लोकमान्य टिळकांवर अनेक भाषांत, असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांची आठवण २३ जुलै (लो. टिळक जयंती) आणि १ ऑगस्ट या दिवशी निघणे साहजिक आहे. पण गेल्या वर्षभरात आलेले ‘डिव्हाइन अॅजिटेटर्स : टिळक अॅण्ड हार्डी’ हे पुस्तक विशेष ठरावे. त्या मजूर पक्षाचे एक संस्थापक आणि पुढे ब्रिटनचे खासदार जेम्स केइर हार्डी हेदेखील १८५६ सालीच (१५ ऑगस्ट रोजी) जन्मले होते- म्हणजे ते आणि टिळक एकाच वयाचे. टिळकांनी सहा डिसेंबर १९१८ रोजी ब्रिटिश लेबर पार्टीला- मजूर पक्षाला- दोन हजार पौंडांची देणगी दिली. या घटनेच्या दशकभर आधीपासूनच हार्डी टिळकांमुळे प्रभावित झालेले होते. हार्डी भारत-भेटीवर १९०६-०७ मध्ये आले, कोलकात्यापासून आग्रा, पंजाबमार्गे मुंबई आणि पुण्यात आले, दक्षिणेत तुतिकोरीनपर्यंत गेले आणि तिथून श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असा प्रवास त्यांनी केला. या पुढल्या जलप्रवासादरम्यान भारताविषयी त्यांनी लिहिलेले ‘इंडिया- इम्प्रेशन्स अॅण्ड सजेशन्स’ हे पुस्तक १९०९ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, १९११ पासून टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांशी हार्डी यांचा पत्रव्यवहार सुरू झालेला दिसतो. तर लोकमान्य १९१८ साली इंग्लंडमध्ये गेले, त्याआधीच १९१५ मध्ये हार्डी यांचे निधन झाले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात टिळक व हार्डी या दोघांनीही वसाहतवादी युद्धखोर धोरणांना विरोध केलेला होता. या दोघांच्या वैचारिक आणि राजकीय जीवनक्रमाचा तौलनिक आढावा घेऊन, दोघांनाही ‘दैवदत्त संघर्षवीर’ ठरवणे हा या पुस्तकाचा उद्देश दिसून येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुस्तकाची रचना तीन भागांत आहे. पैकी पहिल्या भागाचे वर्णन वर आले आहेच आणि ते पुढेही पाहू. दुसरा भाग ब्रिटिश भांडवलशाही, वसाहतवादामागील ब्रिटिशांचा- विशेषत: ब्रिटनच्या कन्झर्व्हेटिव्ह वा हुजूर पक्षाचा विचार व त्याच्या परिणामी भारत दरिद्री होणे याचा आढावा घेतो, तर तिसरा भाग टिळक अथवा हार्डी- दोघांच्याही मृत्यूनंतर सुमारे ३० वर्षांनी भारतास मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दलचा आहे. भारताला स्वातंत्र्य मजूर पक्षामुळेच मिळाले, मजूर पक्षाच्या विचारधारेचा मोठा वाटा स्वातंत्र्योत्तर (१९५१ पर्यंतच्या) भारतीय वाटचालीतही होता आणि त्यात दारिद्र्य निर्मूलनाला महत्त्वाचे स्थान होते, या अभ्युपगमास (हायपोथिसिस) बळ देणारे आधार शोधून ते तिसऱ्या भागात मांडले आहेत आणि अखेरच्या प्रकरणात हुजूर पक्षाचा भारतीय स्वातंत्र्यास विरोध कसा होता याविषयीच्या आधारांची पुनरुक्ती करण्यात आलेली आहे. थोडक्यात, पुस्तकाचा वास्तविक अर्थाने वाचनीय हिस्सा हा पहिल्या भागातील हार्डी आणि टिळक यांच्याविषयीच्या प्रकरणांपुरता आहे. लोकमान्यांनी मजूर पक्षाला दिलेल्या देणगीपासूनच हे पुस्तक सुरू होते. पुस्तक केवळ भारतीय वाचकांपुरते न राहता विदेशांतही जावे, अशा कळकळीने लोकमान्य टिळकांच्या चरित्राविषयीचे तपशील देणारे मोठे प्रकरणही त्यात सुरुवातीला येते. त्यानंतर हार्डी यांच्याबद्दल असेच चरित्रतपशील पुरवणारे प्रकरण आणि मग हार्डी- टिळक यांच्यातील संपर्क/ संवादाचा वेध अशी पहिल्या भागाची रचना आहे. हार्डी दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनाही भेटले असा उल्लेख या पुस्तकात येतो. ही भेट झाली तेव्हा गांधीजींनी पहिला ‘सत्याग्रह’ केलेला होता आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे ते नेते ठरले होते; परंतु हार्डी आणि गांधी यांच्या संवादाबद्दल या पुस्तकात अवाक्षरही नाही आणि तो या पुस्तकाचा हेतूही नाही.
हेही वाचा >>>आंतरधर्मीय लिव्ह-इनमध्ये आहात? समान नागरी कायदा स्वीकारा, तरच मिळेल पोलीस संरक्षण!
हार्डी ऑक्टोबर १९०७ मध्ये पुण्यास आले. ‘सार्वजनिक सभे’तर्फे त्यांचा स्वागत सोहळा टिळकांनी घडवला आणि ‘केसरी’ कार्यालयात टिळकांच्या सहकाऱ्यांशीही संवाद साधून, ‘आमच्या ‘लेबर लीडर’ या वृत्तपत्रापेक्षा ‘केसरी’ चांगला चालला आहे’ असा अभिप्राय हार्डींनी दिला. पुढे १९०८ मध्ये टिळकांना मंडालेच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा ‘लेबर लीडर’मध्ये हार्डींनी लिहिले त्याचा सारांश असा की : टिळकांचा भारतीय कामकरी वर्गावरील प्रभाव वादातीत आहे. या शिक्षेमुळे विनाकारण डांबले गेलेल्या अनेकांची आठवण होते. ते जहालवादाचा पुरस्कार करत असले तरी नेमस्त सुधारणा जर प्रामाणिकपणे केलेली असेल तर तिलाही टिळकांचा पाठिंबाच असतो हे विसरून चालणार नाही.
हार्डींच्या या लिखाणातून टिळकांविषयीचा स्वागतशील दृष्टिकोन दिसतो. एकंदर भारताबद्दल हार्डी सकारात्मक विचार करत होते. ‘‘भारताला स्वयंशासनाचा हक्क मान्य केला पाहिजे. स्वयंशासन जर भारतात अयशस्वी ठरले, तर ते सर्वथैव अपयशी ठरेल. भारत हा जगातील आत्म-अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी कळीचा ठरणारा देश आहे.’’ असे त्यांचे विचार असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. किंवा, लोकमान्य टिळक हे सर्वसामान्य ब्रिटिशांशी संवाद साधून त्यांना ‘तुमचे सरकार तुमच्या पैशाचा योग्य विनियोग न करतात, भारतासारख्या देशांत कुशासन करते आहे’ असे पटवून देऊ पाहणारे पहिले भारतीय नेते होते, असे निरीक्षण लेखक नोंदवतो. अभावितपणे का होईना, एक तौलनिक निरीक्षण वाचकांपर्यंत पोहोचवण्यात लेखक यशस्वी झाला आहे ते निरीक्षण असे की, टिळकांबद्दल अनेकदा गैरसमज पसरवण्याचे काम इंग्रज सत्तेने केले, तशा प्रकारे (पण निव्वळ सत्ताधारी यंत्रणांकडून नव्हे) गैरसमजांची शिकार हार्डी यांनाही व्हावे लागले होते. उदाहरणार्थ, ‘राजद्रोहा’चा ठपका दोघांवरही कमीअधिक प्रमाणात ठेवला गेला. कोलकाता दंगलीस हार्डी यांचे मुस्लीमविरोधी वक्तव्य कारणीभूत ठरल्याचाही आरोप झाला.
हेही वाचा >>>गोमांस, लव्ह जिहादनंतर आता मुस्लिमांची उपजीविका हे लक्ष्य?
लेखक उमाकांत तासगावकर हे विद्यापीठीय इतिहासकार नाहीत. कोणत्याही बिगर-विद्यापीठीय इतिहासकाराने आपले लिखाण लोकांपुढे आणण्यामागे स्वत:चे नेमके काय हेतू आहेत हे सांगण्याची आणि वाचकांनीही ते जाणून घेण्याची गरज आजघडीला कधी नव्हे इतकी अधिक आहे. तासगावकरांनी सुमारे साडेपाच पानी प्रस्तावनेत केलेल्या कथनातून मजूर पक्षाच्या विचारधारेबद्दलचा त्यांचा आदर प्रतीत होतो आणि या विचारधारेला वसाहतींकडे प्रत्यक्ष पाहण्याचे वळण देणारा हार्डी त्यांना महत्त्वाचा वाटतो, असे दिसते. टिळक आणि हार्डी हे दोघेही लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ते ठरतात, असेही मत या प्रस्तावनेत नमूद आहे. तर, अखेरच्या निवेदनात, ‘किएर स्टार्मर हे २०२४ च्या निवडणुकीत मजूर पक्षाचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी हार्डी यांच्याकडून बरेच शिकण्यासारखे आहे’ असा सल्लादेखील आहे!
पुस्तकातील तपशिलांचा वेल्हाळपणा, हार्डी यांचे पुस्तक आणि त्यांचा पत्रव्यवहार यांखेरीज बरीच संदर्भसाधने दुय्यम असणे हे ढोबळ दोष दुर्लक्षूनही पुस्तक वाचावे, इतपत नव्या आणि स्वागतार्ह दृष्टिकोनातून झालेले हे इतिहासकथन आहे. पुस्तकाचे वर्ण्यविषय असलेल्या दोघा नायकांचा संघर्ष हा अगदी ‘स्वर्गीय’ नव्हे पण ‘दैवदत्त’ अशा अर्थाने डिव्हाइन’ ठरवण्याच्या लेखकीय खटाटोपातून पुस्तकाला काहीशी रंजकताही लाभली आहे. लोकमान्य टिळकांचे वैचारिक सहप्रवासी अनेक होते, पण त्यांपैकी भारतीयांना अपरिचित अशा हार्डी यांची गाठभेट हे पुस्तक घडवते हे महत्त्वाचे.
हेही वाचा
अस्मा खान या जन्माने भारतीय पण कर्माने ब्रिटिश. त्यांचे लंडनमध्ये ‘दार्जिलिंग एक्स्प्रेस’ नावाचे रेस्तराँ आहे. भारतीय अन्न आणि करीप्रेमी ब्रिटिशांनी ते गजबजलेले असते. त्याचे वैशिष्ट्य त्यात सर्व महिला खानसाम्या आहेत. गार्डियनने गेल्या आठवड्यात घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय आहारसंस्कृती, भारतीय ‘शेफभरती’ आणि एकूण अन्नव्यवहारासह स्वत:विषयी भरपूर वाचनीय मजकूर दिलाय…
https:// shorturl. at/ F5 W2 Z
एडवर्ड पी. जोन्स हे पुलित्झर पारितोषिक मिळविणारे आफ्रिकी-अमेरिकी लेखक. पर्सिव्हल एव्हरेट यांच्याआधी अमेरिकेतील गोऱ्या समुदायाकडून बरीच मान्यता मिळविलेले. ‘अमेरिकन फिक्शन’चे ऑस्करला नामांकन मिळणे, जेम्स या एव्हरेट यांच्या कादंबरीचा उदोउदो होत असताना एका वेगळ्या आफ्रिकन-अमेरिकी लेखकावरील प्रकाशझोत येथे वाचता येईल.
https:// shorturl. at/ EgVR3
किआनू रीव्हज हा मेट्रिक्स चित्रमालिकेतील नायक अद्याप तरुणच आहे. त्याची कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. एक गाजलेला लेखक आपल्यासह घेऊन रीव्हजने ‘द बुक ऑफ एल्सव्हेअर’ ही कादंबरी लिहिली आहे. गार्डियनने गेल्या आठवड्यात रीव्हज आणि त्याचा सहलेखक चिना मिआव्हिल यांची कादंबरीच्या लेखनप्रक्रियेवर दीर्घ मुलाखत घेतली आहे. पण त्याहून अद्यायावत म्हणजे या पुस्तकातील एक प्रकरण. वाचून पुस्तक घ्यावे की न घ्यावे हे ठरविण्यासाठी…
https:// shorturl. at/9 RvgI
‘डिव्हाइन अॅजिटेटर्स : टिळक अॅण्ड हार्डी’
लेखक : उमाकांत तासगावकर
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स
पृष्ठे : ३०६; किंमत : ९०० रु.