जया डोंगरे

राज्यकर्त्यांविरोधात ‘ब्र’ही उच्चारण्याची जिथे सोय नसते, तिथे अनेक मूक प्रतीकेच जनतेचा आवाज ठरतात. चीन सरकारच्या शून्य कोविड धोरणामुळे टाळेबंदीच्या कराल दाढेत अडकलेल्या नागरिकांनी हाती घेतलेला कोरा कागद हे अशाच मूक विरोधाचं, तिथल्या नागरिकांच्या असंतोषाचं आणि अगतिकतेचंही प्रतीक ठरलं आहे. जगाच्या विविध भागांतील नागरिकांनी एकाधिकारशाही, हुकूमशाही, जुलमी राजवटींचा सामना करताना अनेक प्रतीकांचा कल्पकतेने वापर केलेला दिसतो. अलीकडच्या काळातील अशाच काही प्रतीकांवर आधारित आंदोलनांविषयी…

ajit doval visit china
भारत – चीन सीमेवर शांततेसाठी उपाययोजना, विशेष प्रतिनिधी चर्चेत दोन्ही बाजूंनी सहमती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ambadas Danve Vs Neelam Gorhe News
Neelam Gorhe संसदेत अमित शाह यांचं बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य, विधान परिषदेत पडसाद उमटताच नीलम गोऱ्हे विरोधकांवर संतापल्या, “चुकीच्या…”
Donald Trump
Donald Trump : “त्यांनी आमच्यावर कर लावला, तर आम्ही त्यांच्यावर… “; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला गंभीर इशारा
Amit Shah on Ambedkar
अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी
Narendra Modi
PM Narendra Modi : “या देशातला सर्वात मोठा जुमला म्हणजे…”, मोदींची काँग्रेसच्या ‘त्या’ घोषणेवरून टोलेबाजी!
Narendra Modi in sansad
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित नेहरूंचं ‘ते’ विधान वाचून दाखवलं; इंदिरा गांधींवरही टीकास्र!
two friends communication letter delivery joke
हास्यतरंग : हे पत्र…

कोरा कागद

चीन हा अशा देशांपैकी आहे जिथे शिस्त म्हणजे सरकारच्या आदेशाचे मुकाट्याने आणि काटेकोरपणे पालन करणे. २०१९पासून सततच्या आणि जाचक टाळेबंदीत जखडलेल्या नागरिकांच्या रोषाचा कडेलोट झाला आणि ते सरकारच्या या मनमानीविरोधात रस्त्यांवर उतरले. मात्र सरकारचा शब्दच अंतिम असलेल्या त्या देशात सरकारविरोधी एक शब्दही उच्चारणे गुन्हाच. अशा वेळी त्यांनी एकही शब्द न लिहिलेला ए-फोर आकाराचा कोरा कागद हाती घेतला.

या प्रतीकाचं मूळ २०२० साली हाँगकाँगमध्ये झालेल्या आंदोलनांत दडलेलं आहे. तिथे लागू करण्यात आलेल्या जाचक ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोधात’ प्रचंड असंतोष निर्माण झाला होता, मात्र त्याविरोधात घोषणा देण्यास वा घोषणा लिहिलेले फलक लावण्यास मनाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हाती कोरा कागद घेऊन आंदोलने करण्यात आली. चीनमधील नागरिकांनी आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी हेच माध्यम स्वीकारलं आहे. एकीकडे यातून सरकारच्या मुस्कटदाबीचाही निषेध केला जात आहे आणि त्याच वेळी आता तुम्ही कोरा कागद हाती घेतला म्हणून आम्हाला गजाआड टाकणार आहात का? असं आव्हानही दिलं जात आहे.

या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, चीनमधील प्रसिद्ध ‘एमजी स्टेशनरी’ने ए-फोर आकाराच्या कागदांची विक्रीच थांबविली. चीनमध्ये या ब्रँडची तब्बल ८० हजार विक्री केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांत आणि ऑनलाइनही विक्री बंद करण्यात आली. बंदी घातल्यामुळे या एमजी स्टेशनरीचे शेअर्समध्ये तीन टक्क्यांनी घसरले. या बंदीसंदर्भात एक पत्रक प्रसारित झालं होतं. त्यात कंपनीने म्हटलं होतं की, ‘कंपनी देशातील विविध शहरांत सुरू असलेल्या व्हाइट पेपर आंदोलनांचा निषेध करते. नागरिकांना बेकायदा कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’ स्टॉक गडगडल्यानंतर मात्र कंपनीने हे पत्र बनावट असल्याचं आणि कागदांची निर्मितीप्रक्रिया सुरळीत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र कंपनीच्या दाव्यात तथ्य नसल्याच्या प्रतिक्रिया चीनमधल्या समाजमाध्यमांवर उमटल्या. शिवाय दुकान आणि संकेतस्थळांवरून कागद का गायब झाला आहे, याचंही समाधानकारक स्पष्टीकरण कंपनी देऊ शकली नाही.

हातांत साखळ्या तोंडाला पट्टी

कोरा कागद आंदोलन सुरू असतानाच चीनमधील झेजियांग प्रांतात एक महिला हात साखळ्यांमध्ये जखडलेले आणि तोंडावर पट्ट्या लावलेल्या अवस्थेत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या महिलेनेही हातात कोरा कागद धरला होता.

हिजाब

इराणमध्ये योग्य प्रकारे हिजाब घातला नाही म्हणून अटक करण्यात आलेली आणि अटकेत असतानाच मृत्युमुखी पडलेली महसा अमिनी गेले काही महिने चर्चेत आहे. तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठी हिजाबविरोधी चळवळ उभी राहिली. शेकडो इराणी महिलांनी आपला हिजाब जाळून आणि काहींनी आपले केस कापून निषेध केला. इराणवासीयांचा धर्मांध राजवटीविरोधातील आवाज जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला आणि जागतिक स्तरावरीव अनेक प्रभावशाली व्यक्तींनी तिथल्या महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.

बॅलेचे चित्र आणि कुत्रा

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद जसे जगभरात उमटले, तसेच ते रशियातूनही उमटले. आपल्या सरकारने आरंभलेल्या या हिंसाचाराविरोधात सर्वसामान्यांनी काही प्रतीकांच्या माध्यमातून आवाज उठवण्यास सुरुवात केली. सोव्हिएत काळात एखाद्या नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर नॅशनल टेलिव्हिजनवरून ‘स्वॉन लेक’ हा बॅले प्रसारित केला जात असे. या बॅलेचे चित्र भिंतींवर रंगवून क्रेमलिनमध्ये सत्तांतर हवे असल्याचे दर्शवण्यात आले.

कार्गो २००

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्गो २००’ अशी अक्षरं लिहिलेली भित्तिपत्रं रशियात जागोजागी चिकटवण्यात आली. १९८० मझ्ये रशिया- अफगाणिस्तान युद्धादरम्यान धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शवपिशव्यांसाठी हे शब्द वापरले जात. रशियन सैन्यदलात प्रचलित असलेले हे शब्द विनाकारण झालेल्या मनुष्यहानीचे प्रतीक म्हणून वापरले गेले.

कुत्रा हरवला आहे

रशियात काही युद्धविरोधी व्यक्तींनी कुत्रा हरवला असल्याची भित्तिपत्रे जागोजागी चिकटवली. त्यावर लिहिले होते. ‘रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून एक कुत्रा हरवला आहे. त्याचं नाव आहे भविष्य. या युद्धामुळे युक्रेनमधील मुलांचं भविष्य तर अंधकारमय झालं आहेच, पण रशियालाही याची फळं भोगावी लागतील, इथल्या मुलांचंही भविष्य संकटात आहे.

अम्ब्रेला मूव्हमेंट हाँगकाँग

२०१७ साली चीनने हाँगकाँगवासीयांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने करण्याचा अधिकार नाकारला. त्याविरोधात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पेपर स्प्रे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून ही आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. पेपर स्प्रेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी छत्र्या उघडून आंदोलन करण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमांतून हे आंदोलन देशभर पसरलं आणि एक साधी छत्री असंतोषाचं प्रतीक म्हणून पुढे आली.

तीन बोटांचा सॅल्यूट

थायलंड आणि म्यानमारमध्ये तीन बोटांचा सॅल्यूट हे निषेधाचं चिन्ह ठरलं. २०१४मध्ये थायलंडमधील सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यात आल्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी शेकडो नागरिकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी चौका-चौकांत जमून असे सॅल्यूट केले.

Story img Loader