळाची माहिती घेतली. साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात असताना सकाळी वाईत चंद्रकांत पिसे यांच्याकडे सरावही सुरू केला. दुपारी महाविद्यालय आणि संध्याकाळी पोळ रुग्णालयात आरोग्यसेवकाची नोकरी, असा त्यांचा दिनक्रम होता. घरची परिस्थिती बेताची असताना प्रवीण हे काय करतोय, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटायचे. पण, आज आई-वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटतोय. आपल्या मुलाच्या हातून दोन जगज्जेते खेळाडू घडले, हे आई वंदना आणि वडील परबती सांगतात तेव्हा त्यांचे डोळेच अधिक बोलतात.

तिरंदाजी खेळाच्या सरावातून अनुभव मिळू लागला, तशी प्रवीण यांची धडपड आणि यशाची भूकही वाढू लागली. अर्थात त्या वेळी फारशा सुविधाही उपलब्ध नव्हत्या. शाहू स्टेडियमच्या मुलींच्या वसतिगृहाच्या मागे प्रवीण यांचा सराव सुरू झाला होता. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पदक मिळाल्याने तेव्हा गावात त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना धनुष्यबाण खेळताना पाहून साताऱ्यातील अन्य मुलेही ‘ए मला शिकव ना.. दादा मला पण..’ असा आग्रह धरू लागली. आपला सराव सुरू ठेवत प्रवीण यांनी या मुलांनाही शिकवायला सुरुवात केली. शिकवण्याचा हट्ट धरणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली.

हेही वाचा >>>मेट्रो : रुळावर कधी येणार? व्यवहार्य, तरीही तोटय़ात!

या मुलांना शिकवत असताना तिरंदाजी खेळातच खेळाडू म्हणून कारकीर्द घडवण्याची इच्छा प्रवीण यांच्या मनावरून केव्हाच पुसली गेली. सहकाऱ्यांना शिकवता शिकवता ते स्वत:तील खेळाडू विसरले, पण त्यांच्यातील प्रशिक्षक केव्हा जागा झाला, हे त्यांनाच कळले नाही. कुठलेही मानधन नाही, की शुल्क नाही. प्रवीण यांनी या मुलांना तिरंदाजी शिकविण्याचा वसा घेतला. यादरम्यान चरितार्थ चालवण्यासाठी प्रवीण पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिथे परीक्षेला जाऊन आले. मुलांना विनामानधन शिकवून पोटाची खळगी भरता येणार नव्हती. प्रवीण यांचा पोलीस भरतीचा प्रयत्न यशस्वी झाला. पोलीस सेवेत दाखल होऊन त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालवतानाच तिरंदाजीच्या प्रशिक्षणाचे काम सुरूच ठेवले. काम सांभाळून प्रशिक्षणाची तारेवरची कसरत प्रवीण करीत होते. मुलांची संख्या वाढल्यावर प्रवीण यांनी आपला मुक्काम काँग्रेस कमिटी भवनच्या मागे असलेल्या मैदानावर हलवला. पुढे हे मैदानही अपुरे पडू लागले. मग साताऱ्याजवळील सैदापूर येथील गुजर हॉस्टेलच्या मैदानात प्रवीण आणि त्याच्या तिरंदाजांचे पथक येऊन धडकले. दर एक-दोन वर्षांनी प्रवीण यांना हा मांडलेला दुसरा संसार हलवावा लागत होता. अशा वेळी पोळ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेचे दुकान असणारे महेंद्र कदम पुढे आले. त्यांची मुलगीही प्रवीण यांच्याकडे शिकायला येत होती. प्रवीण यांची धडपड, तळमळ ते पाहत होते. साताऱ्यापासून जवळच असलेल्या गावात आपली शेतजमीन मोकळी करून त्यांनी प्रवीण यांना दिली. आपल्यामागे कोणीतरी उभे राहिल्याने प्रवीण प्रोत्साहित झाले आणि जन्म झाला दृष्टी तिरंदाजी प्रशिक्षण संस्थेचा. याचदरम्यान अवघ्या जगाला हादरवून टाकलेल्या करोना महासाथीच्या संकटाचे प्रतिकूल परिणाम प्रवीण यांच्या वाटचालीवर होऊ लागले. खेळाडूंची संख्या रोडावू लागली. मैदानाच्या देखभालीचा खर्च मात्र कमी होत नव्हता. त्या वेळी पुन्हा महेंद्र कदमच प्रवीण यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी प्रवीण यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही. त्यामुळे प्रवीण तग धरून राहू शकले. जेव्हा काही नव्हते, तेव्हा या खेळाने आणि अकादमीने प्रवीण यांना साथ दिली.

प्रशिक्षणासाठी मुलांची संख्या वाढत असताना आजही प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांकडून प्रशिक्षण शुल्क घेतले जात नाही. या मुलांकडून केवळ मैदान देखभालीसाठीचा खर्च घेतला जातो. पिण्यासाठी शुद्ध पाणी, खेळाचे साहित्य ठेवण्यासाठी शेड, मैदानाच्या भोवतीची भिंत, रोज साहित्याची ने-आण करू न शकणाऱ्या मुलांचे साहित्य ठेवण्यासाठी स्टोअर रूम अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अकादमीत आता बाहेरून येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली आहे. या मुलांची काळजी घेण्यासाठी स्वत: प्रवीण आणि त्यांची पत्नी सायली कुठलीही कसर सोडत नाहीत. मुलांना एकटे वाटू नये, ही त्यामागची भावना असल्याचे प्रवीण सांगतात. या सगळय़ासाठी नाममात्र एक हजार रुपये मुलांकडून घेतले जातात. काही मुले ही रक्कमही देऊ शकत नसतील, तरी त्या मुलांनाही प्रशिक्षण संस्थेत सामावून घेऊन शिकवले जाते.

हेही वाचा >>>कार्यकर्तृत्वातून मोदींचे टीकाकारांना चोख उत्तर

तिरंदाजीतील कम्पाऊंड प्रकारातून आजपर्यंत खेळाडू घडले. जगज्जेते आदिती आणि ओजस याच क्रीडा प्रकारातील खेळाडू. ऑलिम्पिक प्रकार असलेल्या रिकव्र्हसाठी प्रवीण हे सध्या प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने चंडीगडमधील अनुराग कमल हे प्रशिक्षक महिन्यातील पाच दिवस येथे मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी येतात आणि उर्वरित दिवस प्रवीण मुलांकडून सराव करून घेतात. अनुराग यांचे प्रत्येक मुलासाठी सात हजार रुपये शुल्क आहे, पण प्रवीण यांची जिद्द आणि काम पाहून ते त्यांच्याकडून मानधन घेत नाहीत. कमल यांचे शुल्क आणि निवासाचा खर्च प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचे पालक मिळून करतात. तिरंदाजी खेळ हा वरकरणी धनुष्य-बाणाचा वाटत असला, तरी त्याचा पसारा मोठा आहे. धनुष्य, बाण, ताण आणि बरोबरीने आवश्यक असलेले साहित्य तेवढे परवडणारे राहिलेले नाही. भारतीय गट, रिकव्र्ह, कम्पाऊंड अशा तीन प्रकारांतील एका खेळाडूचा साहित्याचा खर्च ८ हजारांपासून चार लाखांपर्यंत आहे. अलीकडे लाकडाचे साहित्य लोप पावले असले, तरी धातूचे साहित्य प्रचलित झाले आहे.

अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना शासनाकडून काहीही मदत मिळालेली नाही. पोटाला चिमटा काढून सावंत कुटुंबीय मुलांना खेळण्याची दृष्टी देत आहेत. अगदी सुरुवातीला सायली आणि प्रवीण यांच्या आईने दागिने गहाण ठेवून निधी उभा केला. वाढणारा खर्च पतसंस्थेतून कर्ज घेत भागवला. मोबाइल आणि संगणकीय खेळात अडकून राहिलेल्या पिढीला मैदानाकडे वळवण्याची दृष्टी देण्यात सावंत कुटुंबीय यशस्वी होत आहेत. ‘दृष्टी भक्कम होण्यासाठी आधाराची गरज आहे. अधू झाल्यावर शस्त्रक्रिया करून उपयोग नसतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करावीच लागू नये इतके बळ मला ईश्वराने द्यावे आणि माझ्याकडून आदिती, ओजस यांच्यासारखे देशाला पदक मिळवून देणारे आणखी तिरंदाज घडावेत,’ अशी भावना प्रवीण व्यक्त करतात.

स्वत: प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत उभे राहिलेले प्रवीण देशासाठी तिरंदाज घडवण्यासाठी धडपड करत आहेत. आंतरराष्ट्रीय पदक मिळवण्यासाठी सुसज्ज सोयीसुविधा लागतात आणि त्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करावा लागतो. आतापर्यंत कसेबसे निभावून नेलेल्या प्रवीण यांची खर्च करण्याची क्षमता नाही. त्यासाठी त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. – ज्ञानेश भुरे

संस्थेपर्यंत कसे जाल?

दृष्टी प्रशिक्षण संस्था ही वाढे या गावी आहे. सातारा बस स्थानकापासून हे गाव चार किलोमीटरवर आहे. या गावी जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे.

सहकाऱ्यांची भक्कम साथ

अकादमीतील प्रशिक्षण पद्धतीत एक प्रकारची शिस्त आहे. प्रवीण हे स्वत: प्रशिक्षणावर लक्ष देतात. आता त्यांच्याकडूनच घडलेले माजी खेळाडू त्यांना प्रशिक्षणासाठी मदत करत आहेत. या सगळय़ाची जबाबदारी प्रवीणची पत्नी सायली सक्षमपणे निभावत आहेत. अकादमीच्या उभारणीत आणि व्यवस्थापनात सायली या प्रवीण यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. सायली आधी स्वत: तिरंदाजी शिकल्या. त्यांच्याबरोबरच शिरीष ननावरे, धनराज जाधव, सुजित शेडगे, धन्वंतरी वांगडे, जितेंद्र देवकर यांच्या साथीने त्या ‘दृष्टी’ची वाटचाल भक्कम करत आहेत.

संस्थेत घडलेले तिरंदाज आणि त्यांची कामगिरी

दृष्टी प्रशिक्षण संस्था प्रवीण यांच्या आयुष्याचा एक धागा बनून राहिली आहे. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाज घडून राष्ट्रीय स्तर गाजवू लागले आहेत. येथे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू स्पर्धात्मक आघाडीवर चमकू लागले. खेळाडूंची ही भरारी स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवर राहिली नाही, तर थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचली. आदिती स्वामी आणि ओजस देवताळे हे प्रवीण यांनी घडवलेले खेळाडू याच वर्षी जगज्जेते झाले.

हेही वाचा >>>आरक्षण हा सरकारचा ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही!

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,
प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००