एका पहाटे मला झोप येईना. एकंदरीत देशाची परिस्थिती वाईट आहे, धार्मिक दंगली होत आहेत, त्या थांबवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, आपले वयही झाले आहे; तर मग जगायचे कशाला, अशा प्रश्नांनी मी अस्वस्थ होतो. सकाळी उठून कोलंबियाच्या ॲमेझॉन जंगलात विमान कोसळले पण ४० दिवसांनी विमानातील चार मुले जिवंत सापडली, अशी बातमी वाचायला मिळाली. त्यामुळे माझा मूड बदलला. मग ही गोष्ट मी थोडीशी सविस्तर वाचली. ती सांगायचा मोह मला आवरत नाही.

लेसली जॅकंबरी म्युकुटीची गोष्ट…

१ मे २०२३ रोजी मॅकडॉलना म्युकुटी ही हयुईटोटो आदिवासी समाजातील स्त्री कोलंबिया देशातील ॲमेझॉनच्या जंगलामधील अराराकुरा या गावातून सान जोसे दल गुवारे या गावी विमानाने प्रवासाला निघाली होती. तिच्याबरोबर तिची चार मुले- लेसली (१३), सोलेंनी (वय वर्षे ९), टीएन (वय वर्षे ४) आणि क्रिस्टीन (११ महिने) होती. पोहोचण्याच्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे वडील हजर असणार होते. पण घडले भलतेच! सेसना या एक इंजिन असलेल्या आणि पंख्यांवर उडणाऱ्या विमानातून मॅकडॉलना धरून तीन मोठी माणसे आणि चार मुले प्रवास करत होती. त्यांच्या विमानाला ॲमेझॉनच्या जंगलावर वादळांनी गाठले. वैमानिकाने आणीबाणी जाहीर केली. पण उपयोग काय? विमान ॲमेझॉनच्या जंगलात कोसळले. दोन आठवडे शोध घेतल्यानंतर कोलंबियाच्या लष्कराला आणि जंगल शोध पथकाला १६ मे रोजी विमानाचे अवशेष सापडले. तीन मोठ्या माणसांचे मृतदेह सापडले, पण लहान मुलांचे मृतदेह सापडले नव्हते. शोध पथकाला लहान मुलांच्या पायांचे ठसे विमानापासून दूर जाताना दिसले. ठशांचा मागोवा घेतल्यानंतर माणसाचे दात उमटलेली आणि टाकून दिलेली फळेही सापडली. त्यामुळे मुले जिवंत असतील अशी शक्यता निर्माण झाली आणि शोध पथकाने मुलांचा शोध सुरू ठेवला. पण पुढे अजून दोन आठवडे मुले सापडली नाहीत.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
pune city reasons to avoid firecrackers noise pollution during Diwali pune
कर्णसुखद की नेत्रसुखद!
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
Viral Video Shows little ones Setup their own shop
चिमुकल्यांचं नवीन दुकान! उद्घाटन केलं, मित्र आले अन्… गावाकडील हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस
article about mangesh kulkarni life
व्यक्तिवेध : मंगेश कुलकर्णी

हेही वाचा – ‘गीता प्रेस’चे ‘शांतता’ कार्य!

हेलिकॉप्टरमधील सैनिकांनी ठिकठिकाणी अन्नाची खोकी टाकली, ती मुलांना सापडावेत अशी त्यांची इच्छा होती. १० जून २०२३ रोजी, म्हणजे विमान कोसळल्यानंतर ४० दिवसांनी, विमान जिथे कोसळले तिथून तीन किलोमीटरच्या अंतरावर, जंगलातल्या एका अगदी लहान मोकळ्या जागेत, ही मुले हेलिकॉप्टरमधून शोध घेणाऱ्या पथकाला दिसली. ती जागा इतकी लहान होती की तिथे हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नव्हते. मग दोरखंडाच्या साह्याने विमानातून शोध मोहिमेचे प्रमुख त्या जमिनीवर उतरले. वाचवलेल्या मुलांना कोलंबियातील बोगोटा शहरातील रुग्णालयात ११ जूनला २०२३ ला दाखल करण्यात आले. मॅन्युअल रोनक, वाचलेल्या मुलांचे वडील, १३ वर्षीय लेसलीला भेटल्यावर असे म्हणाले की “माझ्या १३ वर्षांच्या लेसली जॅकंबरी म्युकुटी या वाचलेल्या मुलीने मला सांगितले की, विमान कोसळल्यानंतर चार दिवस तिची आई जिवंत होती. आपला मृत्यू जवळ आला आहे असे लक्षात आल्यावर आईने मुलांना दूर जायला सांगितले. त्यावेळी ती म्हणाली, तुम्हाला तुमचे वडील भेटतील, ते तुमची वाट बघत आहेत, त्यांचेही तुमच्यावर माझ्याएवढेच प्रेम आहे. जा आणि सुरक्षित ठिकाणी लपून बसा. इथे आता नरमांस खायला रानटी श्वापदे हजर होतील.”

लेसलीने थोडक्यात सांगितल्याप्रमाणे या चार मुलांनी सुरुवातीला विमानात उपलब्ध असलेल्या थोड्या अन्नावर, मुख्यतः पिठांवर गुजराण केली. नंतर त्यांनी जंगलातील फळे खाल्ली. अमेझॉनच्या जंगलातला हा फळांचा हंगाम होता, हे या मुलांच्या पथ्यावर पडले. सैनिकांनी हेलिकॉप्टरमधून आकाशातून टाकलेली अन्नाची खोकी मिळाली, असे लेसलीने सांगितल्याचे वाचनात नाही. १३ वर्षांच्या लेसली जॅकंबरी म्युकुटीया हिला जंगलात कसे जगावे याचा थोडा अनुभव होता, तो उपयोगी पडला.

ही मुले इतके दिवस का सापडली नाहीत याचे एक कारण असे असू शकेल की लष्करी पोशाखातील शोध घेणाऱ्या माणसांची मुलांना भीती वाटली असावी; कारण पूर्वी त्यांच्या वडिलांना कोलंबियातील एका बंडखोर लष्करी गटाने खूपच त्रास दिला होता, हे लेसलीच्या आठवणीत असावे. त्यामुळे दुरून लष्करी वेषातील कोणी दिसले की ही मुले लपून बसत असावीत. रुग्णालयात ही मुले आता चित्र काढण्यात दंग आहेत. त्यातून ते क्लेशदायी स्मृतींमधून बाहेर पडत आहेत.

लुई अकोस्टा हा आदिवासींतर्फे चालवण्यात आलेल्या शोध मोहिमेचा प्रमुख होता. तो म्हणतो “पूर्वजांनी शिकवलेले शहाणपण आणि सैन्याने वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान यांच्या संयोगातून या मुलांचा शोध लागला” कोलंबीयामध्ये सध्या मूळ आदिवासी रहिवासी आणि युरोपातून आलेले स्थलांतरित यांच्यात तणाव आहे. लष्कर आणि आदिवासी यांनी संयुक्तपणे चालवलेल्या मोहिमेला आलेले यश हे कोलंबियाचे सरकार आदिवासी आणि स्थलांतरित यांच्यामधील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हेही वाचा – नव्या पिढीचा नवा फंडा… लिबरल आर्ट्सला प्राधान्य

मुस्तफाची गोष्ट…

ही गोष्ट वाचून झाली आणि मला लखनऊच्या मुस्तफाची गोष्ट आठवली. ती वर्तमानपत्रातील बातमीवरून जशीच्या तशी खालील प्रमाणे: लखनऊमधील बहुमजली इमारत कोसळल्याने दोन स्त्रियांचा मृत्यू झाला. जे लोक वाचले त्यामध्ये सहा वर्षांच्या मुस्तफाचा समावेश आहे. मुस्तफा सांगतो, “इमारत हलू लागली आणि ती पडणार हे मला जाणवले. मी जागा झालो. मला मी पाहिलेल्या डोरेमॉन कार्टूनमधील नोबिताची आठवण झाली. भूकंपाच्या वेळी बचावासाठी नोबिता एका कोपऱ्यात उभा राहतो आणि नंतर कॉट खाली लपतो. मीही तेच केले. मी कॉटच्या खाली लपून बसलो. मला आई पळून जाताना दिसली…”

निष्कर्ष…

एकंदरीत आदिवासींचे पिढीजात ज्ञान आणि कोलंबियातील सैनिकांचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा संयोग असो की मुस्तफाला कार्टूनमधील नायकाकडून प्राप्त झालेले ज्ञान असो, मुले संकटातून मार्ग काढतात. हे पाहून माझा आशावाद बळावला आणि मी निराशेतून बाहेर पडलो.