थोडेसे संगीतज्ञान आणि किंचितसे तंत्रज्ञान आकलन या दोन्हींची सांगड असलेली व्यक्ती गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत संगणकावर ‘घरच्या घरी रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंग’ खेळ खेळू शकत होती. पण आता किंचितही संगीतज्ञान नसलेला आणि थोडेसे तंत्रज्ञान आत्मसात करता येऊ शकणारा कुणीही ‘घरच्या घरी संगीतकार’ बनू शकतो. हवे फक्त शब्द आणि अपेक्षित परिणाम हवा असलेली माहिती ‘एआय ॲप’ला देऊ शकण्याची युक्ती.

‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही अतिजड संकल्पना जगात सर्वांना समजेल इतकी सुकर कुणी केली असेल तर स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी. ‘सुपरटॉइज लास्ट समर लॉन्ग ’ या एका कथेवर त्यांनी २००१ साली ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हा चित्रपट केला होता. अर्थात त्याकाळात चित्रकथेतून ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’बाबत जो तर्क लढविला गेला, जे अभ्युपगम (हायपोथिसिस) वर्तविण्यात आले, त्यापेक्षा कैक पटींनी ते सरस असल्याचे उघड होते आहे. हॉलीवूडमधील कलाकारांचा ‘एआय’विरोधात ऐतिहासिक संप का झाला याची उत्तरे मानवी बुद्धिमत्ता आणि कौशल्ये यांच्यापेक्षा ‘एआय’ वरचढ होण्यात आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संगीत उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्या शेकडो कोटींचा दावा ‘एआय’द्वारे ‘घरच्या घरीच संगीत’ बनविणाऱ्या ॲपवर ठोकत आहेत. या एआयद्वारे संगीत बनविणाऱ्या कंपन्यांनीदेखील संगीत कंपन्यांना उत्तरे देण्यासाठी कंबर कसून तयारी केली आहे.

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

हेही वाचा…सीसीटीव्हीच्या नजरकैदेत नागरी स्वातंत्र्य

तर दुसरीकडे, यूट्यूब सारखे सुपरिचित माध्यम ‘एआय’ची संगीतशेती फुलावी यासाठी अधिकृत कंपन्यांशी करार करीत आहे. ए आर. रेहमान यांच्यासारखा संगीतकार एका गाण्यात दिवंगत कलाकाराचा आवाज मिळविण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची तरफदारी करताना दिसतो. शास्त्रीय संगीतच नाही, तर लोककला,पॉप , पंजाबी ठेक्याचे किंवा अगदीच आधुनिक ढंगाचे गाणे बनविण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला गाण्याचे शब्द फक्त हवेत. एआय ॲपला ते दिले की गाण्याची चाल, वाद्यांची रचना, गायनातील हरकती, मुखडा -अंतरा यांमधले विभाजन आदी साऱ्या दोन-तीन डझनांवर कलाकारांना लागणाऱ्या गोष्टी केवळ ३० सेकंदात ‘एआय ॲप’ करून देते. म्हणजे तुमच्याकडे शब्द (जे तुमचे ठेवा किंवा अन्य कुणाच्या काव्यातील) असले, तर मिनिटांत ‘सुनो’ सारखे ॲप दोन प्रकारची गाणी तुमच्यासमोर हजर करते. एखाद्या गायकाने -वादकाने आयुष्यभर रियाज करून अवगत केलेले तंत्र काही सेकंदांत एआय तुमच्यासमोर आणते. जगभरातील तंत्रस्नेही तरुण या प्रकारातून हयातभर संगीत शिकलेल्या व्यक्तीपेक्षा उत्तम गाणे तयार करून दाखवत आहेत. बाइलच्या ॲपस्टोर्सवर त्यामुळे ‘सुनो’सारख्या एआय म्युझिक मेकर्सना मागणी गेल्या काही दिवसांत वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय खटलेबाजीकडे…

गेल्या महिन्याच्या अखेरीस सोनी म्युझिक, वॉर्नर म्युझिक ग्रुप, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप या जगभरातील मोठ्या कंपन्यांनी ‘सुनो’सह आणखी एका कंपनीविरोधात मोहीम उघडली. त्यांच्यामते ब्रुस स्प्रिंगटिन, मायकेल जॅक्सन, मरिआ कॅरी, अबा यांच्या गाण्यांचा वापर या कंपन्या आपल्या ‘एआय ॲप’ला अद्ययावत करण्यासाठी करीत आहे. म्हणजे ‘एआय’ ॲप्स या लोकप्रिय गायकांचा आवाज-त्यांचे गाण्यातील कसबच उतरवून काढत नाही, तर त्यांच्या मिश्रणातून एक वेगळाच आवाज तयार करून जनसामान्यांना उपलब्ध करून देत आहे. जे गायकांबाबत आहे, तेच वादकांबाबतही या कंपन्या करीत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे. त्यावर एआय कंपन्यांनी गेल्या आठवड्यात मोठे पाऊल उचलत ‘लॅथम ॲण्ड वॉटकिन्स’ या महत्त्वाच्या कायदेसंस्थेला आपल्यासाठी लढण्यासाठी नेमले. त्यामुळे पुढल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवर या लढाईचे पडसाद उमटणार आहेत.

‘सुनो’ हे नाव हिंदी वाटत असले, तरी सात महिन्यांपूर्वी म्हणजे २० डिसेंबर २०२३ रोजी त्याचे लोकार्पण अमेरिकेतील चार तंत्रज्ञांनी केले. त्याचे एक कोटी २० लाख वापरकर्ते आज ‘घरच्या घरी’ संगीतकार बनले आहेत. या घरच्या घरी संगीत करण्याचा मोफत परवानाच जानेवारी- फेब्रुवारीमध्ये कित्येक भारतीय तरुणांनी मिळविला. हे कसे काम करते, आणि त्यातून तुम्ही या एआय ॲपला ‘प्रोम्प्ट’ म्हणजेच अचूक आज्ञा देण्यात तरबेज झालात, तर तीस सेकंदाला एक गाणे या वेगाने तुम्ही कितीही गाणी बनवू शकता.

हेही वाचा…‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे

प्रत्यक्ष अनुभवाचे उदाहरण…

गेली पंचवीस वर्षे मी संगीत वाजवतो. ‘गिटार’ या वाद्यामध्ये ॲडव्हान्स शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे शिक्षकीही केली. त्यानंतर स्वत: काही वाद्ये शिकल्यानंतर स्वत:ची हौसेपुरती गाणी बनविणे आणि आपल्यापुरती आपली कला ठेवणे, यापलीकडे याकडे पाहिले नव्हते. कारण स्वत:ची गाणी स्टुडिओत रेकॉर्ड करण्याचा खर्च (जो अलिकडे कमी झाला असला तरी) अधिक आणि त्यात वापरला जाणारा श्रमवेळही (गायक -वादक- म्युझिक मिक्सिंग) मोठा. गेल्या सहा सात वर्षांत हौसेपुरत्या उरलेल्या संगीतप्रेमात मी तरीसुद्धा सात-आठ गाणी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली. तासाच्या हिशेबात मिळणाऱ्या रकमेतील स्टुडिओ, आवाज आपलाच किंवा आपल्या ओळखीच्या म्हणजेच मोफत गाण्यास तयार असलेल्या व्यक्तीचा, वाजवली जाणारी वाद्ये आपलीच, वाजवणारेही आपण या भांडवलावर सर्वांत स्वस्तातले गाणे करण्यासाठीही सात हजार ते १० हजार इतकी रक्कम लागू शकते, हे ज्ञात झाले. माझ्याच एका कथासंग्रहात ‘क्यू आर कोडसह’ देण्यासाठी दोन गाणी मी थोड्या अद्ययावत स्टुडिओमधून केली. त्यांचा परिणामही चांगला आला. मात्र एका मित्राकडून जेव्हा ‘सुनो’ ॲपबद्दल माहिती कळाली, तेव्हा या परिणामांपेक्षा अधिक उत्तम अशी गाणी तयार करता आली. तेही शून्य रुपये- शून्य पैसे इतक्या भांडवलावर.

हे कसे घडते?

तुमच्या ई-मेल अकाऊंटवरून या ॲपवर साईन करावे लागते. त्यावरील क्रिएटच्या बटनावर गेल्यानंतर त्यातील ‘कस्टम लिरिक्स’मध्ये युनिकोड स्वरूपात देवनागरीत तुमच्या गाण्याचे शब्द जोडावे लागतात. त्यानंतर गाणे कसे हवे? त्याची एक यादी खाली दिली जाते. तिकडे सारे कसब असते. वाद्य निवड, गायक की गायिका हे ठरवताही तिथेच येते. मग तुमचा गाण्याबाबतचा ‘प्रॉम्प्ट’ पूर्ण झाला की पुढल्या तीस सेकंदात गाणे तयार.

हेही वाचा…आगामी अर्थसंकल्पात काय असायला हवे?

माझे मूळ गाणे आणि एआयने केलेली गाणी…

मी तयार केलेल्या एका स्वतंत्र गाण्याचे रेकॉर्डिंग आणि त्याच शब्दांतील गाण्याची ‘एआय व्हर्शन्स’ इथे देतो. या गाण्याचे एआय व्हर्शन माझ्याच शब्दांवर असले, तरी मी त्यातील आवाज, संगीत, मधले सारे तुकडे हे एआयच्या कल्पनेतले आहे. त्याला आज्ञा देताना एक गाणे हे नव्वदीची जाणीव करून देणारे आणि दुसरे वर्तमानकालीन वाद्यावळीवरचे असावे, हे जरी मी ठरविले असले, तरी ते पूर्णपणे एआयचे आहे. त्याने माझ्या शब्दांना पंजाबी ठेक्यात फिरवताना किंवा डुवा लिप्पासारखे एक व्हर्शन देताना मला पूर्णपणे सुखावले असले, तरी त्यांचा निर्माता मी नाही. पुढल्या काळात हे तंत्रज्ञान आणखी प्रगत होणार यात शंकाच नाही. पण कैक तास वाद्यांवर आणि आवाजावर रियाज करणाऱ्या कलावंतांची मेहनत? त्यांचा मेहनताना? यांचे काय होईल? ही एआयने बनविलेली माझी गाणी ऐकताना तुम्हाला इथल्या कुणासारखा आवाज त्यांत ऐकू येतोय? जमल्यास सांगा.

स्वतंत्र गाण्याचे रेकॉर्डिंग


त्याच शब्दांतील गाण्याचे ‘एआय व्हर्शन्स’

pankaj.bhosale@expressindia.com