– मंजिरी इंदुरकर

अल्लू अर्जुन घरी पोहोचला आहे. पुष्पा-२: द रुल हा तुफान यशस्वी झाला आहे. आणि एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत
pritish nandi died bollywood celebrities pays tribute
प्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचे निधन, करीना कपूरसह ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; संजय दत्त पोस्ट करत म्हणाला…

तुम्ही गेल्या काही दिवसांतील घडामोडींबाबत माहीर असाल, तर हे संदर्भ तुम्हाला माहीतच असतील. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेला गुदमरल्यामुळे जीव गमवावा लागला. ही चेंगराचेंगरी झाली कारण अल्लू अर्जुन, त्याची पुष्पा- २ या चित्रपटातली सहकलाकार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थिएटरमध्ये आले होते.

अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमने या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या घेतलेल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी तेलंगणा पोलिसांवर आहे असे मानणे चुकीचे नव्हते. लोक आपल्या आवडत्या कलाकारांजवळ जाण्यासाठी झुंबड उडवणार नाहीत, हे कार्यक्रमाच्या आयोजकांनी पहायला हवे होते.

हेही वाचा – केवळ आंबेडकरी अनुयायांनी संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे?

या घटनेनंतर अल्लू अर्जुनला अटक झाली. पण त्या दरम्यान त्याची बाजू घेण्यासाठी अनेक जण पुढे आलेले दिसले. उदाहरणार्थ, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. सी. रामाराव यांचे पुत्र के. टी. रामाराव यांनी ट्विट केले, “राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्टार अल्लू अर्जुन याला अटक ही गोष्ट म्हणजे राज्यकर्त्यांना वाटत असलेल्या असुरक्षिततेचा कळस आहे! चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांबद्दल मला पूर्णपणे सहानुभूती आहे, पण या सगळ्यात खरोखर चूक कुणाची?

या प्रकरणातही पोलिसांबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची ? ही अशी गर्दी हाताळणं ही अल्लू अर्जुनची जबाबदारी होती का? गर्दी हाताळणं हे जर पोलीस किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांचं काम असेल, तर मग या सगळ्यात अल्लू अर्जुनची जबाबदारी, भूमिका काय आहे?

२०१७ मध्ये, रईस या चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यानही असंच झालं होतं. समोर जमलेली गर्दी बघून शाहरुख खानने त्याचा टी-शर्ट आणि काही स्मायली बॉल गर्दीवर फेकले. ते झेलण्यासाठी एकच झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी होऊन एकाचा जीव गेला. अल्लू अर्जुनप्रमाणेच, शाहरुख खानच्या बाबतीतही झालं. त्याच्याविरुद्ध चाललेल्या खटल्यात, गुजरातमध्ये म्हणजे उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात तो निर्दोष ठरला. शाहरुख खानचा हेतू वाईट किंवा लोकांना इजा पोहोचवण्याचा होता, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा मिळाला नाही.

एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे की या प्रकरणांमध्ये संबंधितांचा हेतूच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. अल्लू अर्जुन काय किंवा शाहरुख खान काय, हे दोघेही कलाकार आपापल्या चित्रपटांचे प्रमोशन करत होते. आणि तरीही, दोन्ही घटनांमध्ये, प्रत्येकी एकाने जीव गमावला. अशी प्रकरणे हाताळताना त्यासंदर्भातील हेतूबद्दल नेहमीच चर्चा होते. पण या एका मुद्द्यावर किती अवलंबून रहायचं?

कायदेशीर युक्तिवादांमध्ये हेतू या मुद्द्याला महत्त्व असले तरी अनावधानाने घडणारा गुन्हा (टॉर्ट्स) या संकल्पनेचाही विचार करणे गरजेचे आहे. एरवी घडणारा गुन्हा म्हणजेच टॉर्ट (ज्या गुन्ह्याबद्दल कायद्याने नुकसानभरपाईची सोय करून ठेवली आहे असा दिवाणी गुन्हा) ही चूक असते कारण त्यातून कुणाची तरी हानी होते आणि अनावधानाने किंवा निष्काळजीपणातून गुन्हे घडतात तेव्हा त्यात वाईट हेतू नसला तरी एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे हानी होते.

ही दोन्ही प्रकरणे घडली आहेत ती निष्काळजीपणातून. आणि त्यांची जबाबदारी येते ती तिथे जास्त गर्दी होणार नाही, हे पाहणे, हे ज्यांचे काम होते, अशा अधिकाऱ्यांवर. पण आपले आवडते कलाकार दिसतात, तेव्हा गर्दी किती बेभान होते, हे अल्लू अर्जुन किंवा शाहरुख खान यांना खरोखरच माहीत नव्हते का?

समाज माध्यमांमुळे सेलिब्रिटी संस्कृतीचे स्वरुप बदलले आहे. आपण सतत प्रकाशझोतात असले पाहिजे, याचा सेलेब्रिटी व्यक्तींवर दबाव वाढला आहे. तुम्ही सतत समाजासमोर असलं पाहिजे, सतत लोकांना दिसलं पाहिजे हा रेटा इतका जबरदस्त असतो, की त्याची पूर्तता करण्यासाठी सेलेब्रिटी जोखीम पत्करतानाही दिसतात. सिम्बा (२०१८) या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेता रणवीर सिंग मुंबईतील चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारावर चढताना दिसला. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तो कार्यक्रमही यशस्वी झाला, पण हे आता म्हणता येतं, कारण तेव्हा कोणतीही चूक किंवा दुर्घटना घडली नाही.

हेही वाचा – महाविद्यालयांची संकेतस्थळे जुनाटच!

चेंगराचेंगरी घडायला अनेक वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. सगळ्यात मोठा घटक म्हणजे अतिउत्साही चाहते. माध्यमांचे कॅमेरे असले की त्यांच्या उन्मादात आणखी भर पडते. त्याव्यतिरिक्त. कार्यक्रमाचे आयोजक. आणि स्वतः. सेलिब्रिटी. अल्लू अर्जुन किंवा शाहरुख खान यांची या प्रकरणांमध्ये चूक असली तरी त्यांची जागा तुरुंगात आहे, असे मला वाटत नाही. आपला चित्रपट आर्थिक पातळीवर यशस्वी झालाच पाहिजे, हा दबावदेखील या सेलिब्रिटी लोकांच्या वागण्यामागचे कारण असू शकते. पण शाहरुख खानने त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या क्लृप्त्या करूनही त्याच्या रईस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. आणि अल्लू अर्जुनने किती प्रमोशन इव्हेंट केले हा तपशील बाजूला ठेवला तरी पुष्पा-२ ब्लॉकबस्टर आहे.

अशा वेळी मला महाभारतातील अश्वत्थामाच्या नशिबाची आठवण येते. युद्धाच्या शेवटी, दुःखी झालेल्या अश्वत्थामाने पांडवांच्या छावणीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात चुकून द्रौपदीच्या पाच मुलांचा मृत्यू झाला. या कृत्यामुळे, अश्वत्थाम्याच्या सद्सद्विवेकबुद्धीवर त्याच्या चुकांचे ओझे घेऊन अनंतकाळासाठी पृथ्वीवर फिरण्याचा शाप मिळाला. हे सेलिब्रिटीदेखील असे अश्वत्थामेच आहेत.

Story img Loader