उभ्या-आडव्या धाग्यांची वीण घालत वस्त्राला आकार देण्यासाठी राज्यात लौकिक मिळवलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीची सांस्कृतिक ओळख म्हणून ‘आपटे वाचन मंदिरा’कडे पाहिले जाते. ग्रंथसंपदेचा शाश्वत ठेवा या ग्रंथालयाने वर्षानुवर्षे सांभाळला. त्याला शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची तेजस्वी परंपरा आहे. अनेक पिढ्यांना वाचनसमृद्ध करणाऱ्या या ग्रंथालयास नवोपक्रमासाठी भरीव निधीची नितांत गरज भासत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ज्याचे मँचेस्टर ही जशी इचलकरंजीची ओळख तद्वत एके काळी याच नगरीची राज्याला महती कळली ती इचलकरंजीकर नाटक मंडळी, पंडित बाळकृष्णबुवा यांच्यासह आपटे वाचन मंदिर यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी ठसा उमटविलेल्या संस्थांमुळे! अशा या नगरीची कला, क्रीडा, संस्कृती, उद्याोग, सहकार अशा सर्व क्षेत्रांत प्रगती व्हावी यासाठी इचलकरंजीच्या घोरपडे जहागीरदारांच्या पिढ्यांनी निष्ठापूर्वक रचनात्मक कार्याची उभारणी केली. आपटे वाचन मंदिराची भव्य वास्तू नजरेस पडते ती याच उपक्रमशीलतेतून. ज्ञानसेवेचा वसा जपत आपटे वाचन मंदिराने इचलकरंजीकरांचे ज्ञानोपासना वाढवण्याचे व्रत अविरतपणे केले आहे.
वाचनवेडे मुशाफीर वकील रामभाऊ आपटे यांनी यांच्या घरी स्वत:चे वाचनालय सुरू केले होते. काँग्रेसप्रेमी असलेल्या आपटे यांनी १८८७ साली मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला होता. कोल्हापूर भागातून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले प्रतिनिधी होते. आपल्या वाचनालयाचा लाभ इतरांनाही व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन १८७० मध्ये आठ हजार लोकसंख्येच्या गावात ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने वाचनालय सुरू केले. त्यातून सामाजिक-सांस्कृतिक बंध घट्ट झाले. सुरुवातीच्या काळात मगदूम पीर दर्ग्याच्या नगारखान्यामध्ये वाचनालयात याचा आरंभ झाला तेव्हा त्याचा पसारा निवडक नियतकालिके, काही वृत्तपत्रे, कागदपत्रे इतपत मर्यादित होता. मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे व्यवस्थापन होते. इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव आबासाहेब घोरपडे यांनी याकामी मदत केली. आपटे यांनी राजवाड्यासमोर स्वत:च्या जागेत वाचनालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे काम सुरू केले. त्यांच्या हयातीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. पुढे नारायणराव घोरपडे सरकारांच्या सहकार्यामुळे ते आकाराला आले.
हेही वाचा >>>दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
आपटे वकिलांनी प्रमुख शहरांमध्ये फिरून तेथील ग्रंथालयाचे कामकाज पाहून तद्नुसार आपल्याकडचे ग्रंथालयही काळाच्या बरोबरीने वाटचाल करणारे आदर्शवत असावे असे नियोजन केले. वाचनालयासाठी त्यांनी काही नव्या प्रथा सुरू केल्या होत्या. वार्षिक सभेचे काम नियमित होत असेच. खेरीज, नामवंत साहित्यिकाचे व्याख्यान आयोजित केले जात असे. विशेष कार्य केलेल्या सभासदाचा गौरव केला जात असे. त्यांच्या निधनानंतर १८९७च्या वार्षिक सभेत इमारतीचे आपटे वाचन मंदिर असे नामकरण करण्यात आले. १९३० पर्यंत सभासदांची संख्या होती १९८. वाचनालयात १५ मासिके, तितकीच वृत्तपत्रे येत असत आणि वार्षिक उत्पन्न होते ९२५ रुपये. शिक्षणाचा प्रसार वाढला तसा नंतरच्या काळात वाचनालयाकडे वळणारी पावले वाढली.
भारत स्वतंत्र झाला आणि इकडे वाचनालयावर अस्तित्वाचे संकट ओढवले. सर्व संस्थाने व जहागिरी भारतीय संघराज्यात विलीन झाल्या. आपटे वाचन मंदिरही तांत्रिकदृष्ट्या सरकारी मालकीचे ठरले. पुढे वाचनालयाची मालकी संचालक मंडळाकडे यावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन १९८१ साली पुन्हा संचालक मंडळाची मालकी प्रस्थापित झाली.
हेही वाचा >>>लेख: आर्थिक आकांक्षांसाठीच तर नियमन हवे!
वाचनालयाची दुमजली लाकडी इमारत जीर्ण होत चालली होती. तेथे नवी वास्तू उभारण्याचा संकल्प करण्यात आला. नोव्हेंबर १९८३ मध्ये पायाभरणी समारंभ थाटात पार पडला. विविध सहकारी, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांनी मदत केली. इतकेच काय, पण रणजी क्रिकेटचा सामना आयोजित करून दोन लाख रुपये उभे करण्यात आले. १७ लाखांच्या वास्तूसाठी नगरपालिकेने दहा लाखांचा निधी दिला. इचलकरंजीतील श्रमिकांनी यथाशक्ती मदत करीत सांस्कृतिक वैभव उभे राहण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातूनच आजची वाचनालयाची टुमदार वास्तू साकारली गेली. ७ एप्रिल १९८५ रोजी त्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
पुरस्कार आणि गौरव
या वाचनालयाने ग्रंथालय चळवळीला दिलेले योगदान लक्षात घेऊन १९९१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाचनालयाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ मिळाला. १९९५ साली आपटे वाचन मंदिराचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष होते. तेव्हा जनस्थान पुरस्काराच्या मानकरी कवयित्री इंदिरा संत यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. वाचनालयाची पाहणी केल्यानंतर त्या भारावून गेल्या. त्यांनी स्वत:हून वाचनालयाचे सभासद होण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि ग्रंथालयास भरीव देणगी दिली. त्यातून वाचनालयाच्या वतीने ‘इंदिरा संत उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ त्या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते दिला जातो. तो अल्पावधीत साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला गेला आहे.
समृद्ध ग्रंथसंपदा
आपटे वाचन मंदिराची ग्रंथसंपदेची श्रीमंती कोणत्याही तराजूत मोजता यायची नाही. आज येथे ८३ हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. २०० दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातील १८८२ साली प्रकाशित झालेला देवनागरी लिपीतील ‘पंचोपाख्यान’ (ज्यावर लेखक, प्रकाशकांचा उल्लेख नाही) हा ग्रंथ तर अन्यत्र कोठेच उपलब्ध नाही. ऐतिहासिक महत्त्वाच्या पुस्तकांचा ऐवज, संशोधनात्मक निबंध, मुलांचा सांस्कृतिक कोश, विश्वकोशाचे सर्व खंड, विवेकानंद ग्रंथावली, स्पिरिट ऑफ इंडिया, महात्मा गांधी चरित्र खंड, प्राचीन धार्मिक ग्रंथ, नकाशे अशी महत्त्वाची ग्रंथसंपदा येथे उपलब्ध आहे. दुर्मीळ ग्रंथ वाचावयास दिले जातात.
वाचनालयाने कमावलेल्या विश्वासार्हतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे लेखक दालन. वाचकांचीच नव्हे तर साहित्यिकांचीही मर्जी या ग्रंथालयाने कमावली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी यांचे हस्तलिखित, छायाचित्रे यांची जपणूक करण्यासाठी त्यांच्या वारसांनी ते आपटे वाचन मंदिराकडे विश्वासाने सुपूर्द केले आहे. एका स्वतंत्र दालनात या दोन्ही लेखकांचा हा ऐवज पाहायला मिळतो. पाश्चात्त्य देशातील रायटर्स वॉलप्रमाणे त्याचे महत्त्व निर्माण झाले आहे. शंभर वर्षांपूर्वीची जुनी ४० चित्रे स्वतंत्र दालनात पाहायला मिळतात.
सामाजिक घटकांना सामावून घेणारे उपक्रम
ग्रंथालयाच्या वतीने ज्ञानवर्धक अनेक उपक्रम राबवले जातात. वाचनालयाशी समाजातील सर्व घटक जोडले जावेत यासाठी दिवाळी अंक प्रकाशनास रिक्षाचालक, पोस्टमन, अंगणवाडी सेविका अशा विविध क्षेत्रांतील लोकांना निमंत्रित करून त्यांना सामावून घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सुट्टीत बाल वाचन संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त महिनाभर नगरपालिकेच्या शाळेतील १५० मुलांना दररोज ग्रंथालयात पाचारण करून खाऊचा आस्वाद देत वाचनाची भूक भागवली. बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन असून आसन व्यवस्था सुलभ अशीच आहे. महिलांना वाचनालयाशी जोडून घेण्यासाठी त्यांच्या पुस्तक देवघेवीची स्वतंत्र वेळ ठेवण्यात आली. कामगारांसाठीही उद्याोगाच्या ठिकाणी जाऊन ग्रंथ देवघेव करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला होता.- दयानंद लिपारे, कोल्हापूर
संस्थेपर्यंत कसे जाल?
कोल्हापूरहून २८ किलोमीटर अंतरावर इचलकरंजी आहे. एसटी आणि खासगी वाहने सहज उपलब्ध असतात. इचलकरंजी एस टी स्टँडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राजवाड्यासमोरच अगदी मध्यवर्ती ठिकाणी आपटे वाचन मंदिराची वास्तू आहे.
ऑनलाईन देणगीसाठी तपशील
●बँकेचे नाव – कॉसमॉस बँक, शाखा इचलकरंजी
●चालू खाते क्रमांक – ११४१००१०५५२४
●आयएफएससी कोड – सीओएसबी००००११४