ताराचंद म्हस्के पाटील

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अजित अनंतराव पवार अर्थात अजितदादा २२ जुलै रोजी वयाच्या पासष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. त्याचवेळी त्यांचे राजकारणही एका निर्णायकी वळणावर येऊन पोहोचले आहे. हे वळण अजितदादांच्या राजकीय गंतव्याला अर्थात त्यांनी उघडपणे बाळगलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेला दृष्टीपथात आणणारे ठरू शकते. हा पल्ला गाठला तर अजितदादा त्यांच्या अंगभूत गुणांच्या आणि अनुभवाच्या शिदोरीवर रयतेच्या मनातील मुख्यमंत्री सिद्ध होतील, यात शंका नाही.एखाद्या वटवृक्षाची छाया सदोदित डोईवर असण्याचे सुख त्याच्या सोबतीला खुरटण्याचा शापही घेऊन येत असते. मात्र उंची नसली तरी विस्ताराची जिगर बाळगत काही जण हिकमतीने स्वतःचे स्थान तयार करतात. अजितदादा हे त्यांचेच उदाहरण म्हणावे लागेल. राष्ट्रीय राजकारणात आघाडीचे राजकारणी म्हणून संपूर्ण देशाला ज्यांची ओळख आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे थोरले बंधू अनंतराव गोविंदराव पवार यांचे अजितदादा हे धाकटे चिरंजीव. शरदचंद्र पवार हे राजकारणातील मुरब्बी नेते, द्रष्टे, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या प्रश्नाची सखोल जाण त्यांना आहे. त्यांच्याच मुशीत अजितदादांचे नेतृत्व घडले, बहरले. अजितदादांची आजवरची वाटचाल काकांच्या पावलावर पाउल टाकतच झाली आहे.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
dharmaraobaba atram reaction on getting minister post
मी शंभर टक्के मंत्री होणार, पण अडीच वर्षाने, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…
Hasan Mushrifs statement regarding post of Guardian Minister of kolhapur
पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जायचंय – हसन मुश्रीफ
Ajit Pawar , Bhandara District Guardian Minister,
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे? प्रफुल्ल पटेलांच्या खेळीने…

भल्या सकाळी कामाची सुरुवात करणे, लोकांना भेटणे, त्यांची कामे करणे तसेच वक्तशीरपणा आणि शिस्त हे गुण आपल्या काकाकडून अजित दादांनी घेतले आहेत. कार्यक्रमास वेळेत पोहचणे किंबहुना अर्धा तास अगोदरच पोहचणे हा कटाक्ष अजित दादा आजही काटेकोरपणे पाळतात.केवळ राज्यातच नव्हे तर देशभराच्या राजकारणात दबदबा असलेला शरद पवारांसारखा नेता घरात असल्याने त्यांच्या लौकीकापुढे अजितदादांची राजकीय कारकीर्द झाकोळून जाण्याची शक्यता होती. पण आपल्या खमक्या, रोकठोक, बेधडक, कामाचा प्रचंड उरक असलेल्या आपल्या स्वभावाच्या बळावर अजितदादांनी स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. अगदी सुरूवातीपासूनच मिळालेल्या प्रत्येक पदाला त्यांनी चोख कामातून पुरेपुर न्याय देत स्वतःला सिद्ध केले.

अजितदादांची राजकीय जडणघडण बारामतीमधून १९८२ साली सुरू झाली. ते साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. पुढे १९९१ मध्ये त्यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला. त्याच सुमारास अजितदादा पुणे जिल्हा सहकारी बँकेवर निवडून गेले. या बँकेचे अध्यक्षही झाले. सलग १६ वर्ष त्यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केले. मात्र शरद पवार यांना मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावे लागल्याने अजित पवार यांनी काकांसाठी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याचवेळी शरद पवार यांच्या विधानसभेच्या जागेवर अजित पवार निवडून गेले.

अजितदादा आमदार झाल्यावर त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. ते जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ आणि नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या दरम्यान ते कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडविणारे नेते म्हणून ओळखले जाते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ६५ हजार मतांच्या मताधिक्याने अजित पवार निवडून आले आहेत. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून अजितदादा यांची नोंद झाली. १९९५ ते १९९९ हा शिवसेना-भाजपा युतीचा काळ वगळता २०१४ पर्यंत अजित पवार यांनी सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी घडवून शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित केली. या महाविकास आघाडी सरकारात अजित दादा उपमुख्यमंत्री होते. वेगवेगळ्या सरकारात अजित दादा यांनी चार वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आता शिंदे सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाले आहेत. ही त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची पाचवी वेळ. अजित दादांनी आतापर्यंत अर्थ-नियोजन, उर्जा, पाटबंधारे, कृषी, फलोद्यान, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्याचे मंत्री म्हणून उत्तम काम केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर जुलै २०२२ ते १ जुलै २०२३ या एक वर्षाच्या कालावधीसाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही अजितदादांनी उत्तम काम पाहिले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. अजित दादांना विविध खात्यांच्या मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे दिल्लीच्या भाजप हायकमांडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने दर्शविलेला विरोध झुगारून अजित दादांकडे अर्थ व नियोजन या मह्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद जाणीवपूर्वक दिले. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर आणणे हे प्रमुख कारण यामागे असावे.

याशिवाय बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त, छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर या तीन सहकारी साखर कारखान्याचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन अशा विविध ठिकाणी ते पदाधिकारी असल्याने अजितदादा हे आठवड्याचे सातही दिवस २४ तास सार्वजनिक कामात व्यग्र असतात.जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी अजितदादांची सतत धडपड सुरू असते. राज्यभरातून भेटायला येणारे नागरिक, कार्यकर्ते, पक्षाचे लहान- मोठे नेते यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सकाळी साडेसहापासूनच सगळ्यांसाठी उपलब्ध असतात. काम होण्यासारखे असेल तर काम होईल आणि त्यात अडचणी असल्यास काम होणार नाही असे जागच्या जागी रोखठोक सांगणारे नेते अशी त्यांची ख्याती आहे. कदाचित म्हणूनच अनेकांना ते कठोर, फटकळ वाटत असले तरी ते तितकेच संवेदशील आणि मायाळूही देखील आहेत. मित्रपरिवार, नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते यांच्या सुख-दु:खात आवर्जून सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांना तितकाच भावतो.

अजित दादांचा जनसंपर्क खूपच दांडगा असल्याने त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून रोज शेकडो लोक येतात. अजितदादांकडे कामे मार्गी लागतात, न्याय मिळतो याची खात्री असल्याने त्यांचे मुंबईतील सरकारी ‘देवगिरी’ निवासस्थान असो की मंत्रालयातील दालन, किंवा पुणे, बारामती येथील कार्यालय, या सर्वच ठिकाणी लोकांचा मोठा राबता असतो. अजित दादा सर्वांना भेटतात, त्यांची गाऱ्हाणी ऐकतात, त्यातून मार्ग काढतात आणि प्रश्नाची सोडवणूक करतात. त्यामुळे अजित दादांभोवती नागरिक, कार्यकर्ते, नेते यांचा मोठा गराडा असतो.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, मतदारसंघातील विकासकामांच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी मदत करणे यामुळे अजितदादा हे आमदारांमध्येही लोकप्रिय आहेत. पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विविध योजना तसेच विकास कामांसाठी वेळोवेळी मोठा निधी देऊन दादा त्यांना ताकद देतात. त्यामुळेच अजितदादांच्या पाठीशी आमदार मोठ्या संख्येने उभे राहतात. त्यामुळेच विकासकामे करायची असतील दादांच्यासोबत रहायला हवे, अशी पक्षातील लोकप्रतिनिधींची भावना असते.मंत्रीमंडळातील विविध खात्यांचा प्रदीर्घ अनुभव; सहकार, शिक्षण, सामाजिक, क्रीडा अशा विविध आघाड्यांवर उल्लेखनीय कामांचा प्रदीर्घ अनुभव; प्रशासनावर पकड, कामाची शिस्त, निर्णयक्षमता, प्रश्न सोडविण्याची हातोटी, दांडगा जनसंपर्क हे सगळे गुण असल्याने महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची मोठी क्षमता अजितदादा यांचेकडे आहे. २२ जुलै हा त्यांचा वाढदिवस. यंदा ते ६४ वर्षाचे झाले. ते आज-ना-उद्या मुख्यमंत्री होतील आणि राज्यातील रयतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरतील!

tarachand.mhaske@gmail.com

Story img Loader